कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
31 Jul 2020 - 12:15 pm
गाभा: 

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज.

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

प्रतिक्रिया

कार्यालयीन सहकारी पॉझिटिव्ह झाला.

सकाळी पॉझिटिव्ह, संध्याकाळपर्यंत इस्पितळात भरती.

कोविड अगदी जवळ ठेऊन ठेपल्याची जाणीव सतत होते आहे.

हात स्वच्छ धुणे,अंतर राखणे आणि मास्क वापरणे ह्या त्रि सूत्री चा कधीच विसर पडू देवू नका.
ताप येणे,कोरडा खोकला येणे, अशक्त पना जाणवणे .
ह्या लक्षणाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका लगेच डॉक्टर चा सल्ला घ्या.

परवा रात्री ताप आल्यामुळे काल अँटी जेन चाचणी केली, तिचा निकाल positive आला. आज पुन्हा rt-pcr चाचणी केली. आताच email मिळाला positive असल्याचा. महानगरपालिकेने काही गोळ्या दिल्या आहे त्या कालपासून सुरू केल्या आहेत, कालपासून स्वतःचे कुटुबिया पासून विलागिकरण केले आहे. रोज व्यायाम करण्याची सवय आहे. थोड्या तापा शिवाय इतर काही त्रास होत नाही आहे. गोळ्या, आयुर्वेदिक काढा सुरू केलेला आहे ह्या व्यतिरिक्त अजुन काय काळजी व उपाय करावे ह्याचे कृपया मार्गदर्शन करावे.

गवि's picture

1 Aug 2020 - 1:29 am | गवि

काळजी करु नका.

सर्व ठीक होईल. स्वतःची काळजी घ्या, आराम करा, लवकर बरे व्हा. शुभेच्छा.

nashik chivda's picture

1 Aug 2020 - 4:43 pm | nashik chivda

धन्यवाद गवि,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2020 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करोनाची भिती बाळगू नका. सामान्य तापाप्रमाणे त्यावर आता उपचार होतात. आणि रुग्ण लवकर बरे होतात. आपणही लवकर बरे व्हाल. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेत राहा.

-दिलीप बिरुटे

पियुशा's picture

1 Aug 2020 - 12:38 am | पियुशा

@ nashik chiwda , तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या, सर्व पथ्य पाळा , मन शांत ठेवा ण लवकर बरे व्हा ही शुभेच्छा :)

nashik chivda's picture

1 Aug 2020 - 4:47 pm | nashik chivda

धन्यवाद पियुशा,
डॉक्टरांच्या सल्यानुसार सगळी औषधे घेत आहे. अश्विनी मेमाणे यांचा स्वानुभव दिशादर्शक ठरला.

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 8:43 am | कुमार१

या नव्या धाग्यावर वरील सर्वांचे आणि वाचकांचे स्वागत !

आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा ! मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन हे महत्वाचे.

यानिमित्ताने गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर ,आरोग्य सेवक आणि जनसंपर्क जास्ती असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत.

सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

@ डॉ. कुमार, ह्यात आपल्या तज्ञ मार्गदर्शनाची आवश्यकता असावी :
दुसर्‍या धाग्यावरील उपचर्चेत गा.पै. नी Original antigenic sin चा दाखला "परिचयकाठीण्य येण्यासाठी लस हवीच असं नाही. .....लस हा उपचार कधीच नसतो. ती फारतर पूरक असू शकते." अशा प्रकारचे मत व्यक्त करण्यासाठी (आणि बहुधा अंशतः लस विरहीत नैसर्गिक हर्ड इम्युनिटीच्या समर्थनार्थ) केला असावा असे जाणवते. यातील सरसकट सर्वच लसींबाबत संशयाचे भूत उभेकरणार्‍या तसेच लस विरहीत नैसर्गिक हर्ड इम्युनिटीच्या समर्थन करणार्‍या भूमिका, मला व्यक्तिशः साशंकीत करणार्‍या वाटतात, पण या विषयावर तज्ञ जाणकार डॉक्टरच मार्गदर्शन करू शकतील असे वाटते. अनेक आभार

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 4:38 pm | कुमार१

मागा
हा विषय गुंतागुंतीचा असल्याने मी काही अधिकृत संदर्भ सवडीने वाचेन. गरज भासल्यास संबंधित तज्ञांशी बोलेन आणि मगच लिहीन.
धन्यवाद.

