कोण कुठली रोहिणी

Primary tabs

Rohini Mansukh's picture
Rohini Mansukh in जे न देखे रवी...
12 Feb 2020 - 10:05 am

अगणित आकाशगंगा
अगणित सूर्य गगनी
अगणित असती धरणी
त्यातून कोण कुठली रोहिणी?

काय तिचे सुख
नि काय तिचे दुःख
विश्वाच्या उलाढालीपुढे
आहे ते नगण्य

काय तिचे हेवे
नि काय तिचे दावे
एवढ्या भव्य संसारापुढे
क्षुद्र ते ठरावे

काय तिचे ज्ञान
काय तिचे विज्ञान
चराचराच्या गूढापुढे
नाही त्याला स्थान

म्हणूनच नम्र रहावे तिने
गर्व नको तिच्या मनी
अगणित मानवांमधून एक आहे
कोण कुठली रोहिणी

- सौ. रोहिणी विक्रम मनसुख

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

सगळ्यांची सुखदुःख तितकीच लहान असल्यामुळे, तुलनात्मकरित्या ती आजिबात लहान नाहीत, त्यामुळे रोहिणीने स्वतःला अगदी महत्वाचे समजावे :p

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Feb 2020 - 1:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रोहिणीचं महत्व आम्ही काय सांगायचं. पुराणात म्हटलंय की चंद्राच्या सत्तावीस पत्नीपैकी एक सर्वात सुंदर म्हणजे रोहिणी. तेजस्वी, सुंदर, स्वच्छ वस्त्र परिधान करणारी. जसं जसा चंद्र रोहिणीजवळ जातो तसं तसा चंद्र खुलायला लागतो. रोहिणीचे देवता ब्रह्म. रोहिणी मुळात सुंदर, पतीवर प्रेम करणारी, आणि सुखात रमणारी असते, असे म्हणतात.

-दिलीप बिरुटे

Rohini Mansukh's picture

13 Feb 2020 - 5:51 pm | Rohini Mansukh

रोहिणीचे (ह्या नावाचे) महत्व सांगणारी कविताही रचली आहे. नंतर कधीतरी पोस्ट करेन.

येऊ द्या मिपावर.

छान लिहिताय.