मुक्या प्राण्यांची सेवा

सुरज जाधव's picture
सुरज जाधव in जनातलं, मनातलं
25 Jul 2020 - 7:31 pm

दिनांक - 22/07/2020
नेहमी प्रमाणे सकाळी 5.30 ला उठून धर हॅण्डल मार फायन्डल करत माझ आवडत मार्ग बहिरवली कडे निघालो, अतिशय निसर्गरम्य घनदाट जंगल आणि रस्त्याच्या एक बाजूने जगबुडी खाडी..खाडी पट्टा म्हणून ओळखलंजाणाऱ्या रस्त्याला सध्या लॉकडाऊन मुळे वाहनांची वर्दळ खूप कमी आहे,, तसा हा पट्टा वाळू-माफिया पट्टा म्हणून पण प्रसिद्ध आहे... निसर्गरम्य रस्त्यावर राइड करताना दुर्गम प्राणी, पक्षांचे दर्शन नाही झालं तर आश्चर्य म्हणावं लागेल..रान मांजर, माकड, सालीनदर, खवले मांजर, मूंगूस, भेकर, तसेच इंडियन पीट्टा, येल्लो बुरखा, सुतार पक्षी, आणि पक्ष्यांच्या खूप साऱ्या प्रजाती पाहायला मिळतात.जंगल व खाडी यांच्या मधून रस्ता गेल्याने बरेचसे प्राणी पक्षी पाण्याच्या उद्देशाने रस्ता ओलांडताना वाहनांन खाली येऊन मरण पावतात, काही जखमी होतात. हे अस दृश्य पाहिलं तर खूप वाईट वाटतं,, यावरच आधारित हा लेख लिहिण्याच प्रयत्न करतोय..
तर ही घटना आहे 22/07/2020 सकाळी 7 वाजले होते, बऱ्यापैकी अंतर कव्हर केला होता पाऊण तासात 12-13km कोरेगाव दरम्यन पोहचलो(सद्या पाय दुःखी मुळे 10km/hr avg मिळालं तरी खूप झालं )कोरेगाव सोडून जेमतेम 1.5km अंतरावर एका चढात चिमणीची दोन पिल्ले घरट्यातुन 10-12 फुटावरून रस्त्यावर पडलेली दिसली,, त्यातील एक मृत अवस्तेत तर दुसरा सुखरूप, त्याला पाणी पाजून वरती पाहिलं तर घरट्याजवळ पिल्लाचे आई बाबा पाहत होते, घरट झाडाच्या एका बारीक फांदीवर असल्याने झाडावर चढुन काहीच उपयोग होणार नव्हत,, मग थोडं वेळ फोटू शेषन केल आणि गाडी अथवा एखादा वाटसरूची वाट पाहू लागलो,, जवळ जवळ तास भर कोणीच आलं नाही, इतक्यात एक आजोबा आले साधारण 65-67च्या आसपास असतील त्यांना खांद्यावर घेऊन चढविणं थोडं धोकादायक वाटतं होत तरी त्यांना पिल्लू व घरटा दाखवून विचारलं , त्यावर आजोबा म्हणले आपण टाकण्यात आणि त्यांनी(चिमणीने) त्यात फरक आहे,, एवढं मोठं पिल्लू उचलून टाकणे शक्य न्हवत(चिमणीला),, म्हणून मी पुन्हा अर्धा तास वाट पाहिले कोणीच आलं नाही शेवटी आजोबांचं शब्दावर विश्वास ठेऊन मी मागे न फिरता पुढे 20 मिनिट जाण्याच ठरवलं,, पुन्हा रिटर्न येऊन पाहिलं तर पिल्लू तिथेच होत,, मग कोणाचीही वाट न बघता सरळ टॉप टाकून 3-7, 3-8, 3-9(सायकल गियर रेशो)करत घर गाठलं,, अंगणात सायकल लावून मिळेल ती गाडी घेतली आणि चुलत भाऊ(उदय जाधव) याला घेऊन निघालो,, साधारण 3-4 km शिल्लक अंतरावर गाडी बंद पडली, बापरे पेट्रोल सम्पल, आता काय मोबाईल रेंज नाही,, आजूबाजूला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबत होतो कोणीच हाकेला ओ दिला नाही,, मग पुढे 4km वर गावात पेट्रोल मिळेल, अस समजल्यावर आम्ही गाडी धक्का मारत एकदाचे गावात पोहचलो.
