एकतारी

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
1 Sep 2020 - 11:55 pm

धपापता ऊर
गातसे ललित ।
हळवे ते सूर
जीवघेणे ।।

विरहाने चूर
ठिणगी विदेही।
जाणवतो धूर
काळजात ।।

वेदनेचा पूर
क्षितिज ओलांडे
वासुदेव दूर
भिजे स्वतः ।।

राऊळीं कापूर
एकटा झुरतो ।
ज्याची हुरहूर
तोच जाणे ।।

चांदण्या फितूर
दिसे कृष्णमेघ ।
वाजे कणसुर
एकतारी ।।

- अभिजीत

कविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

2 Sep 2020 - 1:16 pm | चौथा कोनाडा

सुरेख रचना !

कणसुर म्हणजे काय ?
हा शब्द पहिल्यांदाच वाचण्यात आला !

मायमराठी's picture

20 Nov 2020 - 7:55 pm | मायमराठी

कणसूर म्हणजे योग्य सूर नसलेला. कमीजास्त सूरात लागलेलं वाद्य किंवा गायन.
मूळ कवितेत चुकून ऱ्हस्व झाला. खरा दीर्घ हवा होता. हा माझा कणसूरपणा.

निनाद's picture

7 Sep 2020 - 4:55 am | निनाद

राऊळीं कापूर
एकटा झुरतो ।
ज्याची हुरहूर
तोच जाणे ।।
हे सुरेख!

प्राची अश्विनी's picture

20 Nov 2020 - 9:42 pm | प्राची अश्विनी

वाह!