कोण जमूरा कोण मदारी..

सेफ्टीपिन's picture
सेफ्टीपिन in जे न देखे रवी...
17 May 2020 - 6:32 pm

कोण जमूरा कोण मदारी

तीन पायांची शर्यत न्यारी
कोण जमूरा कोण मदारी

बुद्धिबळाच्या या पटावर
इथे नांदते घराणेशाही
लोकशाही टांगून खुंटीवर
प्रजेस बोलायची चोरी

लोण्यावरती ठेवूनि डोळा
इमानाच्या खोट्या शपथा
सरड्यासंही वाटावा हेवा
वजीराची तर बातचं न्यारी

हत्ती, घोडे आणि उंटही
फिरता वारे चाल बदलती
मोह-मायेचे हे पुजारी
कसली निष्ठा अन कसली भक्ती

प्याद्यांची पण कथा निराळी
निसुगपणाची दाट काजळी
'संकटाच्या' तव्यावर देखील
शेकती स्वार्थाची पोळी

कोरड्या घोषणा भाबडी आशा
प्रजा बिचारी केविलवाणी
सावळ्यासंही गहिवर येई
सावळा गोंधळ दरबारी

स्वतःभोवती गिरक्या घेत
राजा सांगे प्रजेस कहाणी
'मी', 'माझे', 'पूर्वज माझे' अन कर्तृत्व तयांचे..
.............
रुळांची उशी... खडीचे अंथरूण...
दाटले आभाळ... पापण्यांवर पाणी

तीन पायांची शर्यत न्यारी
कोण जमूरा कोण मदारी

कविता माझीकवितामदारी

प्रतिक्रिया

कौस्तुभ भोसले's picture

17 May 2020 - 8:06 pm | कौस्तुभ भोसले

छान

मदनबाण's picture

18 May 2020 - 5:01 pm | मदनबाण

छान !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...

कादंबरी...'s picture

21 May 2020 - 10:46 pm | कादंबरी...

छान कविता. अर्थपूर्ण. विचार करायला लावणारी.

बबु's picture

22 May 2020 - 12:55 pm | बबु

ही तीन पायान्ची शर्यत इन्डिया आणि भारतामधे आहे.

सौन्दर्य's picture

22 May 2020 - 6:46 pm | सौन्दर्य

नेमेची येतो पावसाळा ह्या म्हणी प्रमाणे निवडणुका होतात, स्वताला साक्षर सुशिक्षित म्हणवणारे, "सगळेच उमेदवार वाईट" म्हणून मतदानाप्रती उदासीनता दाखवतात. मात्र गरीब, गरजू न चुकता अगदी रांगेत उभे राहून मतदान करतात, त्यांचे उमेदवार निवडून येतात आणि मग सुशिक्षित त्यांच्या नावाने खडे फोडायला लागतात. जोपर्यंत निवडून आलेल्या उमेदवाराला त्याचा पाच वर्षांचा काळ संपायच्या आधी जनता माघारी बोलवू शकत नाही (अमेरिकेत ती तरतूद आहे) तोपर्यंत कालपरत्वे आपणच जमुरा आणि आपणच मदारी. निवडणुका होईपर्यंत आपण मदारी व त्यानंतर आपणच जमुरा, निवडून दिलेले उमेदवार मदारी.

रुळांची उशी... खडीचे अंथरूण...
दाटले आभाळ... पापण्यांवर पाणी

निशब्द