लयीत एका झुलवीत

Primary tabs

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जे न देखे रवी...
14 Feb 2020 - 7:45 am

लयीत एका झुलवीत
--------------------------------
लयीत एका झुलवीत
केसांची महिरप काळी
गुलाब पांघरुन अंगावरती
जाशी कुठे गं सकाळी ?

तारुण्याने नव्या तुझ्या
झालीस तू बावरी
किती जपावं तुला कळेना
झाली नजरही भिरभिरी

तुझ्या कटाक्षांनी आम्हा
वेड लागायची गं पाळी

पाहताना तू आमच्याकडे
करू नको अनमान
तुझ्या नजरेसाठी आम्ही
जीव करू कुर्बान

गोड अति रूप तुझं
फुलांनी भरली डहाळी

तुला जायचं तर जा
जशी तुझी मर्जी
तुझ्या कोमल पायांपाशी
आमची एक अर्जी

पुन्हा न दिसण्याची शिक्षा
लिहू नको ह्या भाळी

--------------------------
वॅलेंटाईन डे साठी -

बिपीन
-----------

कविता