कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
31 Jul 2020 - 12:15 pm
गाभा: 

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज.

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

प्रतिक्रिया

कार्यालयीन सहकारी पॉझिटिव्ह झाला.

सकाळी पॉझिटिव्ह, संध्याकाळपर्यंत इस्पितळात भरती.

कोविड अगदी जवळ ठेऊन ठेपल्याची जाणीव सतत होते आहे.

हात स्वच्छ धुणे,अंतर राखणे आणि मास्क वापरणे ह्या त्रि सूत्री चा कधीच विसर पडू देवू नका.
ताप येणे,कोरडा खोकला येणे, अशक्त पना जाणवणे .
ह्या लक्षणाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका लगेच डॉक्टर चा सल्ला घ्या.

परवा रात्री ताप आल्यामुळे काल अँटी जेन चाचणी केली, तिचा निकाल positive आला. आज पुन्हा rt-pcr चाचणी केली. आताच email मिळाला positive असल्याचा. महानगरपालिकेने काही गोळ्या दिल्या आहे त्या कालपासून सुरू केल्या आहेत, कालपासून स्वतःचे कुटुबिया पासून विलागिकरण केले आहे. रोज व्यायाम करण्याची सवय आहे. थोड्या तापा शिवाय इतर काही त्रास होत नाही आहे. गोळ्या, आयुर्वेदिक काढा सुरू केलेला आहे ह्या व्यतिरिक्त अजुन काय काळजी व उपाय करावे ह्याचे कृपया मार्गदर्शन करावे.

गवि's picture

1 Aug 2020 - 1:29 am | गवि

काळजी करु नका.

सर्व ठीक होईल. स्वतःची काळजी घ्या, आराम करा, लवकर बरे व्हा. शुभेच्छा.

nashik chivda's picture

1 Aug 2020 - 4:43 pm | nashik chivda

धन्यवाद गवि,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2020 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करोनाची भिती बाळगू नका. सामान्य तापाप्रमाणे त्यावर आता उपचार होतात. आणि रुग्ण लवकर बरे होतात. आपणही लवकर बरे व्हाल. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेत राहा.

-दिलीप बिरुटे

पियुशा's picture

1 Aug 2020 - 12:38 am | पियुशा

@ nashik chiwda , तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या, सर्व पथ्य पाळा , मन शांत ठेवा ण लवकर बरे व्हा ही शुभेच्छा :)

nashik chivda's picture

1 Aug 2020 - 4:47 pm | nashik chivda

धन्यवाद पियुशा,
डॉक्टरांच्या सल्यानुसार सगळी औषधे घेत आहे. अश्विनी मेमाणे यांचा स्वानुभव दिशादर्शक ठरला.

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 8:43 am | कुमार१

या नव्या धाग्यावर वरील सर्वांचे आणि वाचकांचे स्वागत !

आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा ! मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन हे महत्वाचे.

यानिमित्ताने गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर ,आरोग्य सेवक आणि जनसंपर्क जास्ती असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत.

सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

@ डॉ. कुमार, ह्यात आपल्या तज्ञ मार्गदर्शनाची आवश्यकता असावी :
दुसर्‍या धाग्यावरील उपचर्चेत गा.पै. नी Original antigenic sin चा दाखला "परिचयकाठीण्य येण्यासाठी लस हवीच असं नाही. .....लस हा उपचार कधीच नसतो. ती फारतर पूरक असू शकते." अशा प्रकारचे मत व्यक्त करण्यासाठी (आणि बहुधा अंशतः लस विरहीत नैसर्गिक हर्ड इम्युनिटीच्या समर्थनार्थ) केला असावा असे जाणवते. यातील सरसकट सर्वच लसींबाबत संशयाचे भूत उभेकरणार्‍या तसेच लस विरहीत नैसर्गिक हर्ड इम्युनिटीच्या समर्थन करणार्‍या भूमिका, मला व्यक्तिशः साशंकीत करणार्‍या वाटतात, पण या विषयावर तज्ञ जाणकार डॉक्टरच मार्गदर्शन करू शकतील असे वाटते. अनेक आभार

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 4:38 pm | कुमार१

मागा
हा विषय गुंतागुंतीचा असल्याने मी काही अधिकृत संदर्भ सवडीने वाचेन. गरज भासल्यास संबंधित तज्ञांशी बोलेन आणि मगच लिहीन.
धन्यवाद.

नक्कीच काही कालावधी लागला तरी हरकत नाही, गा.पैं.च्या प्रतिसादानंतर माझ्या पहिल्या गुगलण्यात हा २०१७ मधला निबंध दुवा https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5748348/

चाळण्यात आला. रोचक वाटल्याने वाचण्याचा प्रयत्न केला पण मला विषयाची जाण नसल्याने बर्‍यापैकी डोक्यावरून गेला. आपल्याला कदाचित ऊपयूक्त वाटेल म्हणून.

अनेक आभार

nashik chivda's picture

1 Aug 2020 - 5:07 pm | nashik chivda

धन्यवाद कुमार १

आपले दोन्ही धागे १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ : घडामोडी समज,गैरसमज. व त्यावरील चर्चेतील आपली उत्तरे मला व्यक्तिश: उपयुक्त ठरली. तुम्ही हा उपक्रम राबविल्याबद्दल आपले शतश: धन्यवाद.

मा. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रथम लॉकडाउन पासून मला खरंच वाटत नव्हते की मला स्वतःला कधी करोना टेस्ट करण्याची गरज भासेल. मागील आठवड्यापर्यंत माझ्या जवळील मित्रपरिवारामध्ये फक्त एकाच करोना positive केस होती. पण ह्या आठवड्यामध्ये अचानक ९-१० केसेस आज दुपारपर्यंत समजल्या. अचानक माझ्या शहरात ह्या केसेस कश्या वाढल्या शिवाय माझ्या चिरपरिचितांमधील जे बाधित आहेत त्यांची लक्षणे देखील एकाच प्रकारची आहेत . सरकार जरी नाही म्हणत असले तरी हे सामुहिक संसर्ग असल्याचे दिसते आहे. ह्यातून पुढील चित्र कसे असेल ह्याचा काही अंदाज तुम्ही देऊ शकता का ?
वृत्त वाहिन्यांवरील धारावीच्या ज्या बातम्या पसरविल्या जात आहेत उदा. हर्ड इम्म्युनिटी ह्यात कितपत सत्य असावे ?

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 6:03 pm | कुमार१

ना चि,
सर्वप्रथम शुभेच्छा. काळजी घ्या.
.........................
आपल्या प्रतिकारशक्तीचे दोन मोठे विभाग आहेत;
१. अँटीबॉडीज आणि
२. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी ( T cells).

1.antibodies : ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
a.. मारक (Neutralizing)
b.. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत/ व्यक्तीत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.

२. अँटीबॉडीज आणि T पेशींची मोजणी वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. अँटीबॉडीजची मोजणी तुलनेने सोपी असल्याने नेहमीच्या प्रयोगशाळेत होते. याउलट पेशींची मोजणी संशोधन पातळीवर करावे लागते. ती गुंतागुंतीची असते. तसेच त्या पेशी नेहमीच रक्तप्रवाहात सापडत नाहीत.
ज्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आहेत त्यांच्यात T सेल्सची निर्मिती नेहमीच झालेली असेल असे मात्र नाही. विविध रुग्णांमध्ये वेगवेगळे प्रतिसाद आढळलेले आहेत.
………………….

आपण समूह प्र- शक्तीकडे जात आहोत . आता प्रश्न जनतेच्या % चा आहे.
पण ‘किती %’ वर अजून एकमत नाही. देशोदेशींचे अनुभव/मते वेगवेगळी आहेत.

आपली रोगप्रतिकार यंत्रणा healthy असावी आणि तीन तीच काम योग्य रित्या करावे इथपर्यंत समजून घेता येईल.
पण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे म्हणजे काय हे समजणे अवघड जातं आहे.
रोगप्रतिकार यंत्रणा जी आपल्या शरीरात असते त्या मध्ये अनेक पेशी,उती,etc ह्यांचा सहभाग असतो.
प्रतेक बाह्य आक्रमका शी लढताना वेगवेगळ्या पेशी भाग घेता ,प्रतेक वेळेस लढण्याची पद्धत वेगळी असते.
मग रोग प्रतिकार शक्ती वाढवणे म्हणजे नक्की कोणत्या पेशींची ताकत वाढवणे,.
त्यांची संख्या कृत्रिम पण वाढवणे धोक्याचे आहे .
आणि संख्या वाढवली की स्वतः शरीराचं त्या वाढलेल्या पेशी नष्ट करेल.
मग इम्मुनिटी बूस्टर म्हणजे नक्की काय.

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 5:33 pm | कुमार१

इम्मुनिटी बूस्टर म्हणजे नक्की काय.

१.काही संसर्गजन्य आजार निसर्गतः दीर्घकाळ/ कायमची प्रतिकारशक्ती देतात.
२. काही आजार निसर्गतः अल्पकाळ /अपुरी प्रतिकारशक्ती देतात.

३.वरील दोनच्या बाबतीत लसीकरणचा विचार केला जातो. मूळ रोगजंतूच्या गुणधर्मानुसार लसीने मिळालेली प्रतिकारशक्ती कमी अधिक कालावधीची असते.
४. म्हणून अशा बाबतीत बूस्टर डोस ठराविक काळाने देतात.

मराठी_माणूस's picture

1 Aug 2020 - 6:54 pm | मराठी_माणूस

करोना झाला तर , कोणती उपचार पध्दती वापरायची हे रुग्ण ठरवू शकतो का ?

मराठी_माणूस's picture

1 Aug 2020 - 6:54 pm | मराठी_माणूस

करोना झाला तर , कोणती उपचार पध्दती वापरायची हे रुग्ण ठरवू शकतो का ?

कुमार१'s picture

1 Aug 2020 - 7:20 pm | कुमार१

सुरुवातीला ज्यांना कोणाला ताप आला असेल त्यांना अधिकृत सरकारी ताप केंद्रावरच जाण्याचे आदेश होते डॉक्टरांनाही तशा सूचना होत्या.

आता बहुतेक हे धोरण शिथिल केले असावे. जर सौम्य आजार असेल तर घरच्या घरीच विलग करून उपचार घ्यायला सांगतात. तेव्हा रुग्णाला नक्कीच पद्धतीचा पर्याय ठरवता येईल. मात्र संबंधित चाचणी करून ती + आली असेल तर नियमानुसार त्याची नोंद सरकारदप्तरी करावी लागते.

रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयानुसार आपापले धोरण आहे. काही ठिकाणी आधुनिक वैद्यक उपचारांच्या जोडीनेच अन्य पद्धतीचाही अवलंब केला जात आहे - जर रुग्णाची तशी इच्छा असेल तर. अशा वेळेस संबंधित रुग्णालयाच्या बोर्डावरीलच त्या पद्धतीचे डॉक्टर तसे उपचार देतात.

मराठी_माणूस's picture

1 Aug 2020 - 9:56 pm | मराठी_माणूस

जर रुग्णाला आधुनिक वैद्यक उपचार नको असतील तर ते चालेल का ?

Gk's picture

1 Aug 2020 - 11:58 pm | Gk

त्याने त्याच्या मर्जीने उपलब्ध असेल ते औषध तिथे जाऊन घ्यावे

Gk's picture

2 Aug 2020 - 5:56 pm | Gk

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे.

माहितगार's picture

3 Aug 2020 - 9:19 am | माहितगार

भारतातील चार प्रमुख जैव व अरोग्य विज्ञान संस्थांनी मिळून - सध्या कोरोना प्रजातीतील SARS-CoV-2 प्रकारच्या वीषाणूंमुळे जी कोविड-१९ श्वसनजन्य संसर्ग आजार पसरवणारी साथ चालू आहे - त्याबद्दल एक अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला आहे.

इतर सजीवांप्रमाणे वीषाणूंमध्येही जे जनुकीय बदल होतात त्यांना म्युटेशन (उत्परिवर्तन) म्हणतात, SARS-CoV-2 ह्या करोना वीषाणूचे संक्रमण आधूनिक विज्ञानाच्या काळात होत असल्यामुळे वीषाणूंचे कोणते उत्परिवर्तन कोणत्या भौगोलीक प्रदेशात (देशात) अधिक आढळून येते आहे यावर वीषाणूविज्ञानाला लक्ष ठेवता येते (आणि मग एका अर्थाने कोणते कोणते उत्परिवर्तन कोणत्या देशातून कोणत्या देशात गेले याचे भाकीत वर्तवता येते ) त्या संबंधाने म्हणजे भारतात करोना SARS-CoV-2 कोणत्या भागात कोणकोणते करोना-उत्परिवर्तन साथ पसरवते आहे ह्याची माहिती देणारा हा अहवाल आहे.

जानेवारी २०२० च्या सुमारास भारतात प्रथम आली ती 19A आणि 19B ही वुहान-चीन मध्ये आढळलेली उत्परिवर्तने; पण नंतर मागे टाकले ते युरोप, आमेरीका, पुर्व आशिया आणि सौदी आरेबीया मार्गे आलेल्या करोनाच्या उत्परिवर्तनांचा A2a haplotype (20A/B/C) with D614G गटाने हा गट भारतात अधीक संक्रमण-सक्रीय असल्याचे अभ्यास अहवाल म्हणतो. D164G हे उत्परिवर्तन संक्रमण-सक्रीयतेत अधिक प्रभावशाली असल्याचे अहवाल म्हणतो.

यातील 20 B करोना-उत्परिवर्तनाचे प्राबल्य दक्षिण आणि पश्चिम भारतात आढळले तर 20 Aचे प्राबल्य पूर्व आणि ऊत्तर भारतात अधिक आढळले.

मार्च ते मे भारतातील लॉक्डाऊन्समुळे इतर उत्परिवर्तनांचा भारतात प्रवेश होण्यास (तात्कालीक) अडथळा येण्यात मदत झाली असेही हा अहवाल नोंदवतो.

अहवाल बनवण्यात सहभागी संस्थांची नावे

* National Centre for Biological Sciences in IISc-बेंगलोर,
* National Centre for Cell Science (NCCS) पुणे
* the Indian Council of Medical Research (ICMR) दिल्ली,
*National Institute of Biomedical Genomics (NIBMG), कल्याणी, पश्चिम बंगाल

“We will not know which haplotype is more virulent until there is further investigation and in-vitro research. The strength of the virus doesn’t just depend on the virus itself or the mutation, but also the host. India is a vast country with different socio-economic nature and customs, which determine our diet, for instance, and also our immunity. The viral load also depends on the host,’’ says Das of NIBMG

संदर्भ: इंडियन एक्सप्रेस वृत्त

SARS-CoV-2 चे लॉगफॉर्म Severe acute respiratory syndrome coronavirus 2 असे आहे.

मी वीषय तज्ञ नाही उत्तरदायीत्वास नकार लागू

माहितगार's picture

16 Aug 2020 - 1:37 pm | माहितगार

Institute of Genomics and Integrative Biology (IGIB-CSIR), नवी दिल्ली आणि Institute of Medical Sciences and SUM Hospital, भुवनेश्वर यांनी मिळून ओरीसातील ७५२ क्लिनीकल सँपल धरुन एकुण १,५३६ सँपल्सचे विश्लेषण केले तर त्यांना तब्बल करोना वीषाणूचे 73 novel variants मिळाले त्यातील B.1.112 and B.1.99 हि दोन म्युटेशन्स प्रथमच आढळली असे बातम्या म्हणताना दिसतात. सार्स-कोविड-२ (२०१९) सहा महिने म्हणजे आता पुरेसा जुना आहे तेव्हा novel हा शब्द का जोडताहेत ? की खरेच ७३ नवीन स्ट्रेन्स मिळाल्या हे बातम्यांवरून समजत नाही. पण ७३ स्ट्रेन्सचा जिनोम अहवाल बनवणे हे कामही थोडके नाही.

