मन हे कधी शांतपणे खळखळणारा झरा,
तर कधी अथांग सागरी लाट.
मन हे कधी कातळ खडकासारखे टणक,
तर कधी कापसासारखं नाजूक.
मन हे कधी आकाशात उंच झेपावणारे पाखरू,
तर कधी अविचल,स्निथप्रज्ञ क्रौंच.
मन हे कधी हिमालयासारखे भव्य,
तर कधी लाजाळू सारखे संकुचित.
मन हे कधी एक संथ पावसाची लहर,
तर कधी धो धो कोसळणाऱ्या सरी.
-प्रथमेश
प्रतिक्रिया
20 Sep 2020 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम, लिहिते राहा. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
21 Sep 2020 - 8:08 am | Pratham
धन्यवाद.
30 Oct 2020 - 3:06 pm | Jayagandha Bhat...
मनाचिये मनी...!!