आत्म दीपो भव

Kaustubh bhamare's picture
Kaustubh bhamare in जे न देखे रवी...
8 May 2020 - 1:30 am

बुद्ध,,,,,
काय दिले तू मानवजातीला?,,,,

शांती,,,
ती तर केव्हाच कैद झाली आहे
रक्तपिपासू,साम्राज्यवादी,शोषित भांडवलशाहीच्या महत्वकांक्षेत,,,,

संयम,,,
नजर टाकून पहा कुचकरून टाकलेल्या कळ्यांकडे
अहंकारी पुरुषी वासनेने संयमाच्या कधीच चिंधड्या उडविल्या,,,,

हास्य,,,
पहा बर तुला सापडते का?
भुकेने तडफडणाऱ्या निरागस बालकांच्या चेहेऱ्याआड,,,

सत्य,,,
असत्यतेचा नंगानाच चालणाऱ्या स्वार्थी बाजारात
सत्य,,,,सत्य केव्हाच कवडीमोल ठरले,,,

ज्ञान,,,
मदमस्त सत्ता आणि मोह,लोभित मक्तेदार
उपभोगत आहे ज्ञानाला बनवून आपली दासी,,,

अहिंसा,,,
खोट्या अहंमसाठी एकमेकांच्या नरडीचे घोट घेणे
हेच वर्तमानात हिंसेचे तत्वज्ञान होऊ पाहतेय,,,

शील,,,
चोरी,व्याभिचार, अनैतिकता,व्यसन,खोडारडेपणाचे
अधिष्ठान चढवून समाज कधीच झोपी गेला,,

सत्व,,,
प्राण्यापासून माणसापर्यंत नेणारे मनुष्यतत्व
आज विकार ग्रस्त होऊन आपले सत्व विसरले,,

बुद्धा,,,
का दिलेस मानवजातीला हे मुक्तीचे मूल्य?,,,

घेऊन प्रश्नांचा भडिमार
असत गडद अंधाऱ्या रात्री मी
नैराश्याच्या गर्तेतेत जाऊन बसतो,,,

नजर जाते माझी
शितल चंद्रमाकडे,,,

बुद्ध पौर्णिमेचा तो चंद्रप्रकाश
हळू हळू उतरतो माझ्या हृदयात,,,

सर्वांगात पसरते प्रज्ञेचे अधिराज्य
त्यातून निनादतो फक्त एकच आवाज,,,

आत्म दीपो भव,,,

- कौस्तुभ

कविता

प्रतिक्रिया

Kaustubh bhamare's picture

8 May 2020 - 1:38 am | Kaustubh bhamare

अस्तू

मन्या ऽ's picture

8 May 2020 - 7:46 am | मन्या ऽ

वाह!

संजय क्षीरसागर's picture

8 May 2020 - 9:11 am | संजय क्षीरसागर

फारच विस्तृत झाल्यानं, शेवटच्या ओळी परिणाम साधत नाहीत

कौस्तुभ भोसले's picture

8 May 2020 - 10:02 am | कौस्तुभ भोसले

वाह