जर ७३ स्ट्रेन्स एकट्या ओरीसात पोहचली असतील तर म्युटेशनचा हा दर प्रचंडच म्हणावा लागेल. एवढी मुय्टेशन्स का होत असतील ? आणि हे खरे असेल तर कोणत्याही एका लसीला एवढ्या सगळ्या म्युटेशन्सना तोंड देणे झेपेल का?

https://www.tribuneindia.com/news/science-technology/researchers-identif...

*** *** ***
आमेरीकन तज्ञ Anthony Fauci लस ५०% परिणामकारक निघाली तरी साथ कह्यात आणण्यात बरेच मोठे यश म्हणताना दिसतात .

https://indianexpress.com/article/explained/coronavirus-vaccine-tracker-...

माहितगार's picture

17 Aug 2020 - 1:22 pm | माहितगार

डि१६४जी म्युटेशनची माहिती सोप्यापद्धतीने सांगणारा हा अलिकडील युट्यूब व्हिडीओ

कुमार१'s picture

17 Aug 2020 - 3:13 pm | कुमार१

त्याचा मथितार्थ:

१. विषाणू मध्ये जनुकबदल हे सतत होत असतात.
२. पण अशा प्रत्येक बदलामुळे त्याच्या प्रथिन रचनेत बदल होतोच असे नाही.

३. सध्याच्या एका विशिष्ट बदलामुळे विषाणूची संसर्गक्षमता वाढू शकते, पण हा प्रयोगशाळेपुरता काढलेला निष्कर्ष आहे.
४. तो निष्कर्ष प्रत्यक्ष मानवी व्यवहारात अद्याप सिद्ध झालेला नाही.

माहितगार's picture

17 Aug 2020 - 4:03 pm | माहितगार

अनेक आभार

कुमार१'s picture

20 Aug 2020 - 5:35 pm | कुमार१

चांगला मुद्दा.

विषाणूचे उपप्रकार सांगताना दोन संज्ञा वापरतात:
१. Strain : विषाणूत जनुकीय बदल होतो >> त्याच्या मानवी शरीरातील ‘वर्तनात’ बदल होतो. >> आजाराचे स्वरूप बदलू शकते.

२. Clade : जरी विषाणूत जनुकीय बदल झाला तरी त्याने वरीलप्रमाणे काही होत नाही.

कुमार१'s picture

2 Sep 2020 - 9:41 am | कुमार१

नुकतेच एका सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे ‘सार्स 2 चे जनुकीय बदल’ यावरील मत वाचले.

त्यांच्या म्हणण्यानुसार या विषाणूचे दरमहा सरासरी दोन जनुकीय बदल होत आहेत. आता सध्याची साथ सुरू होऊन सुमारे नऊ महिने उलटले आहेत.
त्यांच्या मते एखाद्या विषाणूची पुरेशी उत्क्रांती व्हायला हा कालावधी फारच कमी आहे. अन्य उदाहरणे तुलनेसाठी पाहता येतील. जुने करोना विषाणू जवळपास पन्नास वर्षे मानव जातीमध्ये फिरताहेत, तर इन्फ्लुएंझाचे विषाणू तर शंभर वर्ष फिरत आहेत.

सध्याच्या विषाणूची उत्क्रांती अजून चालू आहे. ती एवढ्या लवकर पूर्ण होईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

कुमार१'s picture

5 Aug 2020 - 10:24 am | कुमार१

या आजाराचे काही दीर्घकालीन परिणाम होतील का? हा प्रश्न परिचितांकडून वारंवार विचारला जात आहे. त्यासंदर्भात हा जुना दाखला :

पूर्वीच्या सार्स-१ ने बाधित आणि त्यातून बचावलेल्या रुग्णांचा गेली बारा वर्षे अभ्यास झालेला आहे. त्यामध्ये काहींना पुढील त्रास दिसून आले :

१. वारंवार होणारे संसर्गजन्य आजार
२. हृदयविकार
३. काही इंद्रियांचे ट्युमर.
..........
आताच्या आजाराचेही असे दीर्घकालीन निरीक्षण करावे लागेल.

कुमार१'s picture

7 Aug 2020 - 6:58 pm | कुमार१

१. ज्यांना लक्षणे होती पण घरीच विलग केले होते, त्यांनी लक्षणे नाहीशी झाल्यावर दहा दिवसानंतर विलगीकरण थांबवावे. नवव्या दिवसापासून (औषधाविना) ताप अजिबात नसावा.

२. जे कोविडबाधीताच्या संपर्कात होते त्यांनी १४ दिवस विलग राहावे.

३. ज्यांना बंद खोलीत १० पेक्षा जास्तीच्या समूहात जावे लागले आहे आणि त्यानंतर लक्षणे नव्हती, त्यांनी ‘त्या’ दिवसानंतर १४ दिवस विलग राहावे.

४. ज्यांना तीव्र आजार होता, त्यांनी पहिल्या लक्षणापासून 20 दिवसांपर्यंत विलग राहावे.( रुग्णालयात दाखल असल्यास तेथील सल्ल्यानुसार).

५. या सर्वसाधारण सूचना आहेत. परंतु आपापल्या डॉक्टरचा सल्ला आवश्यक.

मराठी_माणूस's picture

7 Aug 2020 - 7:10 pm | मराठी_माणूस

प्रवासा संबधी काय नियम आहेत , विशेष करुन जे गणेश उत्सवासाठी प्रवास करणारे आहेत त्यांच्या बाबतीत.

कुमार१'s picture

7 Aug 2020 - 7:26 pm | कुमार१

वरील नियम आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थळावरून घेतले आहेत. प्रवासासंबंधी असे काटेकोर नियम सहसा तिथे मिळत नाहीत.
संबंधित देश, राज्य सरकारे आणि त्यांचे सल्लागार डॉक्टर मिळून असे निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने घेतात.

आम्ही उभयता २९ जून रोजी भारतातून अमेरिकेत मुलाकडे आलो. त्यानंतर तीन-चार दिवसातच आम्ही दोघे कोरोनाग्रस्त झालो (भयंकर अशक्तपणा आणि कोरडा खोकला दहा-पंधरा दिवस होता) नंतर मुलगा-सूनेचे रिपोर्टही पोझिटिव्ह आले. आता मात्र सर्व ठीक आहोत. कोणतेही औषध घेतलेले नाही वा डॉक्टरकडे गेलो नाही. घरीच थोडीबहुत काळजी घेऊन आपोआप बरे झालो.
या सर्व अनुभवावर इथे लेख लिहीण्याचा विचार आज सकाळीच मनात आला, तेवढ्यात हा धागा दिसला.

कुमार१'s picture

8 Aug 2020 - 6:50 am | कुमार१

जरूर लिहा

चौकस२१२'s picture

8 Aug 2020 - 7:31 am | चौकस२१२

कोणतेही औषध घेतलेले नाही ?
परंतु स्थानिक सरकारने हे लक्षात आल्यावर उपचार घ्या असे सांगीतले नाही? तुमचया शहरात / राज्यात काय नियम होते त्यावेळेस ?

चित्रगुप्त's picture

9 Aug 2020 - 6:17 am | चित्रगुप्त

@चौकस२१२... आम्ही कोणताही औषधोपचार वा डॉक्टरी सल्ला घेतलेला नाही. या सर्व अनुभवावर लवकरच लेख लिहीणार आहे.

मराठी_माणूस's picture

9 Aug 2020 - 10:09 am | मराठी_माणूस

करोना प्रकरण सुरु झाल्यापासुन, पहील्यांदा काहीतरी वेगळे समोर आलेले आहे.
लेखाच्या प्रतिक्षेत.

कुमार१'s picture

8 Aug 2020 - 2:10 pm | कुमार१

कोविडच्या सुमारे चाळीस टक्के रुग्णांना श्वसनअवरोध होतो. त्यातील काहींना पुढे फुफ्फुसकाठिण्य होत आहे, हे भारतात आणि जगात अन्यत्रही दिसत आहे. ज्यांना आज सौम्य कोविड झालेला आहे त्यांना देखील भविष्यात हा त्रास होऊ शकेल.
म्हणून अशा व्यक्तींनी कालांतराने स्वतःच्या फुफ्फुसक्षमता चाचण्या तज्ञांकडून जरूर करून बघाव्यात असे सुचवले गेले आहे.

मराठी_माणूस's picture

8 Aug 2020 - 6:24 pm | मराठी_माणूस

कोविडच्या सुमारे चाळीस टक्के रुग्णांना श्वसनअवरोध होतो

ह्यावर उपाय आहे का ?

कुमार१'s picture

8 Aug 2020 - 7:00 pm | कुमार१

ह्यावर उपाय आहे का ?

>>>>>
हा विशेषज्ञांचा प्रांत आहे.

प्रत्यक्ष काठीण्य झालेले नसताना काही अगदी मूलभूत काळजी अशी असते :
१. समतोल आहार
२. शिस्तीत वजन नियंत्रण
३. धूम्रपान कायमचे बंद
४. व्यायाम तज्ञांचे सल्ल्याने विशिष्ट व्यायामप्रकार. या प्रकारांनी हाडे व स्नायू यांचे कमाल कंडिशनिंग केले जाते.

आजार झाल्यानंतरचे उपचार फारसे समाधानकारक नाहीत. त्यावर अविरत संशोधन चालू आहे. Immunosuppressant प्रकारची काही औषधे देता येतात.

पाहिले तर covid19 बरा होतो म्हणजे काय होत.
त्या साठी कोणती कन्फर्म टेस्ट आहे का की आता 1 पण व्हायरस शरीरात नाही.
फक्त लक्षण संपली की रोगी बरा झाला अस आता तरी समजलं जाते.

काही व्हायरस आक्रमण करत असतील आणि काही सुप्त राहत असतील जसे बाहेर च्या वातावरणात राहतात ते detect होवू शकतात का?
Covid19 होवून गेल्या वर भविष्यात शरीरावर काय परिणाम करेल हा सामान्य लोकांचा विषय नाही हे क्षेत्र फक्त संशोधक मंडळी साठी आहे असे मला वाटत.
Selected माहिती मिळाल्या मुळे आणि पूर्ण ज्ञान नसल्या मुळे सामान्य लोकांवर त्या माहिती चा निगेटिव्ह परिणाम होईल.
सर्व सुरळीत झाले की लोक covid19 ला विसरून जातील.
योग्य आहार,व्यायाम, ह्या साध्या गोष्टी पण कोणी करणार नाही.
असे पण अनेक आजार,अनेक धोके क्षणा क्षणा ल आहेत.
त्या अनेक धोक्याच्या गर्दीत covid19 पण हरवून जाईल.

लई भारी's picture

10 Aug 2020 - 1:15 pm | लई भारी

आपण ही लेखमालिका सुरु ठेवल्याबद्दल आभार! चर्चा होऊन चांगली माहिती मिळत आहे.
हा धागा बघितलाच नव्हता. आमचे काही अनुभव whatsapp वर शेअर केल्यानंतर दुर्गविहारी यांनी लिंक दिली. तेच अनुभव परत इथे टाकतोय.

या सगळ्या सिस्टिम मधून जवळून जातो आहे. त्यामुळे काही गोष्टी सांगाव्याश्या वाटत आहेत.
यात अभ्यास वगैरे काही नाही किंवा हेच खरं आहे असं नाही. पण जाणवलेल्या गोष्टी सांगाव्यात असं वाटलं.

टेस्ट मध्ये गोंधळ आहे/नाही ठामपणे सांगता नाही येणार. पण जवळपास सगळ्या पॉजिटीव्ह लोकांना काही ना काही लक्षण दिसतात(सौम्य असली तरी). आतापर्यंत कॉमन लक्षण माहित झाली आहेतच. त्यामध्येच काहीतरी strange, वेगळं जाणवेल तुम्हाला. म्हणजे एकाने सांगितलं की "अशी अंगदुखी मला आयुष्यात कधी नव्हती!" हेच डोकेदुखी, ताप याबाबतीत. किंवा डायरिया सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवेल आणि तुमचं शरीर च सांगेल कि काहीतरी वेगळं आहे.

आर्थिक दृष्ट्या शक्य असल्यास(आणि विशेषतः वयस्कर लोक/लहान मुलं) खाजगी लॅब मध्ये टेस्ट करा. सरकारी व्यवस्था चांगलीच आहे. पण कितीही काळजी घेतली तरी तुम्ही एखाद्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात येण्याची जास्त शक्यता वाटते मला आणि नसला तरी संसर्ग होईल. खाजगी लॅब घरी येऊ शकतात स्वाब घ्यायला. वरून संस्थात्मक अलगीकरण लागत नाही. अचूकतेबद्दल माहीत नाही. मी जवळून बघितलेल्या व्यक्तीचा खाजगी मधला रिपोर्ट पॉजिटीव्ह होता आणि तो बरोबर होता हे सिद्ध झाले. False positive बद्दल माहित नाही.

पॉजिटीव्ह आलेल्या ६ व्यक्ती आणि सोबतचे ८-१० लोक या सगळ्यांनी सतत वाफ घेतली. फायदा होत असावं असं आम्हाला वाटलं (वैद्यकीय मत नाही). ==> कुमार सर, आपले मत?

सगळ्या तरुण लोकांना थोडाफार त्रास झाला आणि बहुतांश लक्षणे यावर नेहमीचे डॉक्टर जे औषधे देतात( Azithromycin, Paracetamol, Vitamin C, Zinc) यावर बरं वाटलं. oxymeter वापरून ऑक्सिजन पातळी वर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहेच. आयुर्वेदिक औषध(जवळच्या डॉक्टर ने दिलेली) पण घेतली.

आजकाल बहुतांश लक्षणे नसणाऱ्या लोकांना घरी उपचार घेऊ देतात. त्याचा फायदा घ्या.

वयस्कर किंवा इतर व्याधी(उदा. मधुमेह) असणाऱ्या लोकांना जर त्रास जास्त होतोय आणि ऍडमिट करावं लागेल अशी शक्यता असल्यास, माझं वैयक्तिक मत आहे कि खाजगी ठिकाणी ऍडमिट करा. सरकारी सेवेबद्दल काही तक्रार नाही आहे पण बहुतांश ठिकाणी प्रचंड रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल आणि इतर यंत्रणेवर ताण खूप आहे. माझी काही निरीक्षण उगाच वाद वाढवतील म्हणून मांडत नाही इथे.

आपण संपर्कात आलोय असं वाटत असेल आणि जवळपास वयस्कर लोक असतील तर लवकरात लवकर टेस्ट करा. विश्वास ठेवा, या संभ्रमावस्थे मधून जेवढ्या लवकर बाहेर याल तेवढा फायदा होईल.

दुर्दैवाने आमच्या एका जवळच्या नातेवाईकांचे कोरोना मधून उदभवणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स मुळे दुःखद निधन झाले.
६५ वय, मधुमेह या गोष्टी जीवघेण्या ठरल्या. शेवटी त्यांना खाजगी ठिकाणी शिफ्ट केलं पण त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. शेवटी, ऑक्सिजन लेव्हल खूप कमी झाली.

काळजी घ्या!

------------------------------------------------------------------------------------------------

अजून काही प्रश्न चर्चे साठी

- वर लिहिलं त्याप्रमाणे वाफेचा खरंच फायदा आहे का? कारण बहुतांश माहिती ही whatsapp विद्यापीठामधून आली होती. मला बहुतांश लक्षणे ऍलर्जिक सर्दीची असल्यामुळे नेहमीप्रमाणे वाफेचा फायदा झाला.

