शून्य मी.. अनंत मी
पहाटवारा गाऊन जातो,
ऊन सोनसळी जरा विसावे,
मध्यान्हीची सरता काहिली,
कातरवेळी डोळा पाणी
अवचित वाटे हीच वेदना,
हीच कल्पना, हीच कविता,
विरून जाती शब्द परंतु,
गोडगुलाबी धुक्यापरी
मिटल्या डोळ्यातून आता,
कुणा दिसू दे चंद्र चांदवा,
मला न वाटे आस तयांची,
मीच सावळी रात्र काळी
माझे दुःख, माझे सुख,
माझे प्रश्न, माझे उत्तर,
माझी जीत,माझी हार,
माझे जीवन,माझे मरण
माझे माझे, माझे मीपण
सारेकाही असून माझे,
तरीही फक्त माझीच मी,
शून्यही मी अन् अनंतही मीच..
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
21 May 2020 - 12:23 am | कादंबरी...
अर्थ समजला नाही. मिपाकर अवलोकन करतीलच..
21 May 2020 - 6:53 am | गणेशा
वा सुंदर कविता..
मिटल्या डोळ्यातून आता,
कुणा दिसू दे चंद्र चांदवा,
मला न वाटे आस तयांची,
मीच सावळी रात्र काळी
हे तर अप्रतिम
सहज जुणे आठवले..
अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरणी माते..
जाणीव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते..
21 May 2020 - 7:20 am | चांदणे संदीप
एकदम अनंतात! ___/\___
सं - दी - प
24 May 2020 - 9:13 am | पाषाणभेद
तेच वाटले.
भावूक कविता.
21 May 2020 - 9:25 pm | जव्हेरगंज
सुंदर
+१
22 May 2020 - 11:34 am | प्राची अश्विनी
+1
23 May 2020 - 12:34 am | मन्या ऽ
नितांत सुंदर!
23 May 2020 - 11:55 am | तुषार काळभोर
+१
23 May 2020 - 8:05 pm | g.priya
सुरेख
24 Jul 2020 - 11:04 am | prajaktatoongar
कवितेत भावनिकता आहे.