शब्दवेध- भाग २

Primary tabs

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
17 Jan 2020 - 11:43 pm

मित्रांनो

अगोदरच्या भागात न आलेले सर्व शब्द एकत्रित इथे देतो.

१- समरसता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, १४ एप्रिल २०१६ रोजी साजरा करण्यात आलेल्या १२५व्या जयंती दिवसापासूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने शासकीय कामकाजात ‘सामाजिक समता’ ऐवजी ‘सामाजिक समरसता’ या शब्दाचा वापर सुरू केला असून यापुढे त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक समरसता दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे
संघाचा जाणीवपुर्वक समता या शब्दाला विरोध आहे त्याच्या मते समरसता हेच अधिक योग्य असे मुल्य आहे. या मागे असलेली विचारसरणी डॉ. भालचंद्र मुणगेकर खालील शब्दात व्यक्त करतात ते म्हणतात्

"रा.स्व.संघाला अभिप्रेत ‘समरसता’चा अर्थ ‘विषमतेसह सहजीवन’ (co-life with inequality). आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रामुख्याने सामाजिक जीवनात जात, लिंग, भाषा, धर्म यांच्या आधारे प्रचंड असमानता अथवा विषमता असली तरीही सहजीवन जगले पाहिजे, हे विषमतेने पोळून निघालेल्यांना सांगणारा मंत्र म्हणजे ‘समरसता.’ विषमतेविरुद्ध आंदोलन अथवा संघर्ष न करता तिचे भक्ष्य ठरलेल्यांनी समाजपुरुषाला वंदनीय मानून त्याच्याशी तादात्म्य पावणे म्हणजे समरसता. हाताची पाचही बोटे सारखी नसतात; परंतु ती एकसंध असल्यामुळे ती जशी हाताचे कार्य पार पाडतात, त्याप्रमाणे समाजपुरुषाचे असमान वा विषम स्तरांवर असलेले समाजघटक परस्परांशी सहकार्याने आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात, हे मनावर बिंबवणारी विचारसरणी म्हणजे समरसता. ‘तुम्हीही आमचेच आहात, एकत्र राहण्यातच समाजपुरुषाचे हित आहे’ असे सांगत जातीव्यवस्थेची दाहकता विसरायला लावणारी विचारप्रणाली म्हणजे समरसता."
वरील बहुतांश भाग संघाच्या एकुण विचारसरणीस पाहता पटण्याजोगा आहे. संघाची समता या सरळ शब्दाला पर्याय म्हणून समरसता शब्दाची निवड अचुक वाटते.
मात्र हा जो समरसता शब्द आहे याचा शोध घेतल्यावर एक जयशंकर प्रसाद यांच्या कवितेत हा शब्द वा त्याच पुस्तकात अर्थ ही दिलेला आढळला त्या कवितेच्या ओळी अशा
विषमता की पीडा से व्यस्त , हो रहा स्पंदित विश्व महान ; यही दु:ख सुख विकास का सत्य, यही भुमा का मधुमय दान्
नित्य समरसता का अधिकार, उमडता कारण जलधि समान; व्यथा से नीली लहरो बीच बिखरते सुखमणी गण ध्युतिमान्

इथे मात्र जो समरसता या शब्दाचा अर्थ दिलेला आहे तो वेगळा वाटतो.
" समरसता = दो तत्वो की ऐसी स्थिती मे आ जाना कि दोनो की सत्ता रहते हुए भी दोनो के सभी प्रकार के भेद समाप्त हो जाए."
प्रसाद यांनी स्वत: या शब्दाच्या व्याख्येत " बोधसार" चा खालील श्लोक दिलेला आहे.
" जाते समरसानंदे द्वैतमप्यमृतोपमम , मित्रयोरिच दाम्पत्यो जीवात्मपरमात्मन:"
( जिस प्रकार दम्पति का द्वैत समरसावस्था मे- सब प्रकार के भेदो के मिट जाने के कारण - आनन्ददायक होता है उसी प्रकार जीवात्मा और परमात्मा के समरस हो जाने पर द्वैत भी अमृतोपम आनन्द देनेवाला हो जाता है )
या शब्दाचा हा अर्थ बघितल्यावर हा तितकासा बोचत नाही . दुसरी एक रोचक बाब म्हणजे संघ इथे नेहमीसारखा दांभिक दिसत नाही म्हणजे सरळ आम्ही समता मानत नाही आम्ही इतर वेगळेच आहेत हे मान्य करु फक्त समरस होण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडुन केला जाईल असे आश्वासन जणु या शब्दामार्फत दिलं जातं असावं.