- टेस्ट च्या अचूकतेबद्दल काय सांगता येईल? अँटीजेन टेस्ट ५०% च अचूक आहे आणि स्वाब PCR ही ७०% अचूक असं वाचनात आलं. अर्थात, खातरजमा केली नाही. पण बरंच उलटसुलट ऐकायला मिळत आहे. कालच बातमी होती कि सरकारी दवाखान्यातील ४ डॉक्टरांचे सरकारी सेंटर वर स्वाब दिले ते पॉजिटीव्ह आले. त्यांना लक्षणे नव्हती म्हणून तीच तपासणी खाजगी लॅब मध्ये केली असता सगळ्यांचे निगेटिव्ह आले. अशा खूप ऐकीव/खऱ्या-खोट्या बातम्या फिरत आहेत आणि लोकांचा संभ्रम वाढवत आहेत. त्यात whatsapp मधून लोकांच्या गळी हे उतरलं आहे की प्रत्येक पेशंट मागे हॉस्पिटल/नगरपालिकेला ठराविक रक्कम मिळते, त्यामुळे मुद्दाम पॉजिटीव्ह देतात. वर बहुतांश तरुण लोकांमध्ये लक्षणे नसल्यामुळे त्यांचे अतिरंजित अनुभव आहेतच जोडीला.
एकाच घरातील बाकीच्या लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत, जरी घरातील पॉजिटीव्ह लोकांच्या नजीकच्या संपर्कात आले असतील तरी. टेस्ट कधी केली यावर अवलंबून आहे का?
एवढं विस्ताराने लिहायचं कारण म्हणजे अशा समजुतींमुळे लोक जीव गमावत आहेत.

- एकदा संसर्ग होऊन बरे झाल्यानंतर परत कधीच होणार नाही अशी ठाम समजूत आहे. आणि असे लोक बिनधास्त फिरत आहेत. त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, अशा बऱ्या झालेल्या लोकांपासून इतरांना कधीपर्यंत संसर्ग होऊ शकतो?

- मुळात आजकाल 'पेशंट बरा झाला' हे दर्शवणारी टेस्ट बहुतांश ठिकाणी केली जात नाही आहे. त्यामुळे ती स्वतःहून करावी का? सौम्य लक्षणे असणाऱ्या आणि लवकर घरी सोडलेल्या लोकांसाठी? किती दिवसांनी करावी? किती दिवस अलगीकरण असावे?

- वर काही प्रतिसादांमध्ये नमूद केलंच आहे, याचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये बातम्या दिसत आहेत. त्यावर अजून चर्चा आणि आपण सांगितलेले उपाय, चाचण्या याबद्दल जागरूकता हवी.

- सरसकट सगळ्यांनी precaution म्हणून व्हिटॅमिन-सी, झिंक च्या गोळ्या घ्याव्यात का?

- लहान मुलांना इतर लसीकरणामुळे(BCG/MMR) धोका कमी आहे, हे खरं आहे का? त्यांच्याबाबत काय काळजी घेता येईल?

धन्यवाद!

कुमार१'s picture

10 Aug 2020 - 3:01 pm | कुमार१

तुमच्या ज्या प्रश्नांना यापूर्वीच मी मागील धाग्यात आणि इथे दिलेली उत्तरे दिलीत ते आधी घेऊ .

वर लिहिलं त्याप्रमाणे वाफेचा खरंच फायदा आहे का? >>>
प्र.क्र. १९ : इथे पहावा : https://www.misalpav.com/node/46973

एकदा संसर्ग होऊन बरे झाल्यानंतर परत कधीच होणार नाही अशी ठाम समजूत आहे. आणि असे लोक बिनधास्त फिरत आहेत. >>>

प्र. क्र. १२ इथे पहावा : https://www.misalpav.com/node/46973

किती दिवस अलगीकरण असावे? >>>

इथेच वर 7 Aug 2020 - 6:58 pm चा माझा प्र पहावा.

सरसकट सगळ्यांनी precaution म्हणून व्हिटॅमिन-सी, झिंक च्या गोळ्या घ्याव्यात का? >>>

क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
झिंक : त्याचे महत्वाचे स्त्रोत म्हणजे कवच असलेले जलचर प्राणी, मांस, अख्खी धान्ये, बीन्स आणि कठीण कवचाची फळे.

लहान मुलांना इतर लसीकरणामुळे(BCG/MMR) धोका कमी आहे, हे खरं आहे का? >>>>

प्र. क्र. २ इथे पहावा : https://www.misalpav.com/node/46973

कुमार१'s picture

10 Aug 2020 - 3:32 pm | कुमार१

- टेस्ट च्या अचूकतेबद्दल काय सांगता येईल? अँटीजेन टेस्ट ५०% च अचूक आहे आणि स्वाब PCR ही ७०% अचूक >>>>
होय. RT-PCR चाचणी अशी केल्यास :
नाकातील swab : सुमारे ६५ %
घशातील swab : ...... ४० %

अँटीजेन टेस्ट वरीलपेक्षा खालील स्थानावर आहे. ती नकारात्मक आल्यास RT-PCR चाचणी करावी.

एकाच घरातील बाकीच्या लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत, जरी घरातील पॉजिटीव्ह लोकांच्या नजीकच्या संपर्कात आले असतील तरी. टेस्ट कधी केली यावर अवलंबून आहे का? >>

होय. चाचणी + येण्याचे प्रमाण संसर्गाच्या दिवसानंतर आठवड्यागणिक कमी होत जाते :
पहिला आठवडा सर्वाधिक ते पाचवा जेमतेम ६%

चालू.....

कुमार१'s picture

10 Aug 2020 - 3:41 pm | कुमार१

त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, अशा बऱ्या झालेल्या लोकांपासून इतरांना कधीपर्यंत संसर्ग होऊ शकतो?
>>>>

बाधित रुग्ण किती काळ संसर्गक्षम राहील याचे उत्तर आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असते. स्वाब चाचणीवर आधारित दोन अभ्यासांचा निष्कर्ष असा आहे:
१. 8 ते 37 दिवस ( सरासरी वीस दिवस )
२. 18 ते 48 दिवस ( सरासरी 31 दिवस)
( म्हणून संबंधित डॉ चा सल्ला आवश्यक ).
................................

लई भारी's picture

10 Aug 2020 - 3:34 pm | लई भारी

तेच प्रश्न इथे विचारल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तो लेख राहून गेला वाचायचा बहुधा.
या प्रतिसादासाठी उत्तरे एकत्र करायची तसदी घेऊ नका!

रात्रीचे चांदणे's picture

10 Aug 2020 - 1:51 pm | रात्रीचे चांदणे

@कुमार1 सध्या Oxford, Moderna आणि आणखीन एक दोन लसींचा दुसरा आणि तिसरा टप्प्याची चाचणी चालु आहे,
समजा सर्व काही सुरळीत झालं तर लस बाजारात यायला आणखीन कमीत कमी किती दिवस लागतील.

कुमार१'s picture

10 Aug 2020 - 2:16 pm | कुमार१

१. रा चा,
या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी मी योग्य व्यक्ती नाही ! औषधी कारखानेच काय ते सांगू शकतील.
एक मात्र आहे. लसीची सुरक्षितता आणि उपयुक्तता हे एका तराजूत ठेवून त्याचा सुयोग्य समतोल साधावा लागतो.
तो साधल्या शिवाय कुठलीही घाई करू नये.
यावर अधिक मी मागच्या भागाच्या प्रश्नोत्तरं मध्ये कुठेतरी लिहिलेले आहेच.
.......................
२. ल भा,
तुमच्या प्रश्नांची काही उत्तरे पूर्वीच्या भागांमध्ये आलेली आहेत .
ती संकलित करून जरा निवांतपणे सविस्तर लिहितो.....
धन्यवाद !

कुमार१'s picture

11 Aug 2020 - 10:13 am | कुमार१

नुकतेच दीर्घकालीन मधुमेही असलेले काही परिचित दगावले. मधुमेह आणि कोविड (किंवा अन्य आजार) यांचे नाते एकमेकास अधिक खड्ड्यात घालायचे असते. ( अब > अ + ब ).

मधुमेही ही कोविडग्रस्ताचे बाबतीत शरीरात अशा घटना घडतात :

१. इन्सुलीनचे उत्पादन कमी होणे,
२. शरीर पेशी इन्सुलीनच्या कार्यास दाद न देणे आणि
३. काही कोविडग्रस्त रुग्णालयदाखल व्यक्तींना steroidचे उपचार चालू असतात. हे औषध इन्सुलीनच्या विरोधी गटातील आहे.

अशा तऱ्हेने वरील तिहेरी परिणामातून मूळचा मधुमेह अधिक बिघडतो. त्यातून कोविडची गुंतागुंत वाढून तो गंभीर होतो.

मराठी_माणूस's picture

11 Aug 2020 - 10:50 am | मराठी_माणूस

हे औषध इन्सुलीनच्या विरोधी गटातील आहे

असे असुन steroid का दिले जाते

कुमार१'s picture

11 Aug 2020 - 11:32 am | कुमार१

कारण गंभीर स्थितीतील कोविडमध्ये हे एका स्टिरॉइड औषधाचा जीवरक्षक म्हणून उपयोग होतो.
सर्वांनाच काही ते दिले जात नाही.

कुमार१'s picture

11 Aug 2020 - 10:15 am | कुमार१

मधुमेही असलेले काही परिचित दगावले >>>

"कोविडने दगावले" असे वाचावे.

कुमार१'s picture

12 Aug 2020 - 3:25 pm | कुमार१

डॉ संकेत मेहता अभिनंदन !

हे डॉ कोविड ने स्वतः रुग्णालयात दाखल असताना आणि स्वतः ऑक्सिजनवर असताना दुसऱ्या रुग्णासाठी धावून गेले:

https://m.timesofindia.com/city/surat/doc-on-oxygen-support-risks-own-li...

माहितगार's picture

16 Aug 2020 - 1:12 pm | माहितगार

व्यावसायिक बांधीलकीचे उत्कृष्ट उदाहरण

माहितगार's picture

17 Aug 2020 - 1:08 pm | माहितगार

आमेरीकन कोविड्लाट अजूनही चालूच असली तरी, लहानमुले करोनाला अधिक य्शस्वी तोंड देत आहेत हे पाहून आमेरीकन मंडळींनी शाळा चालू करण्याचा प्रयोग करुन पाहीला तर मुलांमधील करोनाबाधीत व हॉस्पीटलायझेशन प्रमाण सबस्टॅशिअली वाढल्याचे सांगणारे हे वृत्त

कुमार१'s picture

17 Aug 2020 - 1:21 pm | कुमार१

खरे आहे.

करोना संसर्गातील वास आणि चव जाणे विषयक संशोधनाचे टाईम्स ऑफ ईंडिया वृत्त दुवा

- सँपल साईज फारच लहान दिसतो पण काहीच नाही पेक्षा काही बरे.

कुमार१'s picture

22 Aug 2020 - 9:52 am | कुमार१

कोविडबाधित मृतांचे शवविच्छेदन आता अधिक प्रमाणात होत आहे. त्यातून स्पष्ट झालेल्या काही गोष्टी :

१. फुप्फुसांना झालेली इजा लक्षणीय आहे हा विषाणू तिथल्या विशिष्ट (प्रकार- 2 ) पेशींवर हल्ला करतो. या पेशी एरवी एक मेद पदार्थ निर्माण करून फुफ्फुसे लवचिक ठेवतात. आता या कार्यात बिघाड होतो.

२. वरचा श्वसनमार्ग आणि फुप्फुसातील या विषाणूची घनता सार्स १/ मर्स च्या तुलनेत खूप जास्त आहे.

३. रक्तवाहिन्यांच्या आतील पातळ आवरणाला झालेली इजाही लक्षणीय.

हे नंतर बरे होणेबल असतं की कायमचे?

कुमार१'s picture

22 Aug 2020 - 12:45 pm | कुमार१

गवि,

ते सर्व व्यक्तिगत प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. जिथे ही चांगले असते, तिथे आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच गोष्टी बऱ्या होऊ लागतात. पण जिथे ती खालावलेली असते, तिथे हे बदल अजून पुढे जात राहतात.

कुमार१'s picture

1 Sep 2020 - 10:46 am | कुमार१

गेल्या काही दिवसात असंख्य ढकलपत्रातून कोविड-विरोधी अशास्त्रीय औषधांचा प्रचार/ चुकीची माहिती देणे चालू आहे. माझ्या परिचयातील अनेकांनी मला त्याबाबत विचारणा केली. अशा ढकलपत्रांमधून उल्लेखिलेली सर्व रसायने अथवा औषधे कोविडचा प्रतिबंध अथवा उपचार यादृष्टीने अशास्त्रीय आहेत.
संबंधित रसायने वापरून रुग्णांवर शास्त्रशुद्ध प्रयोग झालेले नसून त्यासंबंधी कुठलाही अधिकृत पुरावा सध्या उपलब्ध नाही. अशा रसायनांची यादी :

१. चांदीयुक्त गोळ्या वा द्रव
२. कण्हेरीचा अर्क
३. थायामोसिन, मेथिलीन ब्लू

४. चिंता कमी करणारी औषधे
५. नवजात बालकाच्या नाळेतील मूळ पेशींपासून तयार केलेले उत्पादन.

सर्वांना विनंती की अशा प्रकारची ढकलपत्रे तुम्हाला आल्यास तातडीने डिलीट करून टाका. कृपया पुढे पाठवू नका.

या इंडीयन एक्सप्रेस वृत्तात दिलेल्या कोविड-१९ बाधीत महाराष्ट्रीय डॉक्टरांचा सरासरी मृत्यूदर आय एम ए च्या आकडेवारी नुसार तब्बल 9.5 टक्के म्हणजे सर्वसाधारण मृत्युदरापेक्षा जवळपास तिपटीने अधिक दिसतो आहे.

डॉक्टरांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असणे समजण्यासारखे आहे पण सर्वसामान्यांपेक्षा माहिती आणि सुविधा सक्षमता डॉक्टरांची अधिक असताना मृत्यूदर एवढा अधिक येण्यामागे काय कारण असावे?

कुमार१'s picture

4 Sep 2020 - 5:17 pm | कुमार१

डॉक्टरांचा सरासरी मृत्यूदर

प्रश्न चांगला आहे पण उत्तर गुंतागुंतीचे आहे.

त्यासाठी निव्वळ मृत्युदर ही माहिती त्रोटक राहिल. मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे सखोल विश्लेषण करावे लागेल. त्यात खालील मुद्दे पहावे लागतील :

• वयोगट व लिंग
• मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार होते का ?
• धूम्रपान
• कोविडने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अन्य जिवाणूंचे संसर्ग झाले होते का, इत्यादी.

अशा विश्लेषणात बरेच किचकट संख्याशास्त्रीय निकषही लावावे लागतात. त्यानंतर चित्र स्पष्ट होते

माहितगार's picture

4 Sep 2020 - 6:26 pm | माहितगार

आपण म्हणता तसे वयोगटाचा मुद्दा महत्वाचा असू शकतो की सर्वसाधारण लोक्संख्येपेक्षा डॉक्टरमंडळींचे सरासरी वयोमान अधिक होते आणि ज्येष्ठ नागरीक असलेल्या डॉक्टर मंडळींना कोविड-१९ संसर्गाला तोंड देणे जमले नाही. पण डॉक्टर मंडळी नैसर्गिक प्रतिकार शक्ती विषयक माहिती आणि सुविधा बाबतीत अधिक सक्षम असण्याची शक्यता कायम रहाते.

