वारी नाही ...

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
1 Jul 2020 - 10:52 pm

वारी नाही बारी नाही
दिसणार हरी नाही
विठ्ठला रे तुझ्या विना
दुसरा कैवारी नाही

साल भर खपायचे
वावरात झिजायचे
एका दर्शनाने देवा
दु:ख सारे जिरायचे

पावसाच्या सरी माथी
पाया खाली घाट वाट
लाख लाख तूच सवे
मैल गेले पटापट

आला गाव गेला गाव
खाणे पिणे तमा नाही
मुखी नाव चित्ती रूप
बाकी काही जमा नाही

पाहताच शांत झाली
काळजाची घालमेल
दिसे रूप असे डोळा
आनंदच खोल खोल

काय पाप झाले देवा
नाही आता परवणी
घर झाले बंदीशाळा
डोळ्या मध्ये जमा पाणी

घोर किती जीवा मा‍झ्या
नाही येणे माहेराला
विनवणी हीच माये
तूच यावे भेटायाला

कविता

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

2 Jul 2020 - 10:15 am | कानडाऊ योगेशु

घोर किती जीवा मा‍झ्या
नाही येणे माहेराला
विनवणी हीच माये
तूच यावे भेटायाला

सुरेख....
आषाढी वारीच्या दिवसात पंढरीतले तसे रिकामे रस्ते पाहुन काळजात घालमेल झाली.