आमची प्रेरणा अगस्ती यांची कविता हात तुझा हातात......
मला कसा हा म्हणतो मेला.... क्षणभर दे मजला
लाज वाटते अता तुला तर....नंतर दे मजला
नकोस बांधू कुंपण कारा स्वतः भोवती तू
भेटण्यास जर वेळ नसे तर, ...... नंबर दे मजला
सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा??
आनंदाने जगण्यासाठी.... भरपुर दे मजला
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या
संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला
कसे जमावे माझे आता माझ्या पत्नीशी?
माय तिची ही कटेल केव्हा...उत्तर दे मजला
किती पहावी वाट सखे तू सांग जरा मजला
असेल जर होकार द्यायचा...लवकर दे मजला
'संध्या'काळी आचमनाला बसला हा ' केश्या'
दे ! दे ! साकी आज जरा ... नवसागर दे मजला
----केशवसुमार
प्रतिक्रिया
20 Dec 2007 - 5:44 pm | लबाड मुलगा
झक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्आस......................वा
20 Dec 2007 - 6:09 pm | विसोबा खेचर
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या
संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला
क्या बात है केशवा! झकास लिहिले आहेस...
तात्या.
20 Dec 2007 - 6:22 pm | मनोज
केशवसुमार मस्तच रे :)
आपलाच,
मन्या
20 Dec 2007 - 6:49 pm | अगस्ती
वा वा वा वा वा वा,
मित्रवर्य केशवसुमार,
अप्रतिम विडंबन. झक्कास झाले आहे. एकदम सुंदर. मतला, मक्ता आणि दुसरा शेर तर फारच वरचा झालाय. लय म्हणजे लय म्हणजे लयच भारी.
माझी गझल सार्थकी लागली.
अगस्ती
27 Dec 2007 - 7:14 pm | सुधीर कांदळकर
असेच लिहीत राहा.
4 Feb 2008 - 8:59 pm | सख्याहरि
'संध्या'काळी आचमनाला बसला हा ' केश्या'
दे ! दे ! साकी आज जरा ... नवसागर दे मजला
... वा वा मस्तच ... लईच भारी
-सख्याहरी
5 Feb 2008 - 12:36 pm | मयुर
विस्कळीत पत्ते अजूनी हातामध्ये माझ्या
संपव माझा डाव एकदा...जोकर दे मजला
सुरेख विडंबन.
जिकले आम्हाला.
आपला
मयुर
5 Feb 2008 - 2:39 pm | प्रशांतकवळे
क्या बात है!
केशवा, सुंदर लिहीलेस!
प्रशांत