Skip to main content

[कविता' २०२०] - शून्य मी.. अनंत मी

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 20/05/2020 12:03 या दिवशी प्रकाशित केले.

शून्य मी.. अनंत मी




पहाटवारा गाऊन जातो,
ऊन सोनसळी जरा विसावे,
मध्यान्हीची सरता काहिली,
कातरवेळी डोळा पाणी

अवचित वाटे हीच वेदना,
हीच कल्पना, हीच कविता,
विरून जाती शब्द परंतु,
गोडगुलाबी धुक्यापरी

मिटल्या डोळ्यातून आता,
कुणा दिसू दे चंद्र चांदवा,
मला न वाटे आस तयांची,
मीच सावळी रात्र काळी

माझे दुःख, माझे सुख,
माझे प्रश्न, माझे उत्तर,
माझी जीत,माझी हार,
माझे जीवन,माझे मरण

माझे माझे, माझे मीपण
सारेकाही असून माझे,
तरीही फक्त माझीच मी,
शून्यही मी अन् अनंतही मीच..



वाचने 10287
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

वा सुंदर कविता..

मिटल्या डोळ्यातून आता,
कुणा दिसू दे चंद्र चांदवा,
मला न वाटे आस तयांची,
मीच सावळी रात्र काळी

हे तर अप्रतिम

सहज जुणे आठवले..

अजून मी माझ्यातच जगते
कुठे किनारा धरणी माते..
जाणीव नाही कुणास माझी
प्रवास मी एकटीच करते..