२-विदग्ध

याचे विविध अर्थ आढळतात यातला दग्ध हा भाग अगोदर बघा पटकन आठवणारा शब्द पश्चातापदग्ध याचा अर्थ पश्चतापाच्या अग्नित जळालेला
तसेच दाते शब्दकोशातील विदग्ध चे विविध अर्थ खालील प्रमाणे दिलेले आहेत.
1) विदग्ध (p. 2830) विदग्ध—धावि. १ करपलेलें; जळलेलें. 'शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें का विदग्धें ।' -ज्ञा १५.९.
२ अर्धकच्चें; अर्धवट शिजलेलें (अन्न).
३ अर्धवट करपलेलें व अर्धवट कच्चें (अन्न).
४ दुउत्तम शिजलेलें; चांगलें भाजलेलें (अन्न वगैरे). 'शुष्कसुपक्व विदग्ध । चतुर्विंध अन्नें उत्तम खाद्य ।'
५ (ल.) कुशल; चतुर; हुशार; निष्णात. [सं. वि + दह्-दग्ध]
६-विदग्धाजीर्ण-न. अन्न अर्धवट पचल्यामुळें होणारें अजीर्ण. यांत घशाशीं आंबट येतें. टार प्रकारच्या अजीर्णांपैकीं एक प्रकार.

यातील चतुर कुशल या अर्थाने एक शब्द आढळतो विदग्धपरिषद म्हणजे अशा चतुर लोकांची सभा
याच अर्थाने बोलण्यात चतुर माणसासाठी वाग्विदग्ध व वचनासाठी विदग्धवचन इ.
आता एक मोठे कन्फ्युजन इथे असे आहे की एकाच शब्दाचा अर्थ एकदम परस्परविरोधी अन्नाच्या बाबतीत दिलेला आहे.
एकीकडे ३ अर्धवट करपलेलें व अर्धवट कच्चें (अन्न).
दुसरीकडे उत्तम शिजलेलें; चांगलें भाजलेलें (अन्न वगैरे).
याची काही जोडणी लावता येत नाही. असो
तर विदग्धा चा अर्थ ब्रह्मा ने जिची निर्मीती केलेली आहे अशी एक अप्सरा असा ही आहे.
आणखी एक अर्थ Vidagdha (विदग्ध) चा .—One who is expert in the art of attracting women. म्हणजे प्ले बॉय या अर्थानेही होतो.

https://www.wisdomlib.org/definition/vidagdha
तसेच
2) विदग्ध वाड्मय (p. S0222) विदग्ध वाड्मय—न. अभिजात वाड्मय; ललित व उच्च दर्जाचें वाड्मय [सं.] हा ही एक अर्थ आहे.
या संदर्भात मा.गो. वैद्य म्हणतात
" कालदृष्ट्या वाड्मयाचे दोन भाग आहेत. एक आहे आर्ष म्हणजे ऋषिनी लिहिलेले अर्थात प्राचीनतम . प्रथम भाषा आली आणि नंतर व्याकरण, अलंकार वगैरे आले. व्याकरणाचे नियमच तयार झालेले नसल्यामुळे प्रचलित नियम न पाळता लिहेले गेलेले जे वाड्मय ते झाले आर्ष. इंग्रजीत अशा वाड्मयाला archaic म्हटले जाते. व नंतर जे उत्तरकालीन सुघटित वाड्मय निर्माण झाले त्याकरीता इंग्रजी शब्द आहे classical आणि या classical साठी आपण वापरलेला शब्द आहे " विदग्ध" कच्चे अन्न चांगले नसते. "दग्ध" म्हणजे जळालेलेही अन्न चांगले नसते. जे विशेष प्रकारे , तेल , फोडणी, मसाले, कोथिंबीर इत्यांदींचा वापर करुन रुचकर बनविलेले असते ते " विदग्ध" जे खाद्य पदार्थांच्या बाबतीत तेच वांड्गमयाच्या बाबतीतही लागु होते."

( टंकन दोषासाठी क्षमा असावी काही अक्षर मला अजुनही टाइप करता येत नाही )

३-पिपीलीका

काही वर्षापुर्वी मकरंद साठे यांच्या मुलाखतीत पहिल्यांदा हा शब्द ऐकला होता. त्यात त्यांनी पिपीलीका मार्ग हा एक भारतीय तत्वद्न्यानातील मार्ग आहे असे म्हटलेले होते. तर पिपीलीका चा बेसीक अर्थ मुंगी लाल मुंगी. काळ्या मुंगी साठी मार्कटपिपीलिका हा शब्द.
शैव संप्रदायानुसार एकुण पाच चक्रापैकी दुसरे चक्र खेचरीचक्र त्या खेचरीचक्राच्या दुसऱ्या सोममंडलातील एकुण ३२ देवतांपैकी एक देवता पिपीलीका
अधिक रोचक माहीती इथे https://www.wisdomlib.org/definition/pipilika

पिपीलीका मार्ग संदर्भात्

According to Vignana there are three ways of Transmission of Spiritual Power and they can be explained through example. Of the three, Vihangam Marg is the shortest (fastest) way to achieve the Final Reality:

Suppose there is a sweet and ripe fruit at the top of a tree. To enjoy the taste of the fruit,

PIPILIKA MARG: An ant slowly comes to the trunk of a tree, slowly marches forward to the branch and enjoys the taste of the fruit. The way is known as Pipilika Marg (Ant-path).

MARKAT MARG: Jumping from one tree to another a monkey comes from a distance to the branch of the tree and directly starts tasting the fruit. This way is known as Markat Marg (Monkey-Path).

