मध्यमवर्ग

पंचमहाभूते आणि थोडं's picture
पंचमहाभूते आणि थोडं in जे न देखे रवी...
19 Aug 2020 - 7:37 pm

मन मुंबई लक्ष्मी लॉटरी...
मन खडखडीत तिजोरी...
मन वैरी...

मन डायरीतले मोरपीस...
मन आहेराचा शर्ट पीस...
मन कासावीस...

मन मंदिरातला गाभारा...
मन हातामधला गंडादोरा...
मन भरारा...

मन इमान धैर्य न्याय...
मन दोन दगडावरती पाय..
मन हाय हाय...

कविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

19 Aug 2020 - 8:09 pm | चौथा कोनाडा

व्वा, झकास !

मन डायरीतले मोरपीस...
मन आहेराचा शर्ट पीस...
मन कासावीस...

आहेराचा शर्ट पीस वाचून मन नॉस्टजिकले,
गेले ते आहेराच्या शर्टपीसचे दिवस, राहिल्या त्या फाटक्या टीशर्ट आणि रंग विटलेल्या जीन्सच्या आठवणी !

पंचमहाभूते आणि थोडं's picture

20 Aug 2020 - 10:00 am | पंचमहाभूते आणि थोडं

हा हा...शर्ट पीस नाही पण डायरी मधली मोर पीस मात्र अजून आहेत हेच काय ते समाधान

चांदणे संदीप's picture

20 Aug 2020 - 1:00 pm | चांदणे संदीप

छानेय मध्यमवर्गीय मन.

सं - दी - प