अपुर्ण

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
8 Mar 2020 - 12:01 pm

अपुर्ण

का कोरतेस, काजळ तु कुरंग नयनात,

नसेल बघणार मी, तर श्रुंगार व्यर्थ आहे

*

का लिहितिस त्या भावपुर्ण कविता

नसेल गाणार मी, तर ते शुष्क शब्द आहेत

*

जरी माळला ,सुगंधित मोगरा तु कुंतलात

स्पर्षाविना माझ्या, तो साजणे, गंधहिन आहे

*

लावलेस जरी अस्मानि सुर तु गळ्यातुनि

माझ्या साथि विना ति मैफित अधुरी आहे

*

जरी जगात प्रेम आहे, हे पुर्ण सत्य आहे

तरी माज्या विणा साजणे, मात्र सारे मिथ्य आहे

*

का रेखाटतेस हट्टाने ,सुख चित्र भविष्याचे

भरु देत रंग मजला, अन्यथा ते बेरंगी आहे

*

समजुन घे, तु माझी,मी तुझा हे प्राक्तन आहे

एकमेका विना आपल्या दोघांचे जिवन अपुर्ण आहे

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

9 Mar 2020 - 10:12 am | चांदणे संदीप

कविता छान आहे फक्त थोडी फूटात-मीटरात बसवायला हवी होती. :)

अपूर्ण

का कोरतेस, काजळ, तू कुरंग नयनात,
नसेल बघणार मी, तर श्रृंगार व्यर्थ आहे

का लिहितेस त्या भावपुर्ण कविता?
नसेल गाणार मी, तर ते शुष्क शब्द आहेत

जरी माळला, सुगंधित, मोगरा तू कुंतलात
स्पर्शाविना माझ्या, तो साजणे, गंधहीन आहे

लावलेस जरी अस्मानि सूर तू गळ्यातुनि
माझ्या साथीविना ती मैफील अधूरी आहे

जरी जगात प्रेम आहे, हे पुर्ण सत्य आहे
तरी माझ्याविना साजणे, मात्र सारे मिथ्य आहे

का रेखाटतेस हट्टाने, सुख चित्र भविष्याचे
भरूदेत रंग मजला, अन्यथा ते बेरंगी आहे

समजून घे, तू माझी मी तुझा, हे प्राक्तन आहे
एकमेकांविना आपल्या दोघांचे जीवन अपूर्ण आहे

सं - दी - प

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2020 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीपसेठ, यांनी कविता मस्त बसवली. छान आवडली.

-दिलीप बिरुटे
(रसिक)

काका रफारापूर्वीचं अक्षर नेहमी दीर्घ लिघायचं. अपूर्ण असं.
-दिलीप बिरुटे
(मास्तर)

===========================

गृदेव हि कोणती तुमची लीला ?

आमचा देव आता आमचाच नाही राहिला

अहो कुठं कुठं शोधू तुम्हा

तूच माउली तूच ब्रम्हा

का वैराग्य आणिशि जीवा

कुठं विरला चुंबनांचा ठेवा

मती खुंटत गेली लया

गृदेव निजरूप दावा

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Mar 2020 - 3:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

संदिपची सुधारीत आवृत्ती आवडली,
खिलजी काका तुमची मनोकामना लवकर पूर्ण होवो
पैजारबुवा,