VIHANGAM MARG: A bird flying in the sky, directly pecks at the fruit with its beak and starts eating. This is known as Vihangam Marg (the Birds-Path, the Birds' Sky-w

‌४-चांडाळ आणि चंड

चांडाळ
चांडाल भारत में व्यक्तियों का एक ऐसा वर्ग है, जिसे सामान्यत: जाति से बाहर तथा अछूत माना जाता है। यह एक प्राचीन अन्त्यज, नीच और बर्बर जाति है। इसे श्मशान पाल, डोम, अंतवासी, थाप, श्मशान कर्मी, अंत्यज, चांडालनी, पुक्कश, गवाशन, चूडा, दीवाकीर्ति, मातंग, श्वपच आदि नामों से भी पुकारा जाता है।[1]
someone who deals with disposal of corpses
यांचे प्रमुख काम प्रेताची विल्हेवाट लावणे हे आहे. हे चांडाळ इतके तिरस्करणीय का मानले जात ? हे अत्यंत तिरस्करणीय संबोधन आजही वापरात आहे. अरे चांडाळा हा एक प्रकारच्या शिवी सारखा उपयोग अत्यंत नीच व्यक्तीसाठी केला जातो. त्याचे एक स्पष्टीकरण अनुलोम प्रतिलोम विवाह आणि त्यातुन उत्पन्न झालेल्या संतती च्या साठी वापरलेल्या नावातुन मिळते. याकडे पाहण्याचा सनातन दृष्टीकोण यामागचा तिरस्कार उघड करतो.
खालील मराठी विश्वकोशा चे उतारे बघा
वर्णव्यवस्था : चातुर्वर्ण्य म्हणजे चार वर्ण. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र होत. ब्राह्मण सर्वांत उच्च. त्याच्या खालोखाल क्षत्रिय. क्षत्रियाच्या खालोखाल वैश्य व वैश्याच्या खाली शुद्र, असा हा उच्चनीच भाव धर्मशास्त्राने गृहीत धरला आहे. या चार वर्णांचा समाज बनतो. या चार वर्णांचा अनुलोम विवाहाने होणारा संकर निषिद्ध नाही. या चार वर्णांचा प्रतिलोम संकर निषिद्ध आहे. अनुलोम संकर म्हणजे उच्चवर्णाचा पुरुष व खालच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह. वरच्या वर्णाची स्त्री व खालच्या वर्णाचा पुरुष यांचा संभोग व निर्माण झालेली संतती म्हणजे प्रतिलोम संकर होय. या अनुलोम-प्रतिलोम संकरांच्या योगाने भारतीय समाज बनला आहे.

समान वर्णाच्या स्त्री-पुरुषांपासून समान वर्णाचीच संतती होते, हा समान वर्णाचा अत्यंत प्रशस्त मानला आहे. ब्राह्मण पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांच्यापासून ‘मूर्धावसिक्तनामक’ जाती निर्माण होते. ब्राह्मण पुरुष आणि वैश्य स्त्री यांच्यापासून ‘अंबष्ठ’ या नावाची जाती निर्माण होते. ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्या विवाहातून ‘पारशव’ किंवा ‘निषाद’ नावाची जाती उत्पन्न होते. क्षत्रियापासून वैश्य स्त्रीच्या ठिकाणी ‘माहिष्यनामक’ जाती निर्माण होते व शूद्र स्त्रीच्या ठिकाणी क्षत्रियापासून जी संतती होते, तिला ‘उग्र’ जाती असे म्हणतात. वैश्य पुरुषापासून शूद्र स्त्रीच्या ठिकाणी जी संतती निर्माण होते, ती जाती ‘करण’ होय. ही अनुलोम संकरासंबंधी माहिती झाली.
क्षत्रिय पुरुषापासून ब्राह्मण स्त्रीच्या ठिकाणी निर्माण झालेली संतती ‘सूत’ जाती होय. वैश्यापासून निर्माण झालेली ‘वैदेहक’ जाती होय. ब्राह्मणीच्या ठिकाणी शूद्र पुरुषापासून जी संतती निर्माण होते, ती ‘चंडाल’ होय. ती अत्यंत नीच व बहिष्कृत होय, असे मानीत. क्षत्रिय पुरुषापासून वैश्य स्त्रीच्या ठिकाणी जी संतती होते, ती ‘माहिष्य’ जाती होय. वैश्य पुरुषापासून शूद्र स्त्रीच्या ठिकाणी ‘करणी’ नामक जाती उत्पन्न होते. त्या करणीच्या ठिकाणी माहिष्यय पुरुषापासून ‘रथकार’ नामक जाती निर्माण होते.
म्हणजे एक पुरुषसत्ताक समाजव्यवस्था त्यात पुन्हा वर्ण व्यवस्थेची उतरंड यात सर्वात खालच्या स्थानावर चा जो शुद्र पुरुष आहे तो सर्वात वरच्या स्थानावरील ब्राह्मण स्त्री शी विवाह करुन जेव्हा त्यांना संतती होते ती वर्ण वाइज व पुरुषसत्ताक वाइज दोन्ही बाजुने अर्थातच अत्यंत तिरस्करणीय मानली जाणार यात संशय नाही.

