तू

Primary tabs

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
18 Jul 2020 - 11:44 pm

तूला आठवून, तूला गवसणे
अन् शब्दांतून तूला सजवणे
कधीही न्हवता छंद माझा
तरीही मला तू, नकळत सूचणे

अंगिकारू पाहील्या काही सवयी
तयातून मज तूझी उकल व्हावी
काय बरे त्या अद्भूत समयी
नशा तूझी मज वरचढ व्हावी

आठवणिंच्या प्रवासातले कही
क्षण तूझे माझे, विरळ कधी होतच नाही
तूझ्या माझ्या नात्याते धागे
विरळ कधी ते होतच नाही

तूझी कंती, खट्याळ लाजरे हसू, तूझा आवाज
प्रितीचा तूझ्या सावळा साज
नकारातम्क तूझा होकार
नाही रागाला कोणताही आकार

घायाळ करती नाजूक नयन
अगदी तूझ्या मनाचे दर्पण
स्पर्श कोमल तूझ्या हाताचा होता
ह्रीदयाचा ठोका चूकतो पटकन

मिठीत तूझ्या आगळीच दूनिया
तरंग उडती मनी माझीया
नको दूरावा, नको विरंगूळा
आतूर मनाला फक्त तूझा लळा।

प्रेमकाव्य