डोहातील गर्ता जर्द..
ते डोळे जहरी होते!
खग निष्पाप जरी तो..
ते व्याधच कहरी होते!
गावातील नाती तुटती..
ते कपडे शहरी होते...
स्वातंत्र्य कुणाला येथे?
[मन स्वतःच प्रहरी होते..]
पणतीची वातीवर भिस्त!
तम दाहक लहरी होते!
--
तृष्णांची मनात वस्ती..
अन् मुखात श्रीहरी होते..
राघव
प्रतिक्रिया
31 Mar 2020 - 8:34 pm | प्रचेतस
क्या बात है...!
अतीव सुंदर.
1 Apr 2020 - 10:44 am | राघव
बाकी तुमचं मेळघाट वाचतोय. :-)
1 Apr 2020 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली रचना. लिहितं राह्यचं.
-दिलीप बिरुटे