दुसरे असेही शक्य आहे की सर्वसाधारण लोक्संख्येपेक्षा डॉक्टरांच्या मृत्यूंची नोंद अधिक व्यवस्थीत झाली असू शकेल. असे असेल तर सर्वसाधारण मृत्यूदराचे अंडर रिपोर्टींग प्रचंड होत आहे असा अर्थ निघेल.

स्वतःच्या मधुमेह, उच्च रक्तदाब व्यवस्थापनात डॉक्टर मंडळी अधिक सक्षम असतील असे गृहीत धरता यावयास हवे आणि फारतर सर्वसाधारण जनते एवढ्याच मर्यादा आहेत असे समजता येईल पण या मुद्याने तफावतीचे आकलन निटसे होत नाही. एक विचार करण्यास अवघड शक्यता अशी की मधुमेह, उच्च रक्तदाब व्यवस्थापनात वापरली जाणार्‍या एखाद्या औषधींचे अनाहुत साईड इफेक्ट भोवत नाहीत ना याचा शोध घेण्याची गरज नाही ना अशी शंका मनाला चाटून गेली. (अर्थात हा मुद्दा तज्ञ आणि संशोधकांसाठी आहे, सर्वसामान्य लोकांनी लगेच खरा समजून पसरवू नये)

कोविडने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अन्य जिवाणूंचे संसर्ग झाले होते का, इत्यादी

इलाज करणार्‍या डॉक्टरांना आणि इस्पितळ कर्मचारी वर्गास आजारी डॉक्टरांबद्दल अधिक आस्था असेल आणि ते असे सर्व इस्पितळातून सरसक्ट होऊ देणार नाहीत अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी.

* धुम्रपान बाबतही डॉक्टर सर्वसाधारण लोक्संख्येपेक्षा अधिक सजग असतील किंवा फारतर मेळ खातील त्यामुळे तिपटीचा मृत्यूदर लक्षात येत नाही.

*सॉरी माझ्या आधीच्या प्रतिसादात संदर्भ वृत्त दुवा देण्याचे बाकी राहीले होते.

कुमार१'s picture

4 Sep 2020 - 7:00 pm | कुमार१

पुन्हा एकदा हा मुद्दा - विदाचे सखोल विश्लेषण उपलब्ध झाले पाहिजे.
संख्याशास्त्रात confounders अशी एक संकल्पना असते. बरेचदा ती लावल्यानंतर दोन गोष्टींचा संबंध खरा नसल्याचेही उघडकीस येते.
यावरील अधिक चर्चा शास्त्रीय व्यासपीठावरच होऊ शकते. इथे नाही.

आता अन्य काही मुद्दे :

१. सध्या रुग्णतपासणी करणाऱ्या डॉक्टर्सना सामान्यांच्या तुलनेत विषाणूचा डोस हा सतत आणि खूप मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे.
२. सामान्यांपेक्षा डॉक्टर्स हे प्रचंड तणावाखाली आहेत.

३. अशावेळेस शरीरात तणावकालीन हार्मोन्सची पातळी वाढते ही हार्मोन्स इन्सुलिन विरोधी असतात.
४. समजा, अशा डॉक्टरांना मधुमेह असेल तर मग १ व ३ चा एकत्रित दुष्परिणाम खूपच जास्त होतो.

५. रुग्णालयात दाखल झाल्यावर अन्य काही संसर्ग झाल्यास त्यावरील औषधांना डॉक्टर मंडळी बऱ्याच वेळा जास्त रेझिस्टंट असू शकतात.
......
Doctors are the worst patients असे गमतीने म्हटले जाते, परंतु त्या विनोदामागे एक गंभीर वास्तव सुद्धा दडलेले आहे !

माहितगार's picture

4 Sep 2020 - 7:10 pm | माहितगार

पुन्हा एकदा हा मुद्दा - विदाचे सखोल विश्लेषण उपलब्ध झाले पाहिजे.

सहमत आहे . अर्थात या मुद्यांची चर्चा घडल्या शिवाय पुरेसे लक्ष घातले जाईल याची शाश्वती नसते. आणि किमान प्राथमिक निष्कर्ष निघावेत यासाठी सहा महिने हा तसा पुरेसा कालावधी आहे, तसे ते निघाले नसतील तर चिंताजनक बाब आहे.

अन्य काही मुद्दे :

हे रॅशनली पटण्यासारखे वाटतात.

आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी अनेक आभार

अनलॉककाळात प्रवास आणि खानपानावरील बंधने शिथील होताना दोन वेगवेगळ्या बातम्यांकडे लक्ष गेले एक हरियाणातील मुख्य रस्त्यांवरील धाब्यातून कोविड-१९चा मोठास संसर्ग पसरत असल्याचे लक्षात आले , दुसरी बातमी पुणे जिल्ह्यातील महामार्ग काठच्या ग्रामीण भागात संसर्ग इतर ग्रामीण भागापेक्षा अधिक असल्याची बातमी वाचली.

तात्पर्य येते वर्षभर शक्यतोवर बाहेर खाण्याचा मोह टाळून प्रवास करताना शिदोरी घरून घेऊनच निघावे हे श्रेयस्कर असावे.. आणि चहा घरी प्यावा. किमान गर्दी असलेल्या ठिकाणी चहा वडापाव आणि धाब्यांचा मोह टाळावा.

कुमार१'s picture

4 Sep 2020 - 9:37 pm | कुमार१

विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती कशी काम करते हे दाखवण्यासाठी एक सोपी स्वरचित आकृती खाली देत आहे. त्यातून T आणि B पेशी, अँटीबॉडीज इत्यादींचे काम स्पष्ट होईल.

ok

माहितगार's picture

5 Sep 2020 - 7:35 am | माहितगार

एकुण किती प्रकार होतात?

सध्याच्या वाचनावरून खालील तीन गोष्टींबद्दल चर्चा चालू आहे हे लक्षात येते. त्यांचा परस्पर संबंध अद्याप माझ्या नीटसा लक्ष्यात आलेला नाही.
१) सर्वसाधारण प्रतिकार शक्ती
२) विशीष्ट विषाणूंना सरावलेली प्रतिकार शक्ती
३) "टि" पेशी

कुमार१'s picture

5 Sep 2020 - 9:29 am | कुमार१

प्रतिकारशक्तीचे प्रकार असे आहेत :

१. नैसर्गिक (innate) प्रतिकारशक्ती : कुठलाही जंतू शरीरात घुसल्यावर सर्वसाधारण पांढऱ्या पेशी त्यावर प्रतिहल्ला करतात. त्यातून दाह होतो हे काही मिनिटात घडते.

२. बऱ्याच वेळा १ मधील कृती पुरेशी ठरते >> आजार होत नाही. पण, ती अपुरी ठरल्यास पुढील यंत्रणा कामाला लागते.

३. आता विशेषज्ञ यंत्रणा कार्यान्वित होते. ती संपूर्णपणे वरील आकृतीत दाखवलीच आहे. T पेशी विशिष्ट विषाणू विरोधी काम करतात. हा १ पेक्षा फरक आहे. ४. त्याचा सारांश : T व B पेशी हे दोन विभाग.

T पेशी विषाणू बाधित पेशींना उद्ध्वस्त करतात, तर
B पेशी antibodies तयार करतात.

माहितगार's picture

5 Sep 2020 - 12:59 pm | माहितगार

हे सोपे आहे समजण्यासाठी.

अनेक आभार.

माहितगार's picture

5 Sep 2020 - 8:02 am | माहितगार

मुंबईतून डॉक्टरांनाच पुर्नसंसर्गाची बातमी येताना दिसते आहे. तुरळक पुर्नसंसर्गाच्या शक्यतांच्या बातम्या सर्वसाधारण लोकांबद्दल जगभरातून येताना येताना दिसल्या तरी डॉक्टरांनाच पुर्नसंसर्गाची बातमी मुंबईतून वाचण्यात येत आहे उर्वरीत जगातील बातमी वाचण्यात अद्यापतरी आले नाही. एकदा संसर्ग होऊन गेला पुन्हा होणार नाही असे गृहीत धरून भारतीय डॉक्टरच बेसावध रहात नाहीएत ना ?

पुर्नसंसर्गाचा अभ्यास हा तज्ञ आणि संशोधकांसाठीही क्लिष्ट प्रकार असावा असे दिसते आहे. पुर्नसंसर्गाचा अभ्यास शास्त्रीयपणे व्हावा म्हणून आधीच्या संसर्गचाचणीचे सँपल जपून ठेवणे मग नंतर पुन्हा संसर्ग आढळल्यास आधीच्या आणि नंतरच्या दोन्ही सँपलचे जेनेटीक सिक्वेन्सिंग करणे आणि नंतरच्या संसर्गातील वीषाणू क्रियाशील आहे की अक्रियाशील आहे; आधीचाच आहे की म्युटेट झालेली आवृत्ती आहे हे तपासणे. (सध्या साशंकीत पुर्नसंसर्गा सँपलचे जेनेटीक टेस्टींग होत नाही त्या सुविधा वाढवाव्या लागतील असे दिसते) आणि मग प्रतिकारशक्ती किती प्रभावी ठरते आहे, पुर्नसंसर्ग झालेली व्यक्ती इतरांना संसर्ग प्रसारण किती करेल, लसीकरणावरील प्रभाव काय असतील पुर्नसंसर्ग ह्याचा अभ्यास करणे एकुण प्रकरण क्लिष्ट आहे आणि एकदा संसर्ग होऊन गेलेल्यांनी सावधानता पुढेही बाळगावी असे चित्र तुर्तास दिसते आहे.

काही अलिकडील बातम्यांचे दुवे

https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-mumbai-pune-...

https://theprint.in/opinion/theres-very-good-news-about-coronavirus-immu...

https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/can-you-get-the-c...

https://www.firstpost.com/world/us-sees-first-suspected-case-of-coronavi...

https://indianexpress.com/article/explained/why-first-reinfection-cases-...

https://www.nature.com/articles/d41586-020-02506-y

https://theswaddle.com/covid19-reinfection-myth-or-not-well-its-complica...

कुमार१'s picture

9 Sep 2020 - 6:01 pm | कुमार१

व्यक्तिगत संपर्कातून काही जणांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे, सध्याच्या आजारात घडलेल्या काही आश्चर्यकारक घटनांबद्दल. उदाहरणार्थ, एखादे १०३ वर्षाचे गृहस्थ सुद्धा या आजारातून खडखडीत बरे झाले आणि दुसऱ्या टोकाला 35 ते 40 वयोगटातील काहीजण चक्क मृत्युमुखी पण पडले.
तर हे असे का ?

या संदर्भात “संसर्गजन्य आजारांची सहनशीलता” (tolerance) या संकल्पनेवर गेली पंधरा वर्षे संशोधन चालू आहे. बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत आणि मानवी प्रयोगही आता टप्प्याटप्प्याने होत आहेत.

समजा, दोन समान वय आणि लिंग असलेल्या व्यक्तींची तुलना आपण करतो आहोत. त्या कोणालाही अन्य कुठला दीर्घ आजार नाही. आता दोघांना एकच जंतुसंसर्ग होतो. त्याचे शरीरातील परिणाम मात्र असे असतात :

१. एकाचा आजार अगदी सौम्य किंवा लक्षणविरहीत देखील राहू शकतो, तर
२. दुसऱ्याचा आजार अति गंभीर होतो.

वरील १ मध्ये शरीरात जंतुविरोधी दाह प्रक्रिया अगदी गरजेइतकीच मोजून-मापून होते. त्याने जंतूंचा नाश तर होतोच आणि शरीरातील बाकीच्या पेशींना इजाही पोहोचत नाही.

परंतु २ मध्ये मात्र हीच प्रक्रिया अनियंत्रित किंवा विचित्र प्रकारची (erratic) होते. त्यातून जे ‘वादळ’ उद्भवते. त्यातून शरीरातील अन्य पेशी आणि पर्यायाने अवयवांना देखील इजा पोहोचते.

ही प्रक्रिया शरीरातील कशामुळे नियंत्रित केली जाते, त्याचाच हा अभ्यास आहे.
कोविडच्या निमित्ताने भविष्यात हे संशोधन अधिक गती घेईल अशी आशा आहे.

माहितगार's picture

13 Sep 2020 - 1:47 pm | माहितगार

Covid-19: Masks can slow spread & help build immunity, says journal

टाईम्स ऑफ ईंडिया वृत्त दुवा

कुमार१'s picture

13 Sep 2020 - 1:58 pm | कुमार१

सहमत.
मास्क ही गरिबांची लस असेही म्हटले जाते !

कुमार१'s picture

14 Sep 2020 - 12:01 pm | कुमार१

सध्या या आजाराच्या निदानासाठी जो नाकातील स्वाब घेतात ती प्रक्रिया रुग्णांसाठी काहीशी त्रासदायक ठरते. मध्यंतरी काही कार्यालयात तेथील संपूर्ण कर्मचारी वर्गाचे स्वाब घेतले गेले. त्यातील काहींनी त्या प्रक्रियेनंतर दिवसभर डोके दुखत होते अशी तक्रार केली.

आता यावर तोडगा म्हणून रुग्णाच्या लाळेची तपासणी हा एक पर्याय पुढे आलेला आहे. नाकाच्या तुलनेत लाळेची तपासणी ही कमी संवेदनक्षम आहे. सध्या त्याचे काही चाचणी संच परदेशात वापरात आलेले आहेत. यातून आभासी नकारात्मक निष्कर्ष काहीसे अधिक येऊ शकतात हेही खरे. तूर्त चाळणी चाचणी म्हणून ती ठीक आहे.

यासंदर्भात इस्राईलमध्ये अजून एक संशोधन चालू आहे. त्यात रुग्णांनी फक्त एक गुळणी डिशमध्ये गोळा करायची आहे. आणि मग spectral तंत्रज्ञान वापरून केवळ एक सेकंदात रोगनिदान करता येईल अशी चाचणी विकसित होत आहे.

कुमार१'s picture

16 Sep 2020 - 10:53 am | कुमार१

मागील भागात हा प्रश्न (प्र. क्र. १४) आलेला आहे. त्यावर आता अधिक संशोधन झाल्याने त्याचे विस्तारित उत्तर इथे देतो.

प्र. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ?

होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला ( ACE२) चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो.
रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.

अधिक संशोधनातून खालील भर पडली आहे :

दम्याचे रुग्णांना अजून एक फायदा होतो. हे रुग्ण तोंडावाटे steroids चा फवारा घेत असतात. या औषधामुळे श्वसनमार्गात ACE२ एन्झाइमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशा लोकांना कोविड झाल्यास तो बऱ्यापैकी नियंत्रणात राहतो.

मात्र धूम्रपानी व्यक्तींत वरील एन्झाइमचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे त्यांचा कोविड अधिक वाईट होऊ शकतो. तसेच अशा व्यक्तींनी धूम्रपान सोडल्याचेही सुपरिणाम दिसले आहेत.

अनिंद्य's picture

17 Sep 2020 - 2:33 pm | अनिंद्य

प्रचुर मद्यपान करणारे आणि मधुमेही यांची कोविडशी लढण्याची क्षमता कमी असते का ?

काही संशोधन झालयं का यावर ?

टर्मीनेटर's picture

17 Sep 2020 - 2:55 pm | टर्मीनेटर

@ अनिंद्य
प्रचुर मद्यपान करणारे माझे काही मित्र गंमतीने म्हणतात बाकी लोकं अल्कोहोलचा वापर हात सॅनिटायझ करण्यासाठी करतात, आम्ही त्याचे प्राशन करून शरीर आतूनही सॅनिटायझ करतो 😀
अर्थात त्यातला गमतीचा भाग सोडून देऊ खाली प्रतिसादात कुमार साहेबांनी त्याबद्दल माहिती दिलीच आहे.

