आयनाच्या बायना
करोना काय जायना
कायप्पाच्या भात्यातले
रामबाणबी चालंना
लसूण झाली कापूर झाला
गोमूत्रानंबी हटंना
एक एक करत
देश गिळतोय
तोडगा काय सापडंना
वेट मार्केटी जलमला ह्यो
शेअर मार्केटला सोडंना
चिनी माल तकलादू पन
ह्यो माल तुटता तुटंना
आयनाच्या बायना
करोना काय जायना
प्रतिक्रिया
10 Mar 2020 - 3:44 pm | माहितगार
:)
10 Mar 2020 - 4:53 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lahu Munh Lag Gaya... :- Goliyon Ki Rasleela Ram-leela
11 Mar 2020 - 8:31 am | ज्ञानोबाचे पैजार
चीन ने पहिल्यांदाच इतका टिकाउ माल बनवला असेल
तशीही चीनला सगळ्या बाजारपेठा काबीज करण्याची सवय आहेच ही पण सोडली नाही त्यांनी
वरती बाणरावांनी लावलेले दोन्ही व्हिडो मार्मिक आहेत.
पैजारबुवा,