नक्कीच काही कालावधी लागला तरी हरकत नाही, गा.पैं.च्या प्रतिसादानंतर माझ्या पहिल्या गुगलण्यात हा २०१७ मधला निबंध दुवा https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5748348/

चाळण्यात आला. रोचक वाटल्याने वाचण्याचा प्रयत्न केला पण मला विषयाची जाण नसल्याने बर्‍यापैकी डोक्यावरून गेला. आपल्याला कदाचित ऊपयूक्त वाटेल म्हणून.

अनेक आभार

nashik chivda's picture

1 Aug 2020 - 5:07 pm | nashik chivda

धन्यवाद कुमार १

आपले दोन्ही धागे १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ : घडामोडी समज,गैरसमज. व त्यावरील चर्चेतील आपली उत्तरे मला व्यक्तिश: उपयुक्त ठरली. तुम्ही हा उपक्रम राबविल्याबद्दल आपले शतश: धन्यवाद.

मा. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रथम लॉकडाउन पासून मला खरंच वाटत नव्हते की मला स्वतःला कधी करोना टेस्ट करण्याची गरज भासेल. मागील आठवड्यापर्यंत माझ्या जवळील मित्रपरिवारामध्ये फक्त एकाच करोना positive केस होती. पण ह्या आठवड्यामध्ये अचानक ९-१० केसेस आज दुपारपर्यंत समजल्या. अचानक माझ्या शहरात ह्या केसेस कश्या वाढल्या शिवाय माझ्या चिरपरिचितांमधील जे बाधित आहेत त्यांची लक्षणे देखील एकाच प्रकारची आहेत . सरकार जरी नाही म्हणत असले तरी हे सामुहिक संसर्ग असल्याचे दिसते आहे. ह्यातून पुढील चित्र कसे असेल ह्याचा काही अंदाज तुम्ही देऊ शकता का ?
वृत्त वाहिन्यांवरील धारावीच्या ज्या बातम्या पसरविल्या जात आहेत उदा. हर्ड इम्म्युनिटी ह्यात कितपत सत्य असावे ?

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 6:03 pm | कुमार१

ना चि,
सर्वप्रथम शुभेच्छा. काळजी घ्या.
.........................
आपल्या प्रतिकारशक्तीचे दोन मोठे विभाग आहेत;
१. अँटीबॉडीज आणि
२. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी ( T cells).

1.antibodies : ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
a.. मारक (Neutralizing)
b.. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत/ व्यक्तीत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.

२. अँटीबॉडीज आणि T पेशींची मोजणी वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. अँटीबॉडीजची मोजणी तुलनेने सोपी असल्याने नेहमीच्या प्रयोगशाळेत होते. याउलट पेशींची मोजणी संशोधन पातळीवर करावे लागते. ती गुंतागुंतीची असते. तसेच त्या पेशी नेहमीच रक्तप्रवाहात सापडत नाहीत.
ज्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आहेत त्यांच्यात T सेल्सची निर्मिती नेहमीच झालेली असेल असे मात्र नाही. विविध रुग्णांमध्ये वेगवेगळे प्रतिसाद आढळलेले आहेत.
………………….

आपण समूह प्र- शक्तीकडे जात आहोत . आता प्रश्न जनतेच्या % चा आहे.
पण ‘किती %’ वर अजून एकमत नाही. देशोदेशींचे अनुभव/मते वेगवेगळी आहेत.

आपली रोगप्रतिकार यंत्रणा healthy असावी आणि तीन तीच काम योग्य रित्या करावे इथपर्यंत समजून घेता येईल.
पण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे म्हणजे काय हे समजणे अवघड जातं आहे.
रोगप्रतिकार यंत्रणा जी आपल्या शरीरात असते त्या मध्ये अनेक पेशी,उती,etc ह्यांचा सहभाग असतो.
प्रतेक बाह्य आक्रमका शी लढताना वेगवेगळ्या पेशी भाग घेता ,प्रतेक वेळेस लढण्याची पद्धत वेगळी असते.
मग रोग प्रतिकार शक्ती वाढवणे म्हणजे नक्की कोणत्या पेशींची ताकत वाढवणे,.
त्यांची संख्या कृत्रिम पण वाढवणे धोक्याचे आहे .
आणि संख्या वाढवली की स्वतः शरीराचं त्या वाढलेल्या पेशी नष्ट करेल.
मग इम्मुनिटी बूस्टर म्हणजे नक्की काय.