अनिंद्य's picture

17 Sep 2020 - 2:58 pm | अनिंद्य

भारी लॉजिक !

कुमार१'s picture

17 Sep 2020 - 3:10 pm | कुमार१

प्राशन करून शरीर आतूनही सॅनिटायझ करतो

थोर लोक 😀 😁

कुमार१'s picture

17 Sep 2020 - 2:45 pm | कुमार१

मधुमेही कोविडग्रस्ताचे बाबतीत शरीरात अशा घटना घडतात :

१. इन्सुलीनचे उत्पादन कमी होणे,
२. शरीर पेशी इन्सुलीनच्या कार्यास दाद न देणे आणि
३. काही कोविडग्रस्त रुग्णालयदाखल व्यक्तींना steroidचे उपचार चालू असतात. हे औषध इन्सुलीनच्या विरोधी गटातील आहे.

अशा तऱ्हेने वरील तिहेरी परिणामातून मूळचा मधुमेह अधिक बिघडतो. त्यातून कोविडची गुंतागुंत वाढून तो गंभीर होतो
..........................

मद्यपान करणारे >>>
त्यांच्यात यकृत (आणि परिणामी अन्य अवयव) किती बिघडले आहे ते पहावे लागेल. सर्वांना लागू असे एक विधान नाही.

अनिंद्य's picture

17 Sep 2020 - 2:52 pm | अनिंद्य

लस आणि त्याच्या चाचणीची गुंतागुंत मोठीच असणार नक्की पण सामान्य रुग्णांना लस कधी आणि कितपत effective यावर थोडे लिहाल का?

कुमार१'s picture

17 Sep 2020 - 3:06 pm | कुमार१

कोविड विरोधात सध्या ज्या ३ प्रकारच्या लसींचे प्रयोग चालू आहेत त्यांचा तुलनात्मक तक्ता :

ok

लसीच्या प्रयोगांची माहिती मौलिक आहे 👍

कुमार१'s picture

18 Sep 2020 - 1:37 pm | कुमार१

गेल्या चार दिवसांत Ab8 या नव्या संशोधन- उपचाराबद्दलचे ढकलपत्र बरेच फिरलेले दिसते. म्हणून त्याबद्दलची सद्यस्थिती :

१. ही सूक्ष्म आकाराची अँटीबॉडी आहे.
२. ती मानवी रक्तातूनच वेगळी काढून विकसित केली आहे.

३. ती सार्स-२ ला मारक आहे.
४. तूर्त तिचे उंदीर व अन्य प्राण्यांवरच प्रयोग झालेले आहेत. त्याचे निष्कर्ष आशादायक आहेत.

५. ती औषध रुपाने शरीरात गेल्यावर मानवी पेशींना इजा करणार नाही. त्यामुळे तिचे दुष्परिणाम कमीत कमी होतील.
६. तिच्या सूक्ष्म आकारामुळे हे औषध नाकाद्वारेही देता येऊ शकेल.

७. तिचा रोगप्रतिबंधक म्हणूनही उपयोग होऊ शकेल.

कुमार१ आपले लेख वाचतो आहे.
चायनीज व्हायरोलॉजिस्ट Dr. Li-Meng Yan यांनी कोव्हिड -१९ लॅब मध्ये बनवल्याचा दावा केला आहे, यावरचा एक लेख पाहण्यात आला आहे.
Unusual Features of the SARS-CoV-2 Genome Suggesting Sophisticated Laboratory Modification Rather Than Natural Evolution and Delineation of Its Probable Synthetic Route
आपल्याला जमल्यास वरील लेखातील आपणास महत्वाचा वाटणारा भाग इथे समजवल्यास आभारी असेन.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू

कुमार१'s picture

18 Sep 2020 - 8:53 pm | कुमार१

मबा, धन्यवाद.

संबंधित अहवाल तब्बल 26 पानी आहे. त्यात सूक्ष्मजीवशास्त्र आणि जनुकशास्त्र यातील बरेच किचकट भाग देखील आहेत. मला जमेल तसे मी सवडीने त्यातल्या निवडक भागावर नजर टाकेन.

तूर्त एक सांगतो.
या विषयावर सहा महिन्यांहून अधिक काळ प्रचंड काथ्याकुट झालेला आहे. तो नैसर्गिकच आहे असे म्हणणारेही काही संशोधन मागे वाचण्यात आले होते. प्रस्तुत संशोधन हेही अपुरेच आहे. तेव्हा हा वाद लवकर मिटेल असे मला काही वाटत नाही. मला मनापासून असे वाटते, की विषाणूचा उगम कसाही असला तरी उपचारांमध्ये असा काय फरक पडणार आहे ? सामान्य माणसाच्या दृष्टीने उपचार आणि प्रतिबंध हेच तरसर्वात महत्त्वाचे आहेत.

‘संशोधन हे निव्वळ संशोधनासाठीच की थेट जनहितार्थ’ असा विचार मनात येतो. अर्थात मी संशोधक नसल्याने ते स्वाभाविक आहे.

तरी पण बघतो एक नजर टाकून. मलाही त्यांचा हेतू समजू शकेल. अर्थात वेळ लागेल.

तेव्हा हा वाद लवकर मिटेल असे मला काही वाटत नाही. मला मनापासून असे वाटते, की विषाणूचा उगम कसाही असला तरी उपचारांमध्ये असा काय फरक पडणार आहे ?
अगदी मान्य आहे.

तरी पण बघतो एक नजर टाकून. मलाही त्यांचा हेतू समजू शकेल. अर्थात वेळ लागेल.
काही हरकत नाही, तुम्हाला मी हक्काने विचारु शकतो असे वाटल्यानेच विचारणा केली. विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत आणि करोना- २ RNA या प्रकाराचा आहे हे आपल्यामुळेच मला पटकन समजले. :)

गेले दीड आठवडा मी विषाणूच्या त्रासातुन जात आहे, हा कोव्हिड आहे का ते ठावूक नाही पण अवस्था बेकार झाली आहे. कमालीचा अशक्तपणा आला आहे.
माझ्या बरोबरच माझ्या मातोश्री आणि तिर्थरुपांना देखील हे कष्ट उद्भवले आहेत. काळजी म्हणुन झिंक आणि व्हिटामिन -डी यांचा देखील समावेश औषधात केला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू

कुमार१'s picture

19 Sep 2020 - 8:13 am | कुमार१

डी डा,
धन्यवाद.

मबा ,
प्रथम लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. गरजेनुसार डॉ चा सल्ला अवश्य घ्या.
धीर धरून सकारात्मकतेने याला सामोरे जायचे.

गरजेनुसार डॉ चा सल्ला अवश्य घ्या.
हो,आमच्या फॅमेली डॉक्टर च्या सल्ल्याने औषधे घेतली आहेत. धन्यवाद.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video

कुमार१'s picture

19 Sep 2020 - 10:04 am | कुमार१

@ मबा

संदर्भ

त्याचा सारांश :

सध्याची महासाथ घडवणारा सार्स-२ हा नक्की कसा उगम पावला याबाबत सध्या दोन थिअरीज आहेत - नैसर्गिक आणि कृत्रिम( प्रयोगशाळेत घडवलेला).

१. नैसर्गिक थिअरीनुसार वटवाघूळातील करोना विषाणू आणि माणसातील सार्स-२ यांच्यात 96% जनुकीय साम्य आहे. मूळ वटवाघूळात असलेला हा विषाणू पुढे खवलेमांजरात गेला आणि तिथे त्याची उत्क्रांती झाली. त्यामुळे त्याला माणसात प्रवेश करणे सोपे झाले. बरेच वैज्ञानिक या थिअरीचे समर्थक आहेत.
२. आता या थिअरीला प्रस्तुत अहवालातून आव्हान दिले गेले आहे.

३. कृत्रिमची थिअरी मांडणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते त्यांच्याकडे याचे काही पुरावे आहेत. त्यांच्या थिअरीतील काही मुद्दे असे:

a. वटवाघुळातील विषाणू हा पायाभूत म्हणून वापरला गेला. पुढे त्याच्यावर प्रयोगशाळेत बदल केले गेले. त्यामुळे त्याच्या टोकदार प्रथिनाचे गुणधर्म बदलले.

b. म्हणून हा विषाणू मानवी शरीरातील एका विशिष्ट एंझाइम शी (ACE 2) संयोग करू शकला. त्यातूनच मानवी आजार घडला.

c. एवढेच नाही तर हा आजार प्रचंड संसर्गजन्य, सुरुवातीस कमालीचा लक्षणविरहित आणि पुढे खूप घातक क्षमतेचा झाला. त्यामुळेच सध्याचा हाहाकार घडला.

४. या वैज्ञानिकांनी या अहवालात नैसर्गिक विषाणूवर प्रयोगशाळेत कसे बदल करता येतात याचे साद्यंत वर्णन केलेले आहे. आता यावर नैसर्गिक थिअरीचे समर्थक काय स्पष्टीकरण देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

एकूणच, एकमत होणारा हा विषय नाही. विषयाच्या दोन्ही बाजूंना खंदे समर्थक आहेत.

सुबोध खरे's picture

25 Sep 2020 - 10:28 am | सुबोध खरे

वैयक्तिक पातळीवर विचार केला तर हा जिवाणू नैसर्गिक आहे कि कृत्रिम आहे याचा फरक पडणार नाही.

परंतु जर चीनने हा जैविक अस्त्र म्हणून निर्माण केला असेल तर त्याला जगभर भरपूर (कु)प्रसिद्धी देऊन चीनला त्याची प्रचंड किंमत मोजायला लावणे आवश्यकआहे.

असे केले तर एखादे नीच राष्ट्राला/ हुकूमशाहीला जैविक अस्त्र निर्माण करून जगाला वेठीस धरण्याचा विचार करण्यापासून परावृत्त करू शकता.

चीनच्या रुग्णांची / मृतांची संख्या ८३ हजार/४५०० नंतर चावी फिरवल्यासारखी कशी बंद झाली आणि आता चीनचा क्रमांक ४३ वर कसा घसरला. ( अर्थात कुणीच यावर विश्वास ठेवत नाही)

षडयंत्र गृहीतात (CONSPIRACY THEORY) दोन गोष्टी उद्भवतात-

१) चीन मध्ये काही लाख लोक मृत्यू पावले असून त्यांना सरळ जाळून टाकले असावे.वूहान मध्ये प्रचंड मोठी दहनगृहे कित्येक दिवस रात्रंदिवस चालू होते असे उपग्रहाच्या चित्रांवरून दिसून आलेले आहे.

२) चीन ने हा विषाणू तयार करण्याबरोबरच लस सुद्धा तयार केली परंतु सार्वत्रिक लसीकरण करेपर्यंत हा विषाणू चुकून प्रयोगशाळेतून बाहेर पडला आणि चीन च्या वूहन प्रांतात पसरला. यानंतर चीनने संपूर्ण लॉक डाऊन केले आणि सार्वत्रिक लसीकरण केले यामुळे हि रुग्ण संख्या वाढली नाही.

एखादे वेळेस दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या असाव्यात. म्हणजे प्रचंड संख्यने लोक मृत्यू पावले तेही लपवून ठेवले आणि सार्वत्रिक लसीकरण ही केले गेले असल्यामुळे साथ लवकर आटोक्यात आली.

जैविक अस्त्र निर्मिती बद्दल जगाला हीच शंका आहे कि प्रथम स्वतः साठी लस तयार करायची, आपल्या जनतेला सार्वत्रिक लसीकरण करून सुरक्षित ठेवायचे आणि शत्रूच्या देशात रोगराई पसरवून हाहा:कार माजवायचा.

हे काळे धंदे चीनने केले नाहीत असे कोणीही छातीठोकपणे म्हणू शकत नाही.

चीन मध्ये काय चालू आहे हे आपल्याला कळणे कधीच शक्य होणार नाही.

मराठी_माणूस's picture

25 Sep 2020 - 11:46 am | मराठी_माणूस

त्यांच्या कडच्या बातम्या न येणे हे खरेच आश्चर्यकारक आहे. गेले कित्येक दिवस हाच विचार मनात येत आहे.
जर त्यांच्या कडे ही साथ आटोक्यात आली असेल तर त्यांनी लस बनवली असण्याची शक्यता आहे, त्या बाबतीत सगळ्या जगाकडुन दबाव आणुन माहीती घेणे आवश्यक आहे. कमीत कमी अमेरिकेकडुन (त्यांची पॉवर लक्शात घेता आणि त्यांच्या कडे ही साथ अजुन आटोक्यात आली नसताना) तरी हे व्हायला हवे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2020 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जैविक अस्त्र निर्मिती बद्दल जगाला हीच शंका आहे कि प्रथम स्वतः साठी लस तयार करायची, आपल्या जनतेला सार्वत्रिक लसीकरण करून सुरक्षित ठेवायचे आणि शत्रूच्या देशात रोगराई पसरवून हाहा:कार माजवायचा.

पटण्यासारखं आहे, अगदी एखादं चलचित्र पॉज केल्याप्रमाणे तेथील रुग्ण संख्या संक्रमण अगदी अचानक थांबले आहे, कोणतीच बातमी बाहेर येत नाही. मात्र लस तयार केली असेल असे वाटत नाही. तसे असते तर कदाचित यव आणि त्यव माध्यमांवर दबाव असला तिकडच्या बातम्या बाहेर येत नाही असे सर्व असले तरी काही हेरांकडून अथाव तत्सम व्यवस्थेकडून लशीबाबत बातमी बाहेर आली असती असे वाटते. चीनी लोक मरण पावत असावेत किंवा भारतीयांप्रमाणे उपचार घेऊन बरेही होत असावेत अशीही एक शंका येते.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

29 Sep 2020 - 10:07 pm | मदनबाण

@ कुमार१
माहिती बद्धल धन्यवाद आणि आभारी आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)

चौकटराजा's picture

20 Sep 2020 - 10:25 am | चौकटराजा

आमच्या सोसायटीतील एक केस ..

दुपारी दीडच्या सुमारास पती घरून डबा घेऊन गेला ( रुग्णालय खाजगी ). ट्रीटमेंटला वीस दिवस झालेले . पत्नीने थोडेसे जेवण केले. पती घरी आला तो फोन " त्या सिरीयस झाल्या आहेत. पती तिथे पोचताच खुलासा त्या आता या जगात नाहीत. फक्त १ तासाचा खेळ ! ( सायटोकाईन स्टॉर्म ......?)

कुमार१'s picture

20 Sep 2020 - 10:50 am | कुमार१

चौरा,
यात बऱ्याच शक्यता असतात. रुग्ण समोर नसताना इथून नक्की काय ते सांगता येणार नाही. तसेच अन्य कुठला दीर्घ आजार आहे का हे पाहणे फारच महत्त्वाचे आहे.

दोन प्रकारच्या केसेस पाहण्यात आल्या :

१. मधुमेही + कोविड झाला. तो बरा झाला पण पुढे हृदयविकाराचा झटका आला व मृत्यू .
२. दाह प्रक्रियेतील चढउतार >> अचानक श्वसनअवरोध >> गंभीर होणे, हेही शक्य आहे.