चंड -

या शब्दाच्या मुळा विषयी इतकीच माहीती मिळाली
Sri Chandi is the Goddess who is the Patta Mahishi of Parabrahman. The word ‘Chanda’ hints at extraordinary traits and thus refers to the Parabrahman, who is extraordinary due to his complete independence w.r.t time and space. The word Chandi (arising from the Dhatu Chadi meaning anger) also refers to the fiery power of anger of the Brahman. The Sruti says, “mahadbhayaM vajramudyataM’, wherein the word ‘vajra’ means not any weapon but the supreme Brahman. Thus, Chandi represents the Shakti of Brahman.

चंडअशोक हे संबोधन बुद्ध धर्म स्वीकारापुर्वीच्या पुर्वकालीन सम्राट अशोकाला वापरले जात असे. याचे कारण त्याने टॉर्चर चेंबर ची निर्मीती केलेली होती. व तो त्यात अत्यंत क्रुरतेने निर्दयतेने विरोधकांची हत्या करत असे या प्रकारच्या लीजंड्स आहेत याविषयी ची अधिक माहीती इथे
https://en.wikipedia.org/wiki/Ashoka%27s_Hell
इथे चंडअशोक वर अजुन माहीती मिळते.
https://www.indiaforums.com/forum/topic/4608368

५-clicktivism

हा अलीकडच्या काळात प्रचलित झालेला शब्द आहे. ऑक्सफर्ड च्या वर्ड ऑफ इयर की शॉर्ट लिस्ट मध्ये आलेला. हा शब्द click आणि activism या दोन शब्दांच्या संयोगाने तयार झालेला आहे. याचा अर्थ खालीलप्रमाणे
The practice of supporting a political or social cause via the Internet by means such as social media or online petitions, typically characterized as involving little effort or commitment.
याचा मराठी अनुवाद आपण कळबडवणेवाद असा करु शकतो कदाचित. यात ज्या ज्या मोहीमा प्रामुख्याने इंटरनेटवरुन फेसबुक आदी सोशल मिडीयाचा वापर करुन राबविल्या जातात त्याकडे निर्देश आहे. यात क्लीक करुन आपले मत नोंदवणे यापलीकडे काही नसते. म्हणजे हायवेवर उतरुन रास्तारोको न करता इनफॉर्मेशन हायवेवर उभे ( नव्हे बसुन ) कळ दाबणे हे अपेक्षित आहे. आता यात एक रोचक बाब अशी आहे की गेल्या पिढीतील रस्त्यावर उतरुन संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांना ( ज्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आंदोलनाची किक बसत नसे झिंग चढत नसे ) त्यांना clicktivism जरी शुद्र वाटला व त्याकडे जरी ते तुच्छतेने बघत असले तरी त्यांना नव्या जगाच्या माध्यमाची ताकद कळली नाही असे म्हणावेसे वाटते. clicktivism म्हणजे विशिष्ट उद्देशाने सोशल मिडीया सोजिरांनी दिलेला लढा. शब्दाच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर छोटेखानी लेख इथे जरुर बघावा
https://blog.oup.com/2014/11/slacktivism-clicktivism-real-social-change/
सध्या ऐसी अक्षरे वर सुरु असलेली नाव नोंदणी या संदर्भात रोचक आहे इथे दोन्ही पिढ्यांचे दोन्ही मार्ग वापरलेले दिसतात म्हणजे मी सहमत आहे म्हणुन clicktivism आणि प्रत्यक्ष मैदानावर जाऊन जंग लढण्याचा ही पर्याय उपलब्ध आहे.

६-cuckold

या शब्दाचा उगम Cuckoo ( कोकिळ ) वरुन आलेला आहे. कोकिळा जी इतर पक्ष्याच्या कावळ्याच्या घरट्यात स्वत:ची अंडी टाकते व ती तो पक्षी स्वत:चे समजुन सांभाळतो. cuckold चा अर्थ
In evolutionary biology, the term is also applied to males who are unwittingly investing parental effort in offspring that are not genetically their own तसेच हा अर्थ की
a man whose wife is sexually unfaithful, often regarded as an object of derision. ज्याची पत्नी व्याभिचारी आहे तो पति.

किरण नगरकर यांच्या एका विख्यात कादंबरीचे नाव cuckold आहे. ज्यात महाराज कुमार हे संत मीराबाई च्या पति वर आधारीत मध्यवर्ती पात्र आहे. याच्या मराठी अनुवादाचे नाव मात्र " प्रतिस्पर्धी" असे ठेवलेले आहे. जे गालिब च्या फार तर रकिब च्या जवळ जाणारे आहे (जिक्र उस परी-वश का और फिर बयां अपना बन गया रकीब आखिर, था जो राजदा अपना ) पण हा मला वाटते की cuckold चा अचुक अनुवाद करत नाही. कारण cuckold हा पत्नीच्या व्याभिचाराप्रति अनभिज्ञ असलेला पुरुष अशा अर्थाने आहे जसे कोकिळ चे अंडे असण्याविषयीची कावळ्याची अनभिज्ञता. या मराठी पुस्तकाच्या टायटलमध्ये कोणाला गृहीत धरलेले आहे ? जर कृष्ण हा मिरेचा प्रेमी या अर्थाने महाराजकुमार चा प्रतिस्पर्धी आहे तर तो मुळ cuckold चा अर्थ पुर्णपणे गंडतो. पण मग इथे दुसरा रोचक प्रश्न उपस्थित होतो तो असा की