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 5:33 pm | कुमार१
इम्मुनिटी बूस्टर म्हणजे नक्की काय.

१.काही संसर्गजन्य आजार निसर्गतः दीर्घकाळ/ कायमची प्रतिकारशक्ती देतात.
२. काही आजार निसर्गतः अल्पकाळ /अपुरी प्रतिकारशक्ती देतात.

३.वरील दोनच्या बाबतीत लसीकरणचा विचार केला जातो. मूळ रोगजंतूच्या गुणधर्मानुसार लसीने मिळालेली प्रतिकारशक्ती कमी अधिक कालावधीची असते.
४. म्हणून अशा बाबतीत बूस्टर डोस ठराविक काळाने देतात.

मराठी_माणूस's picture

1 Aug 2020 - 6:54 pm | मराठी_माणूस

करोना झाला तर , कोणती उपचार पध्दती वापरायची हे रुग्ण ठरवू शकतो का ?

मराठी_माणूस's picture

1 Aug 2020 - 6:54 pm | मराठी_माणूस

करोना झाला तर , कोणती उपचार पध्दती वापरायची हे रुग्ण ठरवू शकतो का ?

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 7:20 pm | कुमार१

सुरुवातीला ज्यांना कोणाला ताप आला असेल त्यांना अधिकृत सरकारी ताप केंद्रावरच जाण्याचे आदेश होते डॉक्टरांनाही तशा सूचना होत्या.

आता बहुतेक हे धोरण शिथिल केले असावे. जर सौम्य आजार असेल तर घरच्या घरीच विलग करून उपचार घ्यायला सांगतात. तेव्हा रुग्णाला नक्कीच पद्धतीचा पर्याय ठरवता येईल. मात्र संबंधित चाचणी करून ती + आली असेल तर नियमानुसार त्याची नोंद सरकारदप्तरी करावी लागते.

रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयानुसार आपापले धोरण आहे. काही ठिकाणी आधुनिक वैद्यक उपचारांच्या जोडीनेच अन्य पद्धतीचाही अवलंब केला जात आहे - जर रुग्णाची तशी इच्छा असेल तर. अशा वेळेस संबंधित रुग्णालयाच्या बोर्डावरीलच त्या पद्धतीचे डॉक्टर तसे उपचार देतात.

मराठी_माणूस's picture

1 Aug 2020 - 9:56 pm | मराठी_माणूस

जर रुग्णाला आधुनिक वैद्यक उपचार नको असतील तर ते चालेल का ?

Gk's picture

1 Aug 2020 - 11:58 pm | Gk

त्याने त्याच्या मर्जीने उपलब्ध असेल ते औषध तिथे जाऊन घ्यावे

Gk's picture

2 Aug 2020 - 5:56 pm | Gk

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे.

माहितगार's picture

3 Aug 2020 - 9:19 am | माहितगार

भारतातील चार प्रमुख जैव व अरोग्य विज्ञान संस्थांनी मिळून - सध्या कोरोना प्रजातीतील SARS-CoV-2 प्रकारच्या वीषाणूंमुळे जी कोविड-१९ श्वसनजन्य संसर्ग आजार पसरवणारी साथ चालू आहे - त्याबद्दल एक अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला आहे.