खिशात पैसे न्हवते तसाच सायकल वरून उतरून आल्याने तेवढं वेळ मिळाला नाही पाहायला, मोबाईल कव्हर मध्ये ओन्ली 70रु सापडले, पेट्रोल घायच म्हटलं तर 100रु लागनार एक बाटली ,, पोटात अन्न नाही, किशात पैसे नाहीत, त्यात हे गाडी बंद,, डोक्यात एक संभ्रम या ठिकाणी पण देव अस वागतोय.. इतक्यात त्या गावात माझा एक वर्ग मित्र त्या गावात राहतो हे चटकन डोक्यात आलं,, ग्रामस्थानकडे विचारून सरळ त्याच्या घराचा रस्ता धरला.. साहेबांची ओळख एका अमुक अमुक पक्षाचे नेते, वाळू बिसनेस, अमाफ पैसा etc, भावाला सांगितलं आता मस्त नाश्ता आणि चहा घेऊ, पैसे घेऊया आणि लगेच जाऊ वेळ न घालवता, साहेबांनी बाहेर यायला अर्धा तास घालवला, त्यात त्याला जास्त काही न सांगता गाडी बंद, पेट्रोल सम्पल,, त्यावर म्हणतो इथून जा तीते दुकानात मिळेल,, काय बोलणार आता !,, मग मीच बोलो पैसे कमी आहेत 70 आहेत कितीला मिळते एक बाटली तर 100मिळेल, आणि घरी जाऊन 10*3 नोटा 30रु घेऊन आला,, च्यायला कॉलेजला असताना आमची फुकट गाडी, मिसळ खाणार आज 30रु देऊन किंमत करतोय पण संयम ठेऊन आपल्याला वेळेला मदत मिळाली ना निघालो, पेट्रोल घायला गेलो तर 110रु , तिथे पण नशीब फुटकं,, आता काय तर द्या 100रु एवढं आहेत,, फायनली 55रु अर्धी बाटली द्याल तयार झाले,, माणुसकी नावाची गोष्ट नाही राहिली त्याच प्रत्यय आलं..
तसंच पळत पळत गाडी जवळ आलो अर्धी बाटली पेट्रोल ओतून पुढे जाऊया कि घरी रिटर्न अस विचार आलं पण त्या पिल्लाच चिव-चिव आवाज कानात घुमत होता,, दादाला जोरात आवाज दिला जिथे गाडी बंद पडेल तिथून रनींग करत घरी जाऊ पण पिल्लाला त्याच्या आई-बाबांन जवळ सोडायचंच, आणि किक मारून आम्ही पिल्ला जवळ गेलो, पिल्लाला घरंट्यात सुखरूप ठेऊन,, पुन्हा घरी निघालो..
या घटनेत काय मिळाला असेल तर तो आनंद, समाधान, आजकाल लोक पैश्याच्या मागावर लागलेत, समाजात माणुसकी नावाला शिल्लक राहिले.. लाइफ सेट होईल न होईल,, पैसे कमविन न कमविण पण माझा सायकल छंद, जंगली सफर, मुक्या प्राण्यांची सेवेचा व्रत मरेन तेव्हाच मोडेन

समाज

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

25 Jul 2020 - 8:09 pm | प्रमोद देर्देकर

माफ करा पण काही कळालं नाही. जर तुम्हाला पिल्ला घरट्यात ठेवायचं होते तर सायकलने घरी जावुन बाईकने पुन्हा त्या जागी कशाला आलात.

आणि इतका वेळा ते पिल्लु कुठे होते.