विकीपेडीया वर या शब्दाचा विस्तृत अर्थ दिलेला आहे. त्यात एक फेटीश अर्थाने जे bdsm life style चा भाग या अर्थाने cuckold चा अर्थ वेगळा आहे.
Unlike the traditional definition of the term, in fetish usage a cuckold or wife watching is complicit in their partner's sexual "infidelity"; the wife who enjoys cuckolding her husband is called a cuckoldress
यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे पतिच्या समोर त्याच्या संमतीने केले जाते The fetish fantasy does not work at all if the cuckold is being humiliated against their will. म्हणजे इथे वरील प्रमाणे अनभिज्ञता नाही. तर महाराज कुमार ला तर मिराबाई च्या कृष्णप्रेमा विषयी पुर्ण माहीती होती इथे सरळ अर्थाप्रमाणे अनभिज्ञता नव्हती.
मग प्रश्न असा आहे की किरण नगरकरांनी जे cuckold नाव् निवडलं पुस्तकासाठी त्यात त्यांना " जाणता राजा " अभिप्रेत होता का ? असे जर असेल तर जे
नाव किरण नगरकर निवडतात ते कुठली अर्थछटा दाखवण्याचा प्रयत्न करताहेत फेटीश ? की हा एक अजुन एक orientalism किंवा exotica वगैरे चा अवलंब करुन माल विकण्यासाठी आहे ?
असल्यास काही हरकतही नाही नसल्यास ही नाही फक्त रोचक वाटले इतकेच्
https://en.wikipedia.org/wiki/Cuckold

७-सात मुकाम होते है इश्क मे.

" सात मुकाम होते है इश्क मे..... दिलकशी, उन्स ,मोहब्बत,अकीदत,इबादत,जुनुन और..."

‛उर्दू - मराठी शब्दकोश’ (संकलन - श्रीपाद जोशी) याच्या आधारे शोधलेले अर्थ :

1) दिलकशी - आकर्षकपणा, सौंदर्य, मोहकता.

2) उन्स - प्रेम, माया, प्रीती, ममता.

3) मुहब्बत - १) प्रेम; प्रणय; वात्सल्य; २) मैत्री.

4) अकी(क्री)दत - १) धार्मिक श्रध्दा, निष्ठा
२) धर्मातील मूलभूत गोष्ट.

5) इबादत - उपासना; पूजाअर्चा; नमाज; तपस्या;
आराधना.

6) जुनून - १) वेड; खूळ; चळ; उन्माद २) प्रेम
३) क्रोध ४) नाद; छंद.

7) मौत - १) मृत्यू, मरण २) विनाश ३) दुर्दशा.

हा देढ इश्किया चित्रपटातील नसिरुद्धीन शाह चा सुरेख संवाद आहे दुवा इथे
https://www.youtube.com/watch?v=wkw24sWy5MI&feature=youtu.be

८- doolally आणि shampoo

The slang word ‚doolally‘ or ‚doolali‘ is used to describe someone who is ‚out of one’s mind‘ or ‚crazy‘. It is a derivation of ‚doolali-tap‘ and originates from the latter part of the nineteenth century. The first part of this phrase is derived from the name of a small military town in the Indian state of Maharashtra called Deolali. The second part is a Hindustani word for fever, often ascribed to malaria, although in Sanskrit, ‚tapa‘ means simply heat or torment. Taken literally, it is best translated as ‚camp fever‘. By the time of the Second World War, the term had been shortened to ‚doolally‘.

Frank Richards wrote, ‚The well known saying among soldiers when speaking of a man who does queer things, „Oh, he’s got the Doo-lally tap,“ originated, J think, in the peculiar way men behaved owing to the boredom of that camp‘ (2). While this may have been true at times, the reason that Deolali became synonymous with mental illness has more to do with the limitations imposed on troop movements by the seasons, the debilitating effect of the summer climate, alcoholism, venereal diseases, malaria, and the difficulties of treating mental illness in the colonies.
हे इथे सापडलं इथे एकदम डिटेल स्टोरी दिलेली आहे देवळाली शी असलेल्या या संबंधाची
https://www.gaebler.info/2013/04/the-madness-at-deolali/

shampoo हा शब्द देखील वरीलप्रमाणेच भारतीय उगम असलेला आहे हे अनेकांना माहीत नसते
The word shampoo entered the English language from the Indian subcontinent during the colonial era.[1] It dates to 1762 and is derived from Hindi chāmpo (चाँपो [tʃãːpoː]),[2][3] itself derived from the Sanskrit root chapati (चपति), which means to press, knead, soothe.[4][5]
त्याचप्रमाणे juggernaut हा पुरीच्या जगन्नाथ यात्रे शी

९- डांबरट व डॅम्बीस

या दोन शब्दांच्या उगमाविषयी मी कुठेतरी वाचले होते ते खालीलप्रमाणे आहे. याची खात्री देता येत नाही पण ते असे आहे.
नेटीव्ह साहेब मराठी कारकुनास कामात कसुर केल्यास
You Damned Rat ,
You Dumb ass
असे झापत असे तर त्याच्या आवर्तनाने आणि ते सतत ऐकुन त्याच्या अपभ्रंश झालेल्या उच्चाराने त्याचे
डांबरट डांबरट
डॅम्बीस डॅम्बीस्
असे झाले असे वाचलेले आहे
खरे खोटे देव जाणे.