चौकटराजा's picture

20 Sep 2020 - 11:58 am | चौकटराजा

सदर मयत स्त्री फक्त ४० वर्षांची एकदा बारा वर्षे वयाच्या मुलाची आई ! कोणताही दीर्घ आजार नसलेली ! पतीचे आईवडील , पती ,मुलगा सर्व करोनाग्रस्त झाले पण वाचले ! हीच फक्त बळी ठरली . यात असे लक्षात येईल की तिचा अनुवंश या सर्वापेक्षा भिन्न आहे. त्यानुसार काही म्युटेशन होऊन अचानक मरण आले असावे ! पुन्हा माझे " ते वाक्य आलेच ! " ओह गॉड , व्हॉट शाल आय डू टू लीड हेलदी लाइफ ?" चूझ यौवर पेरेंट्स केअरफुली माय सन " द गॉड सेड !!

कुमार१'s picture

20 Sep 2020 - 12:12 pm | कुमार१

अग्दी बरोबर .
दुसरे उत्तर नाही.

....यात असे लक्षात येईल की तिचा अनुवंश या सर्वापेक्षा भिन्न आहे. त्यानुसार काही म्युटेशन होऊन अचानक मरण आले असावे ! पुन्हा माझे " ते वाक्य आलेच ! " ओह गॉड , व्हॉट शाल आय डू टू लीड हेलदी लाइफ ?" चूझ यौवर पेरेंट्स केअरफुली माय सन " द गॉड सेड !! ...

१) अनुवंशाचा संबंध नाहीच असे नाही तो महत्वाचा घटकही असू शकतो, पण सर्व खापर त्यावर फोडणे कितपत रास्त आहे?
गोष्टी केवळ अनुवंशावर अवलंबून असत्यातर ९९ वर्षे अनुवंशाच्या बळावर तगलेला १०० व्या वर्षीही अनुवंशाच्या बळावर तगावयास हवा किंवा कसे आणि तसे नसेल तर गोष्टी केवळ अनुवंशावरही अवलंबून आहेत असे म्हणता येईल का ?

२) देवाने म्हटले आणि आपले अनुवंश दाते जन्मदाते सुपिरीयर अनुवंश देऊ शकणारे मिळवता आले तरी इतर अपघाताने अपंगत्व अथवा मृत्यू येऊच शकणार याची शाश्वती देता येऊ शकते का ?

३) सर्वात महत्वाचे समाज म्हणून उपलब्ध ज्ञानाच्या आधारावर उपलब्ध साधनांच्या मर्यादेत एकमेका सहाय्यकरू च्या भावनेने सर्व मानवांनी किमान अंतर, मास्क, आणि प्रत्येक स्पर्ष निर्जंतूकचे तत्व मनापासून अंगिकारले असते तर साथ पसरणे टाळता आले असते - ज्या अनुवंशाच्या बळावर एक स्त्री ४० वर्षे जगू शकली ती कदाचीत अजून दहा वर्षे जगू शकली असती. आणि अशाच ३९% टक्क्याच्या आसपास जो मृत्यूदर गतवर्षापेक्षा वाढला आहे अशा अनेक व्यक्ती अधिक काळ जगू शकल्या असत्या.

माणसे अपघातात मरतात हे म्हणणे हा एक भाग झाला अपघात घडण्यामागे कुणाचा कुठेतरी गलथानपणा झाला हे ही एक वास्तव असते ज्याबद्दल समाजाने अधिक संवेदनशीलपणे शीस्तीने अपघात मग रस्त्यावरचे असतील किंवा संसर्गाच्या प्रसाराचे असतील त्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण कारणीभूत होणार नाही याची अधिक दक्षता घ्यावयास हवी किंवा कसे ?

कुमार१'s picture

20 Sep 2020 - 2:56 pm | कुमार१

‘टाटा’ समूह आणि CSIR-IGIB यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोविड१९ च्या निदानासाठी भारतीय बनावटीच्या स्वस्तदर चाचणीला सरकारी मान्यता मिळाली आहे. तिचे शास्त्रीय नाव CRISPR test असून ‘फेलुदा’ या नावाने ती ओळखली जाईल.

तिची वैशिष्ट्ये:

१. RT-PCR च्या समकक्ष अचूकता
२. कमी वेळात निष्कर्ष
३. स्वस्त
४. सुलभ प्रक्रिया

संदर्भ

माहितगार's picture

20 Sep 2020 - 7:43 pm | माहितगार

स्तुत्य आणि अभिनंदनीय, ही नवीन चाचणी पद्धती लौकरात लौकर उत्पादन वितरण आणि चाचणी यशात सहभागी होऊ शकेल अशी अपेक्षा करूया.

कुमार१'s picture

24 Sep 2020 - 5:35 pm | कुमार१

ok

कुमार१'s picture

25 Sep 2020 - 11:49 am | कुमार१

कोविडमधून बरे झालेल्यांचे प्रमाण आता वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. याच्या दुसर्‍या टोकाला असेही काही रुग्ण आहेत की ज्यांच्या फुफ्फुसांना तीव्र इजा पोहोचली आहे. त्यामध्ये काही डॉक्टर्स आणि अन्य ‘योद्धे’ यांचाही समावेश आहे. अशा रुग्णांना व्हेंटिलेटर आणि तत्सम कृत्रिम श्वसन उपायांवर ठेवूनही बरे वाटत नाही. अशा गंभीर रुग्णांसाठी एका सर्वोच्च आधुनिक तंत्रज्ञानाचा (ECMO किंवा ELS) वापर केला जातो.

जगभरात सध्या २५०० रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यातून बरे झालेल्यांचे प्रमाण 40 ते 50 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. खूप खर्चिक असलेल्या या तंत्राचा अल्प परिचय करून देतो.

हा उपचार म्हणजे थोडक्यात रुग्णाला ‘कृत्रिम हृदय-फुफ्फुस यंत्रणेवर’ ठेवणे. यात नळीद्वारे रुग्णाच्या शरीरातील रक्त काढून ते या यंत्राला पोहोचवले जाते. यंत्रामध्ये त्यातील कार्बन-डाय-ऑक्‍साईड काढून घेऊन त्यात ऑक्सिजन भरला जातो .आता हे ‘शुद्ध’ झालेले रक्त रुग्णाच्या शरीरात पुन्हा नळीद्वारे पोचवले जाते.
यामागचा हेतू असा आहे. श्वसनकार्य पूर्णपणे यंत्रावर सोपवल्याने रुग्णाचे फुप्फुसांना विश्रांती मिळते आणि त्यामुळे विषाणूने केलेल्या इजेमधून बरे होण्याची संधी मिळते.

गुणसूत्रे,dna, RNA चे कोड आता माणूस बदलू शकतो त्याला हवा तसा बदल आता माणूस करू शकतो.

3d प्रिंटिंग नी मानवाचे अवयव प्रिंट करू शकतो.

कंप्युटर वर कोणत्या ही औषधाची चाचणी घेवू शकतो.
मानवी शरीराची प्रती रचना कंप्युटर वर करून.

अशा मोठा मोठ्या जाहिराती नावाजलेल्या पत्रिका नेहमी करत असतात.

ह्या जाहिराती खऱ्या आहेत असे समजले तर
कॅन्सर,मधुमेह,covid अत्यंत किरकोळ आजार आहेत .
ते असेच टाइम पास म्हणून बरे करायला पाहिजे होते.
पण साधे अत्यंत निकृष्ट काम
सफेद केस काळे करणे
नवीन केस उगवणे.
नवीन दात हवे तेव्हा उगवणे .
हे पण अजुन जमत नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2020 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सही हे.....! मनापासून आवडलं.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

28 Sep 2020 - 9:10 am | माहितगार

ह्या टाईम्स ऑफ इंडीया वृत्तानुसार ज्या राज्यात साथीचा प्रसार अधिक आहे तेथिल पॉझीटीव्हचे प्रमाण कमी होण्याची सांख्यिकीय शक्यता दिसते आहे त्याच वेळी इतर काही देशांप्रमाणे साथीची दुसरी लाट येऊ शकते म्हणून सतर्क आणि काळजी घेतली पाहीजे.

संघीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (संघीय शब्द संघ सरकारचे या अर्थाने केंद्रीयच्या एवजी वापरलाय) यांनी सनडे संवाद असा काही प्रकार, सोशल मिडीयावरून आलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा स्तुत्य प्रयत्न मागच्या तीन आठवड्यापासून चालू केलाय आणि त्यांच्या युट्यूब उपलब्ध होताहेत. अगदी केशकर्तनालयात काय काळजी घ्यावी अशा प्रकारच्या ते टिकात्मक प्रश्नांना उत्तरे देताना ते दिसतात. अगदी सामान्य नागरीक ते पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना ते उत्तरे देत आहेत. (हे आधी सुरू केले असते तर अधिक बरे झाले असतो) महत्वाचे म्हणजे दुसर्‍या राष्ट्रीय सेरोसर्वेचे निश्कर्ष लौकरच उपलब्ध होताहेत पण अजूनही हर्ड इम्युनिटी प्रकार भारतीयांसाठी दूर आहे आणि त्यामुळे मास्क सुरक्षीत अंतर आणि स्पर्षजन्यचे निर्जंतुकीकरण यावरील भर कमी करू नका जे याबाबतीत निष्काळजी करताहेत ते बरोबर नाही असे त्यांचे म्हणणे दिसते

मोदींची भाषणे ऐकल्यावर डॉ.हर्षवर्धनांचा बोलण्याचा वेग कमी वाटणे स्वाभाविक आहे युट्यूबला स्पीड वाढवून ऐकण्याची सुविधा वापरल्यास बोअर न होता त्यांचा व्लॉग श्रवणीय आणि माहितीपूर्ण वाटतो

संदर्भ

https://timesofindia.indiatimes.com/india/7-day-average-down-9-days-in-r...

https://youtu.be/-zp_JRl88LU

कुमार१'s picture

28 Sep 2020 - 9:58 am | कुमार१

माहितीबद्दल.
छान.

आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे आणि आता मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम कुचकामी झाले आहेत व्हायरस वरील नियम पाळत असाल तरी कोणालाही बाधित करू शकतो .
पण त्याची संहारक शक्ती कमी झाली आहे गंभीर परिणाम होण्याचे प्रमाण कमी झाले आहे पण बाधित करण्याची शक्ती वाढली आहे.
असे प्रतिष्ठित सायन्स मॅगझिन मध्ये वाचलं आहे.
हे खरे आहे का

मराठी_माणूस's picture

29 Sep 2020 - 10:03 am | मराठी_माणूस

असे प्रतिष्ठित सायन्स मॅगझिन मध्ये वाचलं आहे.

कोणते मॅगझिन , कोणता लेख इ. माहीती द्याल का ?

कुमार१'s picture

28 Sep 2020 - 3:21 pm | कुमार१

18 ऑगस्ट 2020 च्या Lancet मध्ये सार्स-2 विषाणूमधील एका विशिष्ट एका विशिष्ट जनुकीय बदलाचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. सदर अभ्यास सिंगापूरमधील आहे. त्यानुसार :

१.या बदलामुळे होणारा कोविड हा तुलनेने सौम्य आहे.
२. मात्र त्यामुळे त्याच्या फैलाव क्षमतेवरील परिणाम अनिश्चित आहे.
३. जगाच्या विविध भागातून या संदर्भातले अधिक अभ्यास व्हायची गरज आहे

कानडाऊ योगेशु's picture

28 Sep 2020 - 3:54 pm | कानडाऊ योगेशु

च्यायला म्हणजे हा व्हायरसही आपण काय करतो आहोत ह्यावर लक्ष ठेवुन आहे म्हणायचे : (

बदल होणे हे व्हायरस च्या जीवन चक्र चा भाग असावा .
माणसाला त्रास देण्यासाठी ते स्वतः बदलत नसावेत.
ह्या जगातील सजीव सृष्टी ची उत्पत्ती ची जिवाणू आणि विषाणू पासून झाली आहे.
ते नसतील तर जीव सृष्टी पण नसेल.
त्यांना खलनायक ठरवू नका

आता व्हायरस नी स्वतः मध्ये बदल केला आहे आणि आता मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम कुचकामी झाले आहेत व्हायरस वरील नियम पाळत असाल तरी कोणालाही बाधित करू शकतो .

१) व्हायरसची नवी म्युटेशन आली म्हणजे जुनी कार्यरत व्हर्शन आपोआप अस्तीत्वहीन झाली/ निकामी झाली हा निश्कर्ष राजेश १८८ रावांनी नेमक्या कोणत्या बळावर काढला ?

२) मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम हे सर्व श्वसनजन्य साथीचा प्रसार कमी व्हावा म्हणून उपयूक्त आहे. व्हायरसचे नवे म्युटेशन श्वसनजन्य मार्गानेच पसरत असेल तर मास्क, sanitizer, सोशल distance हे लगेच कुचकामी कसे होतात? सध्या साथ असलेल्या विषाणूने न गचकता माणूस वाचला तरी इतर गंभीर साईड इफेक्टची शक्यता असू शकते असे नव्या वीषाणू म्युटेशन बद्दल नाही याचे कोणते आश्वासन राजेशराव किंवा त्यांनी देऊ केलेल्या संदर्भात उपलब्ध आहे ?

मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम यांचे शक्य तेवढे पालन नेमके, कुणाचेही केवढे मोठे घोडे मारतात की त्याबद्दल अपप्रचारात आणि समाजातील निष्काळजीपणास कारण शोधणारी निष्कर्षघाईकरून हकनाक सामील व्हावे?

कुमार१'s picture

28 Sep 2020 - 4:37 pm | कुमार१

आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे !

🙂

गवि's picture

28 Sep 2020 - 4:43 pm | गवि

सिरियसली की गमतीने?

कुमार१'s picture

28 Sep 2020 - 5:34 pm | कुमार१

सिरियसली की गमतीने?

>>>
त्याकडे दोन्ही अर्थांनी बघता येईल !

यानिमित्ताने पोलिओ लसीचे संशोधक डॉ. Jones Salk यांचे एक अवतरण आठवले :

“ जर पृथ्वीवरील सर्व कीटक नाहीसे झाले, तर पन्नास वर्षांत इथले सर्व जीवनच संपेल. पण, जर पृथ्वीवरील मानवजात नष्ट झाली, तर मात्र पुढच्या पन्नास वर्षात इथे सर्व प्रकारची जीवसृष्टी बहरेल !”

कुमार१'s picture

28 Sep 2020 - 9:21 pm | कुमार१

“हा संसर्ग झालेल्यापैकी काहींचाच आजार गंभीर का होतो ?” हा लाखमोलाचा प्रश्न आपल्याला सतावतोय.

त्याची उकल करण्याचे दृष्टीने अनेक पातळ्यांवर संशोधन चालू आहे. आतापर्यंत गवसलेले काही मुद्दे असे :

१. विषाणूंचा हल्ला >> शरीरात विचित्र अँटीबॉडीज (ऑटो अँटीबॉडीज) तयार होतात >> त्या विषाणूचा प्रतिकार करण्याऐवजी आपल्या शरीराच्या प्रतिकार प्रथिनांनाच नष्ट करतात >> प्रतिकारशक्ती दुबळी पडते.

२. अशा काही रुग्णांत जनुकीय बिघाड आढळले आहेत. अशा जवळपास 13 जनुकांचा या दृष्टीने अभ्यास चालू आहे. अशा बिघाडाने या व्यक्तींच्या शरीरात interferons ही प्रथिने तयार होत नाहीत. (एरवी ही प्रथिने तयार होऊन विषाणूंचा नाश करतात).