इतर सजीवांप्रमाणे वीषाणूंमध्येही जे जनुकीय बदल होतात त्यांना म्युटेशन (उत्परिवर्तन) म्हणतात, SARS-CoV-2 ह्या करोना वीषाणूचे संक्रमण आधूनिक विज्ञानाच्या काळात होत असल्यामुळे वीषाणूंचे कोणते उत्परिवर्तन कोणत्या भौगोलीक प्रदेशात (देशात) अधिक आढळून येते आहे यावर वीषाणूविज्ञानाला लक्ष ठेवता येते (आणि मग एका अर्थाने कोणते कोणते उत्परिवर्तन कोणत्या देशातून कोणत्या देशात गेले याचे भाकीत वर्तवता येते ) त्या संबंधाने म्हणजे भारतात करोना SARS-CoV-2 कोणत्या भागात कोणकोणते करोना-उत्परिवर्तन साथ पसरवते आहे ह्याची माहिती देणारा हा अहवाल आहे.

जानेवारी २०२० च्या सुमारास भारतात प्रथम आली ती 19A आणि 19B ही वुहान-चीन मध्ये आढळलेली उत्परिवर्तने; पण नंतर मागे टाकले ते युरोप, आमेरीका, पुर्व आशिया आणि सौदी आरेबीया मार्गे आलेल्या करोनाच्या उत्परिवर्तनांचा A2a haplotype (20A/B/C) with D614G गटाने हा गट भारतात अधीक संक्रमण-सक्रीय असल्याचे अभ्यास अहवाल म्हणतो. D164G हे उत्परिवर्तन संक्रमण-सक्रीयतेत अधिक प्रभावशाली असल्याचे अहवाल म्हणतो.

यातील 20 B करोना-उत्परिवर्तनाचे प्राबल्य दक्षिण आणि पश्चिम भारतात आढळले तर 20 Aचे प्राबल्य पूर्व आणि ऊत्तर भारतात अधिक आढळले.

मार्च ते मे भारतातील लॉक्डाऊन्समुळे इतर उत्परिवर्तनांचा भारतात प्रवेश होण्यास (तात्कालीक) अडथळा येण्यात मदत झाली असेही हा अहवाल नोंदवतो.

अहवाल बनवण्यात सहभागी संस्थांची नावे

* National Centre for Biological Sciences in IISc-बेंगलोर,
* National Centre for Cell Science (NCCS) पुणे
* the Indian Council of Medical Research (ICMR) दिल्ली,
*National Institute of Biomedical Genomics (NIBMG), कल्याणी, पश्चिम बंगाल

“We will not know which haplotype is more virulent until there is further investigation and in-vitro research. The strength of the virus doesn’t just depend on the virus itself or the mutation, but also the host. India is a vast country with different socio-economic nature and customs, which determine our diet, for instance, and also our immunity. The viral load also depends on the host,’’ says Das of NIBMG

संदर्भ: इंडियन एक्सप्रेस वृत्त

SARS-CoV-2 चे लॉगफॉर्म Severe acute respiratory syndrome coronavirus 2 असे आहे.

मी वीषय तज्ञ नाही उत्तरदायीत्वास नकार लागू

कुमार१'s picture

5 Aug 2020 - 10:24 am | कुमार१

या आजाराचे काही दीर्घकालीन परिणाम होतील का? हा प्रश्न परिचितांकडून वारंवार विचारला जात आहे. त्यासंदर्भात हा जुना दाखला :

पूर्वीच्या सार्स-१ ने बाधित आणि त्यातून बचावलेल्या रुग्णांचा गेली बारा वर्षे अभ्यास झालेला आहे. त्यामध्ये काहींना पुढील त्रास दिसून आले :

१. वारंवार होणारे संसर्गजन्य आजार
२. हृदयविकार
३. काही इंद्रियांचे ट्युमर.
..........
आताच्या आजाराचेही असे दीर्घकालीन निरीक्षण करावे लागेल.

कुमार१'s picture

7 Aug 2020 - 6:58 pm | कुमार१

१. ज्यांना लक्षणे होती पण घरीच विलग केले होते, त्यांनी लक्षणे नाहीशी झाल्यावर दहा दिवसानंतर विलगीकरण थांबवावे. नवव्या दिवसापासून (औषधाविना) ताप अजिबात नसावा.

२. जे कोविडबाधीताच्या संपर्कात होते त्यांनी १४ दिवस विलग राहावे.

३. ज्यांना बंद खोलीत १० पेक्षा जास्तीच्या समूहात जावे लागले आहे आणि त्यानंतर लक्षणे नव्हती, त्यांनी ‘त्या’ दिवसानंतर १४ दिवस विलग राहावे.