१०- ऋतुपर्ण आणि अभिराम

ऋतुपर्ण घोष हे विख्यात बंगाली दिग्दर्शक
नावाचा अर्थ सुस्पष्ट आहे फार सुंदर शब्द आहे अधिकचा संदर्भ म्हणजे हे प्राचीन अयोध्येच्या एका राजाचे नाव होते ( सर्वकर्मा चा मुलगा ) याच्याकडे नळ दमयंती तल्या नळाने ( की नल ) ने नोकरी केली होती.
Rutuparna was a master mathematician and profoundly skilled in dice Kali (Demon). Nala, as Bahuk (one with a hump) became a minister and later the charioteer in King Rituparna's court on the advice of the King of Snakes (Nagas) to learn from him the skills of dice.
कली हे ऋग्वेदकालीन जुगारींच्या जुगारातील टाकलेला सर्वात वाईट फासा या अर्थाने अंदाजे आहे.
अजुन डिटेल आठवत नाही एकेकाळी लक्षात होते आता विस्मरण झाले.

त्यानंतर अयोध्येचा राजा राम आला पण राम हा ही फारच साधा मिळमिळीत शब्द त्यापेक्षा हा
अभिराम सुंदर शब्द आहे.

अभिराम भडकमकर हे विख्यात मराठी दिग्दर्शक लेखक
अर्थ अत्यंत सुदर आकर्षक हा इथे एक उपयोग्

जीवन क्या है जीवन जिसमे रहे काम और केवल काम.
हमें भान भी हो न सके यह धरती है कितनी अभिराम.

सुन्दर बाला के नयनों के सब बाण अकारथ चले गये,
हम उसके पैरों की झांझर, न नृत्य कला से छले गये.

इतनी फुरसत कहां कि देखें उसके मुख की आकृतियां,
फूटेगी जिनसे मुसकाने, नयनों से झरेंगी फुलझड़ियाँ.

निर्धन है वह जीवन जिसमे रहे काम और केवल काम,
हमें भान भी हो न सके यह धरती है कितनी अभिराम.

११-आतंक

श्री विलास सारंग यांचा एक " आतंक " नावाने विलक्षण असा कथासंग्रह आहे. याच्या प्रस्तावनेत मला आतंक हा शब्द अस्सल मराठी आहे असे पहिल्यांदा कळले. याच्या प्रस्तावनेत या शब्दाविषयी " विलास सारंग" असे म्हणतात्

" या संग्रहातील शीर्षककथेला मुळात " टेररीस्ट" असे शीर्षक दिलेले होते. त्या कथेला... आणि म्हणुन संग्रहाला.......आता " आतंक" असे शीर्षक दिले आहे. "टेररीस्ट" या शब्दाला पर्याय म्हणुन " आतंकवादी" हा शब्द हिंदिमध्ये वापरला जातो. भाषासंकरा ची ज्यांना धास्ती वाटते त्यांना मी दिलासा देऊ इच्छितो की " आतंक" हा अस्सल मराठी शब्दही आहे. हा मुळ संस्कृत शब्द महाभारतात, रघुवंशात वगैरे वापरला गेला आहे. तसेच प्राचीन मराठीतही वापरला गेला आहे ( दाते- कर्वे यांच्या " महाराष्ट्र शब्दकोश " मध्ये तो सापडतो.)
"आतंक" या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थांमध्ये भयाकुल , चिंतीत मनोवस्था, " काहितरी अनिष्ट घडणार" ही आशंका, हा एक प्रमुख अर्थ आहे.
"ढोलाचा वा डमरुचा आवाज" असाही एक अर्थ आहे. तो मला विशेष लक्षणीय वाटतो. असा हा सुंदर, नादमय, अर्थवाही शब्द मराठी नाहीच असे वाटण्याइतपत दुर्लक्षित झालेला आहे. या संग्रहाचे शीर्षक म्हणुन वापरल्याने हा शब्द पुन्हा मराठीमध्ये चलनात येण्यास थोडाफार हातभार लागला तर मला आनंद होइल "

बाय द वे या पुस्तकाचे मुखपृष्ठ नितिन दादरावाला यांचे आहे जे रोचक आहे ते मिळाल्यास डकवतो