मास्क, sanitizer, सोशल distance हे नियम यांचे शक्य तेवढे पालन नेमके, कुणाचेही केवढे मोठे घोडे मारतात की त्याबद्दल अपप्रचारात आणि समाजातील निष्काळजीपणास कारण शोधणारी निष्कर्षघाईकरून हकनाक सामील व्हावे?
सहमत
दुर्दैवाने याला दोन प्रकारची लोक विरोध करीत आहेत ( जगभर)
१) कॉन्स्पिरसी थेअरी वाले ( एवढी जगभर उलथापालथ होऊन सुद्धा)
२) टोकाचे भांडवलशाही...ज्यांना काहीही करून उद्योग धंदे हे चालूच राहिले पाहिजेत असे वाटते आणि त्या साठी ते सार्वजनिक स्वास्थ्याला दुय्यम स्थान द्यायला तयार आहेत ( पण ते हे विसरतात कि भांडवलशाहीत जर ग्राहक सुधृद नसेल तर काय खाक तुमची गोष्ट विकत घेणार)
३) भारतापुरते बोलायचे तर ,,, काहीही करा पण आपली नावडत्या पक्षाचे राज्य आहे ना ... मग फक्त विरोध करा )

कुमार१'s picture

29 Sep 2020 - 4:22 pm | कुमार१

कोविडची महासाथ यथावकाश संपेल. मात्र बराच काळ आपल्याला गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करावे लागेल.

सध्या बऱ्याच कार्यालयांत लोकांना आत सोडताना ताप आहे की नाही, हे यंत्राने पहात आहेत. निव्वळ ताप असणे म्हणजे काही कोविडचे निदान नव्हे. तसेच ताप नाही म्हणून कोविडची शक्यता पुसून टाकता येत नाही. यावर उपाय म्हणून तंत्रज्ञांना एका उच्चस्तरीय रोगनिदान तंत्राची कल्पना सुचली आहे.

कोविडबाधित व्यक्तीच्या श्वासातुन काही विशिष्ट रसायने ( VOCs) बाहेर पडतात. एक छोटे यंत्र जर आपण नाकाभोवती धरले आणि त्यात श्वास सोडला, तर संबंधित व्यक्ती बाधित आहे की नाही ते कळू शकेल. थोडक्यात, मद्यपी व्यक्ती जशी आपण उच्छवास चाचणी यंत्राने ओळखतो त्याच धर्तीवर ही चाचणी आहे. अर्थातच ही चाळणी चाचणी असणार आहे - रोगनिदान नव्हे.

या अत्याधुनिक तंत्राबद्दल पुढील प्रतिसादात लिहितो.

कुमार१'s picture

29 Sep 2020 - 4:25 pm | कुमार१

ok

या यंत्रामध्ये सोन्याच्या सूक्ष्मकणांचा (nanoparticles) समावेश आहे. प्रक्रिया अशी होते :

कोविडबाधित व्यक्ती यंत्रात श्वास सोडते. त्यामध्ये विशिष्ट रसायने असतात. त्यांचा व सूक्ष्मकणांचा संपर्क आला की विद्युत संदेश तयार होतात. त्यातुन व्यक्ती बाधित असल्याचा संकेत मिळतो. सध्या हे संशोधन चालू असून प्राथमिक पातळीवरील यंत्र तयार झालेले आहे ते वापरून कोविडबाधित आणि निरोगी लोक यांच्या चाचण्या झाल्यात.

सध्या हे तंत्र निदानातील अचूकता 76% दाखवत आहे. अधिक प्रयोग व प्रमाणीकरण यातून त्याची अचूकता उंचावेल अशी आशा आहे.
मशीन लर्निंग या संकल्पनेवर हे तंत्र आधारित आहे. या विषयावर इथल्या तंत्रज्ञांनी जरूर मत द्यावे.
वाचण्यास उत्सुक !

धाग्यावर जरासे अवांतर करतो आहे, त्यासाठी क्षमस्व.

Chief of Chief Minister’s Medical Assistance Cell in Maharashtra breaks down while describing the coronavirus situation in the state
HC refuses to intervene in Maha's move to not open temples

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)

मदनबाण's picture

29 Sep 2020 - 10:16 pm | मदनबाण

कोरोनाच्या अनियंत्रित फैलावामुळे मुंबईत १०००० बिल्डिंग सिल्ड करण्यात आल्या आहेत.
Coronavirus in Mumbai: 10,000 buildings in city sealed to curb spread of COVID-19

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)

मराठी_माणूस's picture

30 Sep 2020 - 11:26 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/mumbai-news/28900-buildings-in-mumbai-free-from...

२८,९०० इमारती मुक्त केल्या आहेत. अजुन एक दिलासादायक बातमी.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/for-the-first-time-in-over-a-m...

कुत्रा हा प्राणी corona बाधित व्यक्ती ला अचूक ओळखतो हे खरे आहे का?
लक्षण दिसण्या च्यातीन चार दिवस अगोदर च
कुत्र ओळखतो बाधित व्यक्ती ला

कुमार१'s picture

30 Sep 2020 - 9:27 am | कुमार१

कुत्रा हा प्राणी corona बाधित व्यक्ती ला अचूक ओळखतो हे खरे आहे का?

कोविडबाधित व्यक्तीच्या शरीरातील चयापचयात काही बदल होतात. त्यातून काही विशिष्ट रसायने तिच्या घामामध्ये उतरतात. या घामाच्या वासावरून कुत्रा ती ओळखू शकेल असे यामागचे तत्व आहे.

सध्या हे प्रायोगिक अवस्थेत चालू आहे. काही कुत्र्यांना तसे प्रशिक्षण दिले जात आहे. ऑगस्टमध्ये हा प्रयोग दुबई विमानतळावर करण्यात आला. आता या महिन्यात तो फिनलंड विमानतळावर करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम ऐच्छिक ठेवलेला आहे. या प्रवासात इच्छा असेल तो प्रवासी स्वतःच्या मानेभोवती हात फिरवून जो काय घाम येईल तो एका डिश मध्ये गोळा करतो आणि मग ती डिश कुत्र्यापुढे ठेवली जाते. ते हुंगल्यावर कुत्रा पंजा घासतो, खाली आडवा पडतो किंवा भुंकतो.

अद्याप याचे पुरेसे प्रयोग व्हायचे आहेत. कालांतराने चित्र स्पष्ट होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Sep 2020 - 11:12 am | प्रकाश घाटपांडे

भारतातही असे प्रयोग झाले पाहिजेत. स्फोटकांच्या बाबत श्वानांचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्याने मुंबई पोलिसांच्या जंजीर या भुभु मुळे अनेकांचे प्राण वाचले

मराठी_माणूस's picture

30 Sep 2020 - 12:35 pm | मराठी_माणूस

भारतात ही पण एक गोष्ट झाली पाहीजे.

https://www.loksatta.com/mumbai-news/ayurveda-modern-medicine-should-do-...

कुमार१'s picture

30 Sep 2020 - 12:08 pm | कुमार१

कोविडलस निर्मिती, वाहतूक व वितरणातील फायदे/तोटे : तुलना.

ok

कुमार१'s picture

1 Oct 2020 - 6:59 pm | कुमार१

या साथीच्या सुरवातीस हा आजार शक्‍यतो वृद्ध आणि अन्य व्याधीग्रस्तांना होतोय असे चित्र होते. परंतु गेल्या तीन महिन्यांत त्याचे चित्र बदलते आहे.

पन्नाशीच्या आतील आणि अन्य आजारविरहित लोकांनाही तो होतोय असे दिसते. अशा काही रुग्णांचे जागतिक अभ्यास आता प्रसिद्ध झालेत.

त्यात दखलपात्र असा गट म्हणजे कोविडमुळे मेंदूविकाराचा झटका (स्ट्रोक) आलेले रुग्ण. किंबहुना असा झटका येणे हेच त्यांच्या कोविडचे पहिलेवहिले लक्षण ठरले. या रुग्णांमध्ये आजाराच्या तीव्र दाह प्रक्रियेमुळे प्राधान्याने रक्तगुठळ्या निर्माण होतात. एक विशेष बाब म्हणजे त्यांना श्वसनाचा त्रास होत नाही. थेट मेंदूविकाराचा झटकाच येतो.

या बाबतीत काही प्रिव्हेंटिव्ह करता येण्यासारखे नसेल तर या माहितीने केवळ घबराट, चिंता पसरेल असं वाटतं का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2020 - 10:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच वाटले. हेतु माहितीचा असला तरी काळजी चिंता वाढू शकते याच्याशी सहमत. सध्या खट् वाजले तरी काळजी वाटायला लागते.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

2 Oct 2020 - 11:40 am | सुबोध खरे

गवि

मी आपल्याशी अतिशय सहमत आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय प्रथितयश तज्ज्ञ सुद्धा या घबराट पसरवण्यात नकळत सहभागी झालेले आहेत.

प्रेस्टिट्यूट सनसनाटी बातम्या देताना दिसतात यामुळे लोकांमध्ये घबराट( fear psychosis) पसरवली जाते.

पुनर्प्रादुर्भाव ( reinfection ) बद्दल रोज वर्तमान पत्रात काहींना काही येत आहे.

भारतात पुनर्प्रादुर्भाव ( reinfection) झालेले चार रुग्ण सापडले

यावरून अनेक अतिशय प्रथितयश तज्ज्ञ सुद्धा काळजी घ्या काही सांगता येत नाही म्हणून सर्वत्र बोलत असताना मी त्यांना स्वच्छ शब्दात सुनावले कि हि शक्यता किती आहे ? भारतात ६० लाख रुग्ण आहेत त्यापैकी ४ जणांना झाले.

याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि हि शक्यता एक लाखात एक पेक्षा कमी आहे.

आज तुम्ही बाहेर पडलात तर रस्त्यावर अपघाताने किंवा हृदय विकाराने तुमचा मृत्यू होण्याची शक्यता यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

मग तुम्ही अशी विधाने करून लोकात भीती पसरवत आहात असे वाटत नाही का? यावर एकाकडेही उत्तर नाही.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तज्ज्ञांना तोंडावर विचारल्या ज्याबद्दल त्यांच्या कडे उत्तर नाही.

जिन्क्स's picture

2 Oct 2020 - 7:41 pm | जिन्क्स

फसव्या "गुडी गुडी" माहिती पेक्षा वास्तविक माहिती घेण्याकडे प्राधान्य हवे. ह्या धाग्याचे तेच प्रयोजन असावे. एकाद्या माहिती बद्दल 1 टक्का जरी शक्यता असेल तरी ती माहिती लोकांपर्यंत पोचायला हवी तेंव्हाच कोरोनाची व्याप्ती समजेल.
कोरोनाच्या सुरुवातिच्या काळात तो गंभीर आजार नसून भारतात त्याची लाट येण्याची शक्यता नगण्य आहे अशी माहिती इथेच काही "मान्यवर" सदस्यानी दिली होती. आजचं देशातील चित्र फारच विदारक आहे. तेंव्हा कोरोनाची व्याप्ती समजली नव्हती आणि अजूनही तज्ञ मंडळी आजाराला समजून घेण्याचा प्रयत्नच करत आहेत. म्हणून कोणतेही गृहीतके धरून वंदरलँड मध्ये जगण्यापेक्षा वास्तववादी राहून परिस्थितीला सामोरे जाण्याकडे कल हवा.
कुमारजी तुमच्या ह्या धाग्यातून खूप चांगली माहिती मिळत आहे. ह्या धाग्यासाठी आणि तो अद्ययावत ठेवण्यासाठी धन्यवाद.

अजून काही उपयुक्त माहिती खालील लिंक मधून मिळेल
https://www.zee5.com/hi/news/details/zee-24-taas-exclusive-interview-with-dr-sanjay-oak/0-0-newsauto_5egc3shpleo0

कुमार१'s picture

2 Oct 2020 - 8:08 pm | कुमार१

जिन्क्स,
उपयुक्त दुवा. नक्की बघतो.
धन्यवाद !

हा आजार निव्वळ “श्वसनाचा” नसून त्याची शरीरातील व्याप्ती खूप मोठी आहे, हे जाणवून द्यावे याच प्रामाणिक उद्देशाने मी ती माहिती दिली आहे. तिच्या संदर्भात १० अभ्यासांतून निघालेला ९००० रुग्णांचा विदा आहे.

कोरोनाच्या सुरुवातिच्या काळात तो गंभीर आजार नसून भारतात त्याची लाट येण्याची शक्यता नगण्य आहे अशी माहिती इथेच काही "मान्यवर" सदस्यानी दिली होती.

अशी माहिती मीच धागा काढून दिली होती.

आणि ती जागतिक आरोग्य संघटनेच्या निघणाऱ्या परिपत्रकाची सोपे विश्लेषण लोकांना उपलब्ध व्हावे म्हणून बरेचसे तसेच्या तसे दिले होते.

दुर्दैवाने जागतिक आरोग्य संघटनेने इतकी उलट सुलट पत्रके काढून आज दिलेली माहिती उद्या फिरवली होती कि मी साफ तोंडघशी पडलो.

याबद्दल अनेक लोकांनी मला ट्रॉल सुद्धा केले/ करत आहेत. ( त्याने मला फरक पडत नाही हा भाग अलाहिदा)

अर्थात मला तो धागा लिहिला याचाच खेद आहे.

परंतु आजही अनेक बाबतीत इतकी चुकीची माहिती औषध कंपन्यांतर्फे दिली जात आहे कि याबद्दल काही बोलणे / लिहिणे हे मूर्खपणाचे ठरावे.

कॉव्हिडच्या भयगंडामुळे हृदयविकार आ णि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील.
उदा

Substantial increases in the number of avoidable cancer deaths in England are to be expected as a result of diagnostic delays due to the COVID-19 pandemic in the UK. https://www.thelancet.com/journals/lanonc/article/PIIS1470-2045(20)30388-0/fulltext

https://www.financialexpress.com/lifestyle/health/covid-19-and-cardiac-h...

The CDC and the National Center for Health Statistics report an all-cause provisional death count of almost 1.2 million people between February 1 and June 16, 2020. According to CDC estimates, the predicted number of excess deaths that have occurred within that same time period is between 102,641 and 140,023 people.

https://blog.definitivehc.com/effects-of-postponing-essential-care-due-t...

रुग्णांना आजार आणि उपचार या दोन्हींच्या माहिती बाबत अंधारात ठेवण्याचा एक काळ होता, आजही काही डॉक्टर अशी अपारदार्शकता पाळतात. पण डॉक्टरांसाठी आताशा रुढ होऊ लागलेल्या आदर्श संकेतात रुग्ण आणि नातेवाईकांना पुर्ण माहिती देणे अभिप्रेत समजले जाते किंवा कसे.

कोविड१९ ची माहिती प्रत्येक फोन सरशी दिली जाते लोक घाबरत असते तर लोकांनी अधिकतम अंतर मास्क बांधणे हि पथ्ये पाळली असती तसे तर फारसे होताना दिसत नाही.

आरोग्य जागरूकता विषयक माहितीचे प्रसारण लोकांना घाबरवण्यासाठी नाही काळजी कशी घ्यावी ह्या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केले जाते. आरोग्य विषयक लोकशिक्षणाच्या अभावी आजार आणि मृत्यूदर कमी असतील की अधिक असतील ? वुहान चीनमध्ये कोविड बद्दल सावधान करु इच्छित डॉक्टरला असाव विरोध केला गेला माहिती दाबण्याच्या प्रयत्नानेच कोविडचा प्रसार होण्यास हातभार लागला .

