झाडीत उठले पाखरांचे बोल
वारा पेरतो हिरव्या सुरांची ओल
पूर्व काठावर पाझरती सोनेरी कण
मुठीतला प्रकाश उधळीत आले लाल किरण
उतरली ऊन्हे नभाची उघडीत दारे
पिकात पसरलेल्या दवांचे झाले हिरे
धुक्यांच्या पुसून ओळी वृक्ष घेती आकार
खोप्यांतून उडाले चिमण्यांचे थवे चुकार
नवे रूप फुलवीत आली धरणी
हवेत झेपावले पक्षी मुखात घेऊन गाणी
प्रतिक्रिया
29 Jul 2020 - 11:46 am | मन्या ऽ
मस्त...!
29 Jul 2020 - 3:43 pm | गणेशा
धुक्यांच्या पुसून ओळी वृक्ष घेती आकार
खोप्यांतून उडाले चिमण्यांचे थवे चुकार
मस्त
29 Jul 2020 - 3:58 pm | चांदणशेला
धन्यवाद