१२-Sawbones

Lost English - Words & Phrases that have vanished from our language- Chris Roberts. हे एक मजेदार पुस्तक आहे. यात चलनातुन बाद झालेल्या अनेक इंग्रजी शब्दांविषयी किंवा चलनात असलेले मात्र मुळ अर्थ वा एखादा प्रमुख अर्थ वापरातुन संपलेल्या शब्दांविषयी आहे. यात हा शब्द वाचला.
Sawbones हा शब्द डॉक्टर साठी वापरला जात असे. त्यातही स्पेसीफीक म्हणजे सर्जन साठी हा शब्द वापरला जात असे मात्र तो सध्या चलनातुन पुर्णपणे बाद झालेला आहे. Saw आणि Bones या दोन शब्दांच्या संयोगाने हा शब्द बनलेला होता. ऑर्थोपेडीक सर्जन च्या कामावरुन कदाचित हा शब्द बनला असावा असे अंदाजपंचे आपले मत. पुस्तकात तसे काही दिलेले नाही. संदर्भ म्हणुन पुस्तकात स्टारट्रेक मधल्या शिप वरील डॉक्टरला लिओनोर्ड बोन्स संबोधले जाण्याचा उल्लेख आहे. गुगलल्यावर या नावाचे एक संस्थळ सापडले ज्यात मुखपृष्ठावर Sawbones means precision hand craftsmanship असे दिलेले आढळले.
https://www.sawbones.com/

१३-ज़िंदा आणि जिन्दाँ

ज़िंदा
याचा अर्थ जिवंत आहे आणि तो अजुन जिवंत आहे.म्हणजे हा अर्थ प्रचारात आहे.
जिन्दाँ
पर इस जिन्दाँ की मौत हो गई है.
या जिन्दाँ चा अर्थ तुरुंग जेल असा होतो जो आता कुठे वापरात प्रचारात दिसत नाही सहसा

वरील पहील्या जिंदा वरुन जिंदादिल जसा शब्द आहे
तसा दुसर्या जिन्दाँ वरुन जिन्दानी म्हणजे तुरुंगवासी किंवा कैदी

आता जिन्दाँ व जिन्दानी हे शब्द असलेली ही एक जबरदस्त गझल शायर है जोश मलीहाबादी

क्यो हिन्द का जिन्दाँ काँप रहा है , गुंज रही है तकबीरे.
उकताए है शायद कुछ कैदी और तोड रहे है जंजीरे.

दीवारों के नीचे आ-आ क्रर युं जमा हुए है जिन्दानी.
सीने मे तलातुम बिजली का, आंखो मे झलकती शमशीरें.

भुको की नजर मे बिजली है, तोपों के दहाने ठंडे है
तकदीर के लब को जुम्बिश है, दम तोड रही है तदबीरे.

ऑखो मे गदा की सुर्खी है, बेनुर है चेहरा सुलताँ का.
तखरीब ने परचम खोला है, सिजदे मे पडी है तामीरें

क्या उनको खबर थी, ज़ेरोजबर रखते थे जो रुहे-मिल्लत को.
इक रोज इसी बेरंगी से, झलकेंगी हजारो तस्वीरें.

क्या उनको खबर थी, होठो पर जो कुफ़्ल लगाया करते थे
इक रोज इसी खामोशी से, ट्पकेंगी दह्कती तक़रीरें

संभलो ! कि वो जिन्दाँ गुंज उठा, झपटो ! कि वो कैदी छुट गए.
उठ्ठो ! कि वो बैठी दिवारे , दौडो ! के वो टुटी जंजीरें.

१४- राडा आणि छावी

राडा
हा शब्द टपोरी लोकांच्या बोलीत रुढ झालेला आहे. सध्या राडा म्हटल्यावर अगोदर शिवसेना हमखास आठवते. मुंबईत हिंदु माणुस् आणि मराठीत राडा शब्द जिवंत ठेवला तो मान शिवसैनिकांचाच. राडा करायचा तो शिवसैनिकांनीच. तर भाऊ पाध्ये यांच्या " राडा " कादंबरीवरुन सुद्धा राडा घातलेला तो शिवसैनिकांनीच. तर असा हा शब्द मात्र मराठीत जुनाच आहे. दाते कर्व शब्दकोशात राडा च्या एन्ट्रीत खालील अर्थ आढळतात्
पहीला अर्थ म्हणजे पसारा ( तोच तो मृगेंद्र कुंतल यांचा "पसारा") नंतर कामाचा राडा उपसणे या अर्थाने, नंतर एक अर्थ भानगड असा दिलेला आहे. आणि शेवटी आकांत; रडारड (मृत्युसमयीं होणारी मनुष्यसमुदायाची) असा अर्थ दिलेला आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाच्या मृत्युनंतर नातलगांनी राडा घातला असे म्हटले तर त्याचा खरा अर्थ त्यांनी रडारड केली आकांत केला असा खरं तर घेतला पाहीजे. पण बघा या शब्दाचा हा अर्थ लोप पावुन आता त्याचा अर्थ धिंगाणा घालणे , मारामारी करणे, तोडफोड करणे , रस्त्यावर धुडगुस घालणे या अर्थाने राडा आज वापरला जातो.
तर आज जर एखाद्या रुग्णाच्या मृत्युनंतर त्याच्या नातलगांनी राडा घातला असे वाचले ऐकले तर आपण आजचा अर्थच समज़ण्याची शक्यता जास्त.
टपोरी नाक्याच्या बोलीत हा शब्द आता फिट्ट बसलेला आहे.

