होयसाळेश्वर मंदिर शिल्पे

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
15 Mar 2020 - 9:29 am

हळेबीडु येथील होयसाळेश्वर मंदिरावरचे शिल्पांचे काही फोटो इथे देत आहे. साधारणपणे अडीच तीन फुट उंचीची ही शिल्पे सात ते दहा फुटांवर आहेत. त्या खाली नऊ नऊ इंचांचे हत्ती, घोडे, व्याल, शरभ ,सिंह तसेच वादक ,नर्तकांचे शिल्पपट दिसतात. बरीच शिल्पे चांगल्या अवस्थेत आहेत. होयसाळ जैन --हिंदू धर्मीय होते त्यामुळे दोन्ही शिल्पे दिसतात. फक्त जैनांची अशी दोन देवळे (= बस्ती/ बसदि ) इथून जवळच आहेत.
हे फोटो ४ मार्च २०२० या दिवशी काढले आहेत.)
फोटोंच्या मथळ्यात काही चुका असतील तर त्या सुधारण्यात येतील.
( सहल माहिती कर्नाटका समुद्र आणि सह्याद्री - २ या लेखात सापडेल.)
फोटो १
द्वारपाल (डावा)


फोटो २
ब्रह्माणी

फोटो ३
गोपाल गोवर्धन


फोटो ४
शिल्पट थर

फोटो ५
नंदी

फोटो ६
मुरलीधर

फोटो ७
गरुड

फोटो ८
गरुड आणि नाग


फोटो ९
जैन मुनिवर

फोटो १०
गरुडारुढ लक्ष्मी विष्णू

फोटो ११
इंद्र इंद्राणी

फोटो १२
नरसिंहाकडून हिरण्यकश्यपुवध

फोटो १३
त्रिदेव आणि लक्ष्मी

फोटो १४
मुरलीधर, शालभंजिका(सालवृक्षाची फादी धरलेली नायिका, ब्रह्मा

फोटो १५
नायिका

फोटो १६
गरुडारुढ विष्णू, मकराच्या जबड्यातून गजेंद्राची सुटका. मकर थोडासा मुंगुसासारखा दिसत आहे.

फोटो १७
शिवतांडव

फोटो १८
शालभंजिका


फोटो १९
कमळात बसलेले लक्ष्मी विष्णू


फोटो २०
नंदीस्वार शिवपार्वती

फोटो २१
विष्णू आणि शिव

फोटो २२
शिवाकडून दैत्य(?)वध

फोटो २३
गजासुरवध

फोटो २४
दुर्गेकडून वध ?

फोटो २५
माहेश्वरी ?

हळेबीडु च्या होयसाळेश्वर मंदिरापासून जवळच (तीनशे मिटर्स) असलेल्या 'पार्श्वनाथा आणि शांतिनाथा बसदि ' म्हणजे जैन देवळातले काही फोटो पुढे देत आहे.
पार्श्वनाथा बसदीत ठेवलेले शिलालेख -
१) लेख १

२) लेख २

३) लेख ३

४) लेख ४

५) लेख ५

६) पार्श्वनाथ मूर्ती

७) शांतिनाथ मूर्ती.

===============

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 Mar 2020 - 10:37 am | प्रचेतस

काय भरजरी शिल्पं आहेत ही. होयसळ कला नाजूक भरजरी कामासाठी विख्यात आहे. निव्वळ अप्रतिम.

शशिकांत ओक's picture

15 Mar 2020 - 11:48 am | शशिकांत ओक

आपल्या रचनात्मक कॅमेऱ्यातून पाहताना आनंद द्विगुणित होतो.

फोटो विकिमिडिया कॉमन्सवर चढवले आहेत ( या लेखातले गूगल फोटोतले आहेत.) पण एक गोची झाली. मोबाईलच्या landscape mode मध्ये घाईघाईने shoot झालेले असल्याने त्याच्या कॉमन्सच्या image link ने फोटो आडवे उमटतात. image attribute मध्ये style ="transform : rotate(90deg);" वापरल्यावर सरळ होतात पण मोठी जागा व्यापून टाकतात - इतर लेखनावर पसरतात.

विकिमिडिया कॉमन्स फोटोंचा exif data (metadata) copy करते. जे आवश्यक आहे. फोटोला app वापरून modify केले तर तो exif data उडतो.

तुषार काळभोर's picture

15 Mar 2020 - 4:05 pm | तुषार काळभोर

इतकं सुंदर, नाजूक, शिल्पकाम प्रत्यक्षात आणखी मनोहर दिसत असेल!!

कंजूस's picture

15 Mar 2020 - 4:38 pm | कंजूस

विकिकॉमन्स मधून

फोटो १) द्वारपाल डावीकडचा


फोटो २) नंदी


जालिम लोशन's picture

15 Mar 2020 - 4:45 pm | जालिम लोशन

सुदंर

कंजूस's picture

15 Mar 2020 - 4:46 pm | कंजूस

फोटो ३ ) गरुडावर लक्ष्मी विष्णू


फोटो ४) गरुड


तुषार काळभोर's picture

15 Mar 2020 - 4:56 pm | तुषार काळभोर

इतकं सुंदर, नाजूक, शिल्पकाम प्रत्यक्षात आणखी मनोहर दिसत असेल!!

चौकटराजा's picture

15 Mar 2020 - 10:20 pm | चौकटराजा

वरील फोटो पाहून महाराष्ट्रामधील काय भारतातील सर्वच शिल्प कामापेक्षा बेलूर हळेबिडू यांचा दर्जा किती उच्च आहे हे कळून येते !

प्रचेतस's picture

16 Mar 2020 - 12:56 pm | प्रचेतस

होयसळ शिल्पे अतिशय नाजुक कलाकुसरीने मढलेली असली तरी त्यांचे उणेपण चेहऱ्यांवरील अविभार्वात आहे असे ती शिल्पे बघता जाणवते. चेहऱ्यावर अत्यंत रुक्ष भाव दिसतात. युद्धांतील शिल्पांच्या चेहऱ्यावर आवेश, किंवा युगुल शिल्पांच्या चेहऱ्यावर उत्कटता अशी ती जाणवत नाही. हे काहीसे दागिन्यांनी नक्षशिखांत मढलेल्या एखाद्या पुतळ्यासारखे वाटते.
या उलट वेरुळमधील दशावतार लेणीतील स्थौण नृसिंहाचे शिल्प बघा. काय तो आवेश आहे चेहऱ्यावर, भृकुटी ताणल्या गेल्या आहेत, दाढा विचकल्या गेल्या आहेत, डोळे खोबणीतून बाहेर येत आहेत आणि अविश्वासाने भेदरलेला हिरण्यकश्यपू सुटकेची धडपड करतो आहे. अगदी जिवंत शिल्प आहे हे.

अनिंद्य's picture

16 Mar 2020 - 3:48 pm | अनिंद्य

@ प्रचेतस, फोटोतल्या युद्धशिल्पांमध्ये फारसा आवेश दिसत नाही आहे, सहमत.
पण सौष्ठव आणि नजाकत वादातीत.

प्रचेतस's picture

16 Mar 2020 - 7:06 pm | प्रचेतस

त्या बाबतीत प्रश्नच नाही, अजोड अशी शिल्पं आहेत ही.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Mar 2020 - 1:04 am | मिसळलेला काव्यप्रेमी

फार सुंदर!

अनिंद्य's picture

16 Mar 2020 - 11:28 am | अनिंद्य

ऐश्वर्यशाली शिल्पे आहेत !
फोटो तुम्ही एक सो एक घेतले आहेत, खूप छान.

होयसळ शिल्पांच्या ( १०-१२ शतक)भावात उणेपण आहे हे खरंय. तसं पाहिलं तर गुप्त काळापर्यंत (सहावे शतक) शिल्पे जिवंत होती नंतर चेहरे प्लास्टिक झाले. १४-१५ शतकांत तर भव्यता हेच प्रधान कारण झाले.

चौकटराजा's picture

16 Mar 2020 - 2:23 pm | चौकटराजा

येथील बरीच शिल्पे स्वतः स्वतन्त्र कलाक्रुती आहेत. ती प्रसंगाची पॅनेल नाहीत. प्रसंग आला की निश्चित भाव आले . तरीही वरील काही चित्रात मंद स्मित तुम्हाला दिसून येईल !

छायाचित्रे खूपच छान टीपली आहेत.

शेखरमोघे's picture

18 Mar 2020 - 8:39 pm | शेखरमोघे

सुन्दर शिल्पान्चे सुन्दर छायाचित्रण!!
ही शिल्पे मूर्तिभन्जकान्च्या तडाख्यातून सुटली हे आपले किती मोठे भाग्य!!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2020 - 10:41 pm | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम!

सुंदर शिल्पकलेचे सुंदर फोटो !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Na Karo Corona virus ko Na Karo Stay Home Stay Safe Lead India

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Mar 2020 - 5:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त मजा आली बघताना,
पैजारबुवा,