प्रयोजनाविण दिवा एकटा . .......... मरण न येण्याची स्थिती

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
18 Nov 2008 - 11:44 pm

प्रयोजनाविण दिवा एकटा, उगाच जळतो आहे
सरत्या वातीसरसे जळते, भोग जाळतो आहे
काजळ काळ्या काचेमधुनी, हवा मागतो आहे
जळत्या तेलासरसे उरले, थेम्ब मोजतो आहे

किती उजळल्या खोल्या आणिक, किती जाळल्या वाती
भिंती पडल्या वासे तुटले, तुटली उरली नाती
आता जगणे असेच जगणे, उरे न काही हाती
जगता जगता जळता जळता, संपून जाती वाती

-- सागरलहरी (उर्फ लहरी सागर)

माझे हे मि पा वरचे पहिलेच लि़खाण आहे. मला छंद वगैरे कळत नाही. सूचना व अभिप्रायांची प्रतीक्षा.

पार्श्वभूमी - माहीतीतील एक गृहस्थ पक्षाघाताने आजारी होते.
वृद्ध .. विधुर.. आयुष्य .. सुखे दु:खे सारे पाहून सोसून झालेले .. त्यांची अवस्था ऐकून .. वरील ओळी उतरल्या.
-- सागरलहरी (उर्फ लहरी सागर)

कविता

प्रतिक्रिया

सागरलहरी's picture

19 Nov 2008 - 6:23 pm | सागरलहरी

अरे देवांनो, मी मिपा वर पाडलेली पहिलीच कविता कुणी तरी वाचा रे !

अभिज्ञ's picture

19 Nov 2008 - 6:42 pm | अभिज्ञ

सर्वप्रथम मी देव नाही, तरिहि कविता वाचली. :)
आशय आवडला. अभिनंदन.
फक्त वातीसरसे,तेलासरसे हा शब्द प्रकार कळला नाही. वातीसरसे म्हणजे काय?
सरसे म्हणजे "संगे" का?

अवांतर-
थोडिशी मोठी लिहिता आली तर पहा.

अभिज्ञ.

अभिज्ञ's picture

19 Nov 2008 - 6:42 pm | अभिज्ञ

सर्वप्रथम मी देव नाही, तरिहि कविता वाचली. :)
आशय आवडला. अभिनंदन.
फक्त वातीसरसे,तेलासरसे हा शब्द प्रकार कळला नाही. वातीसरसे म्हणजे काय?
सरसे म्हणजे "संगे" का?

अवांतर-
थोडिशी मोठी लिहिता आली तर पहा.

अभिज्ञ.

चैतन्यकुलकर्णी's picture

19 Nov 2008 - 10:44 pm | चैतन्यकुलकर्णी

शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!

सागरलहरी's picture

19 Nov 2008 - 10:53 pm | सागरलहरी

जुन्या बुजुर्गातला कोणी माझे काव्य वाचेल काय ?
वृत्त कोणते छंद कोणता मज समजोनि सांगेल काय ?
आणिबाणिचे प्रशासक नवागताला न्याय द्या !
चैतन्य व अभिज्ञ यांचे मनःपुर्वक आभार.

हा कवितेतला आशय किंवा मूळ कल्पना चांगली आहे आणखी काही कडवी रचून ही अधिक फुलवता आली तर जास्ती रोचक होईल असे वाटते.
(बाकी गेय आहे, तालात म्हणता येते आहे. वृत्त मला माहीत नाही.)

(जाता जाता - विडंबन करण्यावाचून राहवत नाहीये ;)

प्रयोजनाविण कवी एकटा, उगाच दळतो आहे
सरत्या ओळीसरसे कळते, वाती मळतो आहे
काजळ काळ्या पेल्यामधुनी, 'दवा' मागतो आहे
ढळत्या तोलासरसे उरले, थेम्ब मोजतो आहे

किती उपसशी कापुस आणिक, कितीक मळशी वाती
विडंबकाने सुटी घेतली, मुळी न उरली भीती
आता कवने अशीच करणे, उरे न काही हाती
मळता मळता वळता वळता, संपून जाती वाती

चतुरंग

सागरलहरी's picture

20 Nov 2008 - 8:03 am | सागरलहरी

च्यायला विडंबन भन्नाट

वेताळ's picture

20 Nov 2008 - 11:29 am | वेताळ

काय लिहावे तेच मना सुचत नाही
पेल्यातील 'दवा' आता रिचत नाही.
वेताळ

लिखाळ's picture

20 Nov 2008 - 5:57 pm | लिखाळ

प्रतिसाद चुकून दोनदा आला.

लिखाळ's picture

20 Nov 2008 - 5:56 pm | लिखाळ

कविता छान आहे. आशय चांगला मांडला आहे.
दुसरे कडवे आशयाच्या दृष्टीने छान वाटले
काचेतुन हवा मागणे काही तितकेसे पटले नाही.

>>प्रयोजनाविण दिवा एकटा, उगाच जळतो आहे<<
यावर एक लहानशी गोष्ट आठवली. गोंदवलेकर महाराजांचे एक भक्त म्हातारपणाने बरे थकतात. ते महाराजांना विचारतात की मी इअतका म्हातारा झालो आहे, थकलो आहे, आता मला कशाला जिवंत ठेवले आहे?..महराज विचारतात की 'तुम्हाला मनाची शांती समाधान आहे का? ते गृहस्थ म्हणतात की हो. मी शांत समाधानी आहे. यावर महाराज उत्तर देतात की, 'शरीराच्या अश्या स्थितीत सुद्धा माणूस समाधान टिकवून ठेउ शकतो हे दाखवण्यासाठी रामाने तुम्हाला ठेवले असेल !'
-- (स्मरणशील) लिखाळ.

सागरलहरी's picture

20 Nov 2008 - 6:29 pm | सागरलहरी

हवा म्हणजे जीवन जगण्याची उर्मी
काजळ काळी काच = थकलेले शरीर

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 10:06 pm | रंगीला रतन

छान.