पहिली रात (धुवांधार द्वंद्व)

केशवटुकार's picture
केशवटुकार in जे न देखे रवी...
16 Nov 2008 - 3:13 pm

देवद्वार छंदात कविता करणार्‍या कवींची लाट पाहुन केशवटुकाराला जाग आली अन त्याला आठवली त्याच्या प्रातःस्मरणीय सदगुरु केशवसुमारांनी दिलेली धुवांधार द्वंद्वाची दिक्षा. अन उत्स्फुर्त द्वंद्व झाले ते रामजींच्या या सुरेख कवितेबरोबर : पहिली रात (देवद्वार)

छंद कवितांची |
झुल पांघरली |
कवींची टोळी |
आली सखे ||

मंद त्या बेण्यांची |
लावतो मी वाट |
बस तु मुकाट |
कवियत्री ||

केश्याचा टुकार |
आता बहकेल |
कविता फाडेल |
वैतागुन ||

लाट ही सरेल |
छळ ही थांबेल |
मन सुखावेल |
मिपावरी ||

-
आपलाच
(सर्वसामान्यांसाठी धाउन आलेला)

केशवटुकार

विडंबन

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

16 Nov 2008 - 3:17 pm | विजुभाऊ

(सर्वसामान्यांसाठी धाउन आलेला)
हळु धावरे भौ.....दम लागेल.
दम लागण्यापेक्षा अंगात दम असलेला चांगला.
बाकी काय म्हण....कविता दमदार आहे

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2008 - 3:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे सह्ही ना भिडू!

लाट ही सरेल |
छळ ही थांबेल |
मन सुखावेल |
मिपावरी ||

आमेन! ;-)

आपलाच
हे कधीपासून?
(सर्वसामान्यांसाठी धाउन आलेला)
व्यायामाचं भलतंच मनावर घेतलेलं दिसतंय.

(गद्य आणि रटाळ) अदिती

फक्त एक चूक, शुद्धलेखनाची! ;-) कवयित्री हा मूळ शब्द आहे कवियत्री नव्हे!

(शुद्ध) अदिती

आनंदयात्री's picture

17 Nov 2008 - 12:49 pm | आनंदयात्री

>>फक्त एक चूक, शुद्धलेखनाची! कवयित्री हा मूळ शब्द आहे कवियत्री नव्हे!

अहो सुदलेखनाला मारा फाट्यावर !!

मनीषा's picture

16 Nov 2008 - 8:21 pm | मनीषा

कल्पनांची जया
वानवा हो भारी
तो उसनवारी
करितसे |

विडंबने अशी
सोसवेना भार
जाच होई फार
जाण तुच |

सर्वसामान्य (परंतु छंदबद्ध कविताप्रेमी)
मनीषा

केशवटुकार's picture

17 Nov 2008 - 2:34 pm | केशवटुकार

कल्पनांची मारे
वाजवुन टिमकी
रुच्ची ला गच्ची
जोडितसे |

कवितांचा मार
भावनाही भरमार
सोसवेना भार
जाण तुच |

(अतिसामान्य)
केशवटुकार

मनीषा's picture

17 Nov 2008 - 6:17 pm | मनीषा

विडंबन कवी
बिचारा बहुत
बसला धुंडीत
कच्चा माल |

ऐकूनी टिमकी
धाव घेई त्वरे
लेखणी सावरे
आशाळभूत |

(टीप : - कृपया विडंबन कवींनी ह. घ्या , विडंबन ही सुद्धा एक कलाच आहे जी सहजसाध्य नाही हे मान्य )

आजानुकर्ण's picture

17 Nov 2008 - 6:39 pm | आजानुकर्ण

६-६-६-४ हे नियम पाळावेत अशी विनंती करतो.

आपला
(विनीत) आजानुकर्ण

आनंदयात्री's picture

17 Nov 2008 - 6:41 pm | आनंदयात्री

हाण .. हाण !! बेलाची कमतरता भरुन काढलीस !!
=))

मनीषा's picture

17 Nov 2008 - 6:47 pm | मनीषा

छंद अंमळ फसला आअहे ...
कृपया आपण दुरुस्त करावा .. (जमल्यास)

आनंदयात्री's picture

17 Nov 2008 - 6:50 pm | आनंदयात्री

जमल्यास ??
अहो कर्णाच्या प्रतिभेवर शंका ??
दाखव रे कर्णा २-३ काव्य पाडून !!

आजानुकर्ण's picture

17 Nov 2008 - 8:12 pm | आजानुकर्ण

केटु,
बघ दोन विडंबने पाडली.

सापडला मला
माल बघा कच्चा
आहे भारी लुच्चा
विडंबक

धाव घेई त्वरे
ऐकोनी टिमकी
बाई ती खमकी
लगाबगा

आपला
(खमका) आजानुकर्ण

आनंदयात्री's picture

18 Nov 2008 - 9:09 am | आनंदयात्री

_/\_
जियो शेठ ... जियो !!
मानलं आपण तुम्हाला !!

>>आहे भारी लुच्चा
>>विडंबक

=))

>>धाव घेई त्वरे
>>ऐकोनी टिमकी

अगायायाया ....... =)) =))
अहो तरीही तुम्ही विडंबक लोक म्हणजे परप्रकाशितच !! अहो काव्य बिव्य पाडायला लै प्रतिभा वैगेरे लागते .. काय खायच्या गप्पा आहेत का ?

-
आपलाच

(लुच्चा)
आंद्याकर्ण

सर्किट's picture

18 Nov 2008 - 9:17 am | सर्किट (not verified)

अहो तरीही तुम्ही विडंबक लोक म्हणजे परप्रकाशितच !! अहो काव्य बिव्य पाडायला लै प्रतिभा वैगेरे लागते .. काय खायच्या गप्पा आहेत का ?

व्व्वाआ ! काय बोललात !!! मस्त !!

अहो, स्वप्रकाशित लिखाण करायला आपण काय भाईकाकांचे विद्यार्थी आहोत ?

-- (परप्रकाशित) सर्किट

(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 2:19 pm | विसोबा खेचर

मस्त कविता..! :)

'कवींची टोळी' हा शब्द तर क्लासच.. :)

तात्या.

चतुरंग's picture

17 Nov 2008 - 7:04 pm | चतुरंग

एकदम छंदोबद्ध विडंबन! कविंची टोळी आवडली!! :)
(म्हणजे छांदिष्ट विडंबन छान वाटतं हे सिद्ध केलंस तर गड्या! ;) )

चतुरंग

लिखाळ's picture

17 Nov 2008 - 7:05 pm | लिखाळ

कवींची टोळी आणि धुवांधार द्वंद्व आवडले :)
-- लिखाळ.