असंख्य आजारांची माहिती गेली अनेक दशके शालेय शिक्षणातून दिली जाते. असंख्य रुग्ण आणि परिचित गंभीर आजारांच्या स्वरुपाची सहज चर्चा करताना दिसतात. रेडीओ आणि टिव्हीवरून असंख्य आजारांच्या स्वरुपाची चर्चा चालू असते. हा निरंतर लोक शिक्षणाचा भाग आहे, यात माहिती घ्यावी पण उपचार हे डॉक्टरांच्या व्यक्तिगत सल्ल्याने घ्यावेत हे तत्व अंतर्निहीत असते. लोक घाबरतातचे तत्व लावायचे तर शालेय शिक्षण ते निरंतर शिक्षण यातून तयार केली जाणारी सर्व जागरूकतेचे प्रयत्न थांबवावे लागतील. लोक भितील म्हणून त्यांना गाडी काळजीपुर्वक चालव एवढेही सांगता येणार नाही कारण गाडी काळजीपुर्वक न चालवल्यास काय होते हे ही सांगता येणार नाही.

लाखात एका प्रकारचा एकच तर अपघात होतो हे म्हणताना अपघाताचे प्रकार हजार असू शकतात आणि एकुण अपघातांची संख्या वाढत असते, लाखात एकालाच होणारे हजार आजार असतील आजाराचा दर सहज १ टक्क्याला पोहोचतो. अगदी लेटेस्ट दुसर्‍या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष बघीतले तर कोविड१९ चे रुग्णसंख्या केवळ साठ लाख आहे हे स्वतः आयसीएमाआरलाही मान्य नाही.

इतर लोक चुकीची माहिती देतात म्हणायचे आणि डॉक्टरांनी स्वतः माहिती देण्यास विरोध करायचा हे तर्कपुर्ण ठरत नसावे किंवा कसे. लोक आजार होई पर्यंत सांगूनही घाबरत नाही आजार झाल्यावर घाबरतात, याच वाक्याचा दुसरा अर्थ कोणतीही माहिती सांगितली तरी बहुसंख्य लोक प्रत्यक्षात आजारीपडे पर्यंत घाबरत नाहीत.

कॉव्हिडच्या भयगंडामुळे हृदयविकार आ णि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील.

कोव्हीडची रुग्णसंख्या लोकांच्या भयगंडामुळे नव्हे कोव्हीड पसरू न देण्यासाठी आवश्यक काळजी न घेतली गेल्यामुळे वाढली. सर्वसाधारण वार्षीक मृत्यूदरापेक्षा वार्षीक मृत्यूदर ४० टक्के वाढले असतील तर कोव्हीडची साथ कमी गंभीर कशी ठरते ? उलट लोकांची व्यक्तीगत दक्षता, ट्रेस आणि टेस्टींग कमी पडल्याने रुग्ण शेवटच्या क्षणी येऊन अतीदक्षता विभागाचा ताण वाढत होता. कोविडची साथ पसरू देणे र्‍हुदयरोग रुग्णांना आणि कर्करोग रुग्णांना कसे अधिक सोईचे होते ? कोविडची जोखीम त्यांनाही अधिक नव्हीती की नाही ? म्हणजे दुसरीकडच्या गैरव्यवस्थापनाचे खापर माहिती प्रसारणावर फोडायचे आणि माहितीप्रसारणालाच विरोध करायचा हे चिनी गणित न उमगणारे म्हणावे किंवा कसे

काहीतरी गैरसमज होतोय. आजाराविषयी सर्व आवश्यक माहिती, प्रबोधन हे नुसतं चांगलंच नव्हे तर अत्यावश्यक आहे.

मुद्दा वेगळाच होता. थेट स्ट्रोकच येतो, किंवा काहीतरी पूर्वकल्पनाच न देता थेट मृत्यू गाठतो आणि अशा बाबतीत आपण काहीतरी वेगळी आगाऊ खबरदारी घेतल्यास ही शक्यता कमी होत असेल तर पूर्ण माहितीसंच एकत्र न आल्यास "निरुपयोगी घबराट" उत्पन्न होऊ शकते.

किती लोकांना असे अचानक भयंकर मृत्यू येत आहेत किंवा उपचार करताना आगोदरच रक्त गुठळ्या टाळण्यासाठी काही उपाय होत असतील का वगैरे हे एकत्र दिल्यास त्या भीतीचा सकारात्मक फायदा होईल.

काही सामान्य इन्फेक्षन्सनंतर (उदा आतड्यात संसर्ग करणारे तसे सामान्यपणे आढळणारे काही जुलाबजनक bacteria) काही लोकांना न्यूरोलॉजिकल सिन्ड्रोम होतो आणि ते काही काळ लुळे पडतात. अगदी श्वासाचे स्नायूही लुळे पडून व्हेंटिलेटर लागू शकतो. शरीराच्या इम्युन सिस्टीममधे अति उत्तेजना आल्यासारख्या प्रकारामुळे असं होतं अशी थियरी आहे.

हे उदा. 1 लाखात दोघांना होऊ शकतं. (दुर्मिळ). ते भयंकर आहे. पण त्यापायी जुलाब होणेच सर्वतोपरी टाळणे, कुठेच बाहेर अन्न न खाणे, सर्व अन्न डिसइफेक्ट करुनच खाणे अशी खबरदारी घ्यावी इतकी ती शक्यता जास्त आहे का? (नाही) इन्फेक्षन झाल्यावर जुलाब सुरु झाले की काही खबरदारी घेऊन हा पुढचा सिन्ड्रोम टळू शकतो का? (नाही)

एकदा दुर्दैवाने लुळेपणा सुरु झाला की किती वेळ हाती मिळेल? तेव्हा तातडीने काही उपाय सुरु केल्यास फरक पडतो का? (हो)

अशा प्रकारे माहितीसंच आल्यास त्याने घबराट न होता उपाय होईल.

कोरोनानंतर स्ट्रोक या बाबत वरील कंसातील उत्तरे वेगळी असू शकतील. ती अजून अज्ञात असू शकतील. तर मग फक्त "कोणतीही लक्षणे न दिसता थेट स्ट्रोक होतो" इतकेच जाहीर करणे हे ब्रेकींग न्यूजसारखे वाटते.

सर्वच माहितीबद्दल हे मत नसून त्या विशिष्ट एका प्रतिसादाबद्दल हे विवेचन आहे हे कृपया समजून घ्यावे.

सुबोध खरे's picture

3 Oct 2020 - 12:42 pm | सुबोध खरे

@माहितगार

कॉव्हिडच्या भयगंडामुळे हृदयविकार आणि कर्करोगामुळे उपचाराला उशीर झाल्याने होणारे मृत्त्यू हे कदाचित कॉव्हिडच्या मृत्यू पेक्षा जास्त असतील.

या भयगंडातून डॉक्टर्स ची सुद्धा मुक्ती झालेली नाही. माझ्या माहितीतील पन्नासच्या वर वय असलेले साधारण ४० % तरी विविध हृदयविकार, मेंदू किंवा शल्यक्रिया तज्ज्ञ आपले दवाखाने बंद करून घरी बसले होते. (यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत हा एक भाग). आता हेच सर्व डॉक्टर परत दवाखाने उघडून बसले आहेत म्हणजे जेंव्हा खरं तर रुग्ण संख्या कमी होती तेंव्हा यांनी दवाखाने बंद ठेवले होते. आणि आता सहा महिने पूर्ण झाले तेंव्हा काय करणार?म्हणून हळूहळू दवाखाने चालू केले आहेत.

काही डॉक्टर रोज भारताच्या कोपऱ्यात कुणीतरी डॉक्टर हुतात्मा झाला याची इत्यंभूत बातमी डॉक्टरांच्या ग्रुप वर टाकत असतात. यामुळे डॉक्टरांमध्येच किती भयगंड पसरतो हे मी रोज पाहतो आहे.

दुसरा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक वरिष्ठ नागरिक सातत्याने होणाऱ्या प्रचाराने बाहेरच पडलेले नाहीत. (ज्यांना उपचारासाठी बाहेर पडायचे आहे अशा अनेकांची मुले त्यांना बाहेर पडू देत नाहीत हि पण वस्तुस्थिती आहे.) यामुळे त्यांच्या चालू असलेल्या उपचारात खंड पडला आहे याचा परिणाम काय होईल हे येणाऱ्या काळात समजूनच येईल.

काही उदाहरणे. लोकल बंद असल्यामुळे अनेक कर्करोगाचे रुग्ण टाटा मध्ये जाऊ शकले नाहीत आणि खाजगी दवाखाने/ रुग्णालये सरकारने जबरदस्तीने कोव्हीड केंद्रात रूपांतरित केल्यामुळे (अशा रुग्णासाठी चालू नसल्यामुळे) लोकांची केमोथेरपी/ रेडिओथेरपी वेळेत होऊ शकली नाही.

कित्येक ठिकाणी छातीत दुखत असताना ज्याला अँजियोप्लास्टी करायला हवी होती त्यांना ती करता ना आल्यामुळे रोग बळावण्याची शक्यता बरीच वाढली आहे.

एक उदाहरण देतो आहे- एक ६५ वर्षाच्या मध्यमवर्गातील बाई लघवी करायला त्रास होतो म्हणून मागच्या शनिवारी आल्या होत्या. हा त्रास त्यांना जानेवारीपासून होतो आहे. सुरुवातीला आयुर्वेदिक औषधे घेऊन झाली आणि रोग वाढेपर्यंत लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांनी बाहेर न पडणे पसंत केले. माझ्या कडे आल्या तेंव्हा त्यांना गर्भाशयाच्या तोंडाचा (cervix) कर्करोग झाला आहे आणि तो मुत्राशयापर्यंत पसरून त्यात त्यांच्या डाव्या किडनीची नळी जवळ जवळ बंद झाली असे निदान झाले आहे. अर्थात हा रोग आता स्टेज ३ पर्यंत पोहोचला आहे.

मानेला असलेल्या गाठीवर ६ महिने उपचार झाला नाही अशा ३ केसेस आल्या. त्यात २ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले आणि एका २१ वर्षाच्या मुलीला लिंफोमाचे निदान झाले आहे.

एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला ओव्हरीचा कर्करोग झाला आहे. पण कोणतीही सोसायटी तिला काम करू देत नसल्याने उत्पन्न शून्य आहे आणि लोकल चालू नसल्याने टाटाला जाण्यासाठी प्रत्येक वेळेस टॅक्सी करणे तिला परवडणारे नाही. (टाटा मध्ये किती चकरा माराव्या लागतात याचा मी मागच्या वर्षी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेच) मी सोनोग्राफी मध्ये १ हजार रुपये सवलत दिली आणि बाकी ८०० रुपये नंतर आणून द्या (ते येतील अशी शक्यता मला तरी वाटत नाही) यापलीकडे मी काय करू शकेन?

यात कुणाला दोष देण्याचा हेतू नाही परंतु जी वस्तुस्थिती दिसते आहे ती नाकारता येत नाही.

माहितगार's picture

3 Oct 2020 - 1:59 pm | माहितगार

सरजी, पुन्हा एकदा अत्यंत आदरपुर्वक नमुद करु इच्छितो की,

१) काळजी करणे आणि काळजी घेणे यातील फरकांचे महत्व समजून घेणे आणि विषद करण्यात सुज्ञ समाज घटक म्हणून आपण (सर्वजण) कुठे तरी कमी पडल्याचे दिसते आहे. आणि भयगंड आणि संबंधीत परिणामांचे ते खरे कारण आहे. विश्वासार्ह सटीक माहितीचे वितरण नव्हे.

२) दुसरा प्रश्न आपत्ती आणि आरोग्य विषयक गैरव्यवस्थापनाचा आहे, त्याचे खापर विश्वासार्ह सटीक माहितीचे वितरणावर फोडणे सयुक्तीक दिसत नाही.

३) आरोग्य विषयक शक्य ती प्रत्येक माहिती मिळवणे आणि सयुक्तीक काळजी घेणे प्रत्येक व्यक्तीचा, कुटूंबांचा आणि समाजाचा नैसर्गिक अधिकार आहे आणि या अधिकाराचा संशोधक आणि आरोग्य सेवकांनी आदर ठेऊन आरोग्य विषयक शक्य ती प्रत्येक माहिती मिळवणे आणि सयुक्तीक काळजी कशी घेतली जाऊ शकेल ते माहितीवर पडदे न टाकता विषद केली पाहीजे ती एक जबाबदार समाज घटकांची नैतिक जबाबदारी आहे.

माझे तरी मत उपरोक्त प्रमाणे आहे. असो, मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

कुमार१'s picture

1 Oct 2020 - 9:28 pm | कुमार१

गवी
आजाराचे विविधांगी व बदलते स्वरूप सर्वांसमोर ठेवणे इतकाच हेतू आहे.

Rajesh188's picture

1 Oct 2020 - 10:03 pm | Rajesh188

the risk
Professor Zeberg explained that those who carry these Neanderthal variants have up to three times the risk of requiring mechanical ventilation. "Obviously, factors such as your age and other diseases you may have also affect how severely you are affected by the virus. But among genetic factors, this is the strongest one."
The researchers also found that there are major differences in how common these variants are in different parts of the world. In South Asia about 50% of the population carry them. However, in East Asia they're almost absent.
It is not yet known why the Neanderthal gene region is associated with increased risk of becoming severely ill. "This is something that we and others are now investigating as quickly as possible," said Professor Pääbo.

कुमार१'s picture

2 Oct 2020 - 2:42 pm | कुमार१

आता वयोगटांवर आधारित 2 महत्वाचे प्रश्न पाहू.

१. मुलांमध्ये कोविडचे प्रमाण बरेच कमी का आहे ?

जेव्हा विषाणू शरीरात घुसतो, तेव्हा त्याविरुद्ध शरीरप्रतिकार दोन टप्प्यांमध्ये होतो.
मुलांमध्ये असे होते :
a. पहिल्या टप्प्यातच विषाणू जवळजवळ नेस्तनाबूत होतो.
b. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दाहप्रक्रिया सामान्य स्वरूपाची राहते >> आजार जाणवत नाही.

याउलट प्रौढांमध्ये असे होते:
a. पहिल्या टप्प्यातल्या प्रतिकार मध्यम स्वरूपाचा राहतो.
b. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दाहप्रक्रिया गरजेपेक्षा जास्त उफाळून येते >> शरीर पेशींचा नाश.
…………………………………………
सध्या आपण मुलांचा जनसंपर्क ठरवून कमी ठेवलेला आहे. त्याचाही पूरक फायदा.

कुमार१'s picture

2 Oct 2020 - 2:43 pm | कुमार१

२. वृद्धांमध्ये कोविड गंभीर होण्याची शक्यता का वाढते ?

वृद्धापकाळी प्रतिकार शक्तीच्या घटकांमध्ये काही लक्षणीय बदल असे होतात :

a. ‘T’ पेशींची संख्या खूप रोडावते. या महत्त्वाच्या नियंत्रक पेशी आहेत.

b. दाहप्रक्रियेतील काही प्रथिनांचे प्रमाणही बरेच वाढलेले असते >> तीव्र प्रतिक्रिया व गंभीर आजार.

c. आणि जर अन्य दीर्घकालीन आजार असतील तर प्र-शक्ती अजूनच दुबळी होते.

मराठी_माणूस's picture

2 Oct 2020 - 3:50 pm | मराठी_माणूस
गोंधळी's picture

2 Oct 2020 - 8:27 pm | गोंधळी

sparay

AMSARVEDA mouth sanitizer spray covid -19 वर किती प्रभावशाली आहे???
कोणी वापरले आहे का?

कुमार१'s picture

3 Oct 2020 - 9:21 am | कुमार१

म मा, +११
सर्वोपचार पद्धती चांगलीच.

गोंधळी,

AMSARVEDA

>>> अशा उत्पादनांचे शास्त्रशुद्ध रुग्णप्रयोग झाल्याचे कुठे प्रकाशित केले असल्यासच त्यावर काही मत देता येईल.