४. ज्यांना तीव्र आजार होता, त्यांनी पहिल्या लक्षणापासून 20 दिवसांपर्यंत विलग राहावे.( रुग्णालयात दाखल असल्यास तेथील सल्ल्यानुसार).

५. या सर्वसाधारण सूचना आहेत. परंतु आपापल्या डॉक्टरचा सल्ला आवश्यक.

मराठी_माणूस's picture

7 Aug 2020 - 7:10 pm | मराठी_माणूस

प्रवासा संबधी काय नियम आहेत , विशेष करुन जे गणेश उत्सवासाठी प्रवास करणारे आहेत त्यांच्या बाबतीत.

कुमार१'s picture

7 Aug 2020 - 7:26 pm | कुमार१

वरील नियम आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थळावरून घेतले आहेत. प्रवासासंबंधी असे काटेकोर नियम सहसा तिथे मिळत नाहीत.
संबंधित देश, राज्य सरकारे आणि त्यांचे सल्लागार डॉक्टर मिळून असे निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने घेतात.

आम्ही उभयता २९ जून रोजी भारतातून अमेरिकेत मुलाकडे आलो. त्यानंतर तीन-चार दिवसातच आम्ही दोघे कोरोनाग्रस्त झालो (भयंकर अशक्तपणा आणि कोरडा खोकला दहा-पंधरा दिवस होता) नंतर मुलगा-सूनेचे रिपोर्टही पोझिटिव्ह आले. आता मात्र सर्व ठीक आहोत. कोणतेही औषध घेतलेले नाही वा डॉक्टरकडे गेलो नाही. घरीच थोडीबहुत काळजी घेऊन आपोआप बरे झालो.
या सर्व अनुभवावर इथे लेख लिहीण्याचा विचार आज सकाळीच मनात आला, तेवढ्यात हा धागा दिसला.

कुमार१'s picture

8 Aug 2020 - 6:50 am | कुमार१

जरूर लिहा

चौकस२१२'s picture

8 Aug 2020 - 7:31 am | चौकस२१२

कोणतेही औषध घेतलेले नाही ?
परंतु स्थानिक सरकारने हे लक्षात आल्यावर उपचार घ्या असे सांगीतले नाही? तुमचया शहरात / राज्यात काय नियम होते त्यावेळेस ?

कुमार१'s picture

8 Aug 2020 - 2:10 pm | कुमार१

कोविडच्या सुमारे चाळीस टक्के रुग्णांना श्वसनअवरोध होतो. त्यातील काहींना पुढे फुफ्फुसकाठिण्य होत आहे, हे भारतात आणि जगात अन्यत्रही दिसत आहे. ज्यांना आज सौम्य कोविड झालेला आहे त्यांना देखील भविष्यात हा त्रास होऊ शकेल.
म्हणून अशा व्यक्तींनी कालांतराने स्वतःच्या फुफ्फुसक्षमता चाचण्या तज्ञांकडून जरूर करून बघाव्यात असे सुचवले गेले आहे.

मराठी_माणूस's picture

8 Aug 2020 - 6:24 pm | मराठी_माणूस

कोविडच्या सुमारे चाळीस टक्के रुग्णांना श्वसनअवरोध होतो

ह्यावर उपाय आहे का ?

कुमार१'s picture

8 Aug 2020 - 7:00 pm | कुमार१

ह्यावर उपाय आहे का ?

>>>>>
हा विशेषज्ञांचा प्रांत आहे.

प्रत्यक्ष काठीण्य झालेले नसताना काही अगदी मूलभूत काळजी अशी असते :
१. समतोल आहार
२. शिस्तीत वजन नियंत्रण
३. धूम्रपान कायमचे बंद
४. व्यायाम तज्ञांचे सल्ल्याने विशिष्ट व्यायामप्रकार. या प्रकारांनी हाडे व स्नायू यांचे कमाल कंडिशनिंग केले जाते.

आजार झाल्यानंतरचे उपचार फारसे समाधानकारक नाहीत. त्यावर अविरत संशोधन चालू आहे. Immunosuppressant प्रकारची काही औषधे देता येतात.