येत नाही...

अजब's picture
अजब in जे न देखे रवी...
21 Jul 2020 - 12:40 pm

हारण्याची* वेळ जोवर येत नाही
शक्यता नाकारता तर येत नाही...

प्रश्न हा भंडावतो आहे मनाला
का कधी प्रश्नास उत्तर येत नाही...

हा उन्हाचा दोष की माझा म्हणू मी?
सावली माझ्याबरोबर येत नाही...

टेकल्यावर रोज डोके, समजलो मी
पत्थराला कधिच पाझर येत नाही...

चोरले अन तोडले आहे हृदय तू
आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही...

दूरवर आलो कुठे आहे 'अजब' मी?
एवढे चालूनही घर येत नाही...

(*'हारण्याची'ऐवजी 'जिंकण्याची' वाचायलाही हरकत नाही.)

गझल

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

21 Jul 2020 - 2:04 pm | प्रमोद देर्देकर

मस्त आवडली.

संजय क्षीरसागर's picture

21 Jul 2020 - 2:31 pm | संजय क्षीरसागर

एवढे चालूनही घर येत नाही...

सध्या घरातल्या घरात चालल्यामुळे असं होतं असेल.

सावली माझ्याबरोबर येत नाही...

डोक्यावर छत्री असल्यामुळे सावली पडत नाही.

आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही...

एकदा विचारायचं डेरिंग करुन पाहा !

का कधी प्रश्नास उत्तर येत नाही...

प्रश्न ऑप्शनला टाका, काम तमाम !

श्वेता२४'s picture

21 Jul 2020 - 3:25 pm | श्वेता२४

आवडली

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2020 - 5:47 pm | अत्रुप्त आत्मा

छान..

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2020 - 5:48 pm | अत्रुप्त आत्मा

वि-डंबन येतय...
उमुमुमुं... हुंम्मम्ब!!! आ: ... होत नाही!

सत्यजित...'s picture

21 Jul 2020 - 10:34 pm | सत्यजित...

क्लास! सुंदर गजल!!

राघव's picture

21 Jul 2020 - 11:23 pm | राघव

चोरले अन तोडले आहे हृदय तू
आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही...

ही द्विपदी खास आवडली!