छावी

टपोरी नाक्यावरच्या पोरांच्या बोलीत हा शब्द येतो. हा अधिकृत मराठी शब्द नसावा म्हणजे मला माहीत नाही. पण हा शब्द मला आवडतो. हा शब्द प्रेयसी साठी किंवा अधिक नेमकं बोलायचं तर नाक्यावरचा पोरगा ज्या पोरीवर लाइन मारतो तिच्यासाठी तो माझी " छावी" या अर्थाने हा शब्द वापरतो.
तसे तर लाइन मारत असलेल्या मुलीसाठी / प्रेयसीसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात शहरात त्या पोरांच्या बोलीत् एक एक विशीष्ट शब्द असतो. म्हणजे गावागणिक वेगळा शब्द "छावी" साठी आहे यावर संशोधन होणे आवश्यक आहे. काही नावे मला माहीत आहेत पण ती काही फार आवडली नाहीत.छावी एकदम भारी शब्द वाटला छावी नावाने ज्या तेजतर्रार प्रेयसीची प्रतिमा डोळ्यासमोर तरळते ती रोचक आहे. छावा वरुन उचललेला हा शब्द आहे. छावा जो शब्द शिवाजी सावंत यांनी आपल्या कादंबरीसाठी वापरला तो सुद्धा मला फार भारी वाटतो. शिवाजी सिंह म्हणुन त्यांचा मुलगा संभाजी छावा हे भलतेच क्रिएटीव्ह टायटल त्यांनी वापरले होते. त्यामुळे महाराष्ट्रात एक छावा नावाची संघटना ही उभी राहीली. महाराष्ट्रात छावा हा शब्द बहुधा यांनीच लोकप्रिय केला असावा असे वाटते.

१५-झोंवता

श्री राजीव सानेगुरुजी यांच्या फेसबुक पोस्ट वर त्यांनी हा खालील तुकारामांचा अभंग दिलेला होता.

एक ब्रह्मचारी| गाढवा झोंवता| मारुनिया लाता| पळाले ते
गाढवही गेले| ब्रह्मचर्य गेले| तोंड काळे जाले| जगामाजी ----तुकोबा

या पोस्टवर झोंवता असा शब्द जुन्या मराठीत खरचं आहे? असा प्रश्न विचारला गेला त्याच्या उत्तरात
श्री निखील बेल्लारीकर उत्तर देतात की
800 वर्षे जुन्या शिलालेख इत्यादी मध्ये "जो कोणी न अवलंबी तेहाची माय गाढवे झविजे" अशा ओळी सर्रास आढळतात, इतकेच नव्हे तर शिलालेखाचा मजकूर संपतो त्याच्या खाली एक गाढव एका मानवी स्त्रीशी संभोग करीत असल्याचे शिल्पही कोरलेले असते

तसेच इतर मान्यवरांनी एकनाथ यांच्या लेखनात देखील अशा प्रकारचा शब्द सापडतो ही माहीती दिलेली आहे.
याची शहानिशा करता आली नाही मात्र्
तुर्तास मोठे नवल वाटले की हा इतका जुना शब्द आहे व इतक्या बिनधास्त वापरातही होता
नंतर यांचे कासेची लांगोटी सारखे काही झाले असावे

भाषालेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

18 Jan 2020 - 8:55 am | कुमार१

पिपीलीका, चांडाळ आवडले.

आनन्दा's picture

18 Jan 2020 - 12:48 pm | आनन्दा

वाचतोय.

मारवा's picture

22 Jan 2020 - 11:26 pm | मारवा

ताज्या बातमीनुसार इसरो ने नविन humanoid robot आपल्या गगनयान प्रकल्पासाठी बनवलेला आहे. या लेडी रोबोट चे नाव त्यांनी ठेवलेले आहे " व्योमित्रा"
हे सुंदर नाव जमलेले आहे.
व्योम चा अर्थ आकाश असा होतो आणि त्याची मित्र व्योमित्रा
व्योम चा चटकन आठवणारा मराठीतला वापर म्हणजे बालकवीच्या फुलराणी त ही ओळ

तो व्योमीच्या प्रेमदेवता – वार्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली
परस्परांना खुणवुनी नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी

त्यांच्याच एका कवितेत " व्योमपटी जलदांची झाली दाटी " अशी ओळ येते कुठे ते नेमके आठवत नाही पण ही ओळ आहे.
दुसर उदाहरण म्हणजे फेमस बंगाली डिटेक्टीव्ह "व्योमकेश बक्षी " यातील व्योमकेश हे नाव शंकराचे आहे कारण का तर शंकराचे मोठे मोकळे केस आकाशत उडत असतात म्हणून असे केस असणारा व्योमकेश शंकर
अजुन एक शब्द आहे " व्योमचारी " त्याचा अर्थ पक्षी चिमणी जे आकाशात विहार करतात बाय द वे कवि ग्रेस यांनी पक्ष्यांना दिलेले एक सुंदर नाव आठवले
ते म्हणतात पक्षी म्हणजे " आभाळछंदाचे प्रवासी "

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jan 2020 - 12:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा भाग देखिल आवडला
काही परिचीत शब्दांचे अपरिचीत अर्थ समजले.
काही शब्दांचा नव्याने परिचय झाला
आणि काही नवे शब्द समजले.
पैजारबुवा,

जयंत कुलकर्णी's picture

23 Jan 2020 - 3:38 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच !