मला कुठे शोधशील ?

Primary tabs

Rohini Mansukh's picture
Rohini Mansukh in जे न देखे रवी...
14 Jan 2020 - 8:38 am

वाहत असेल झरा संथ
त्याच्या काठाशी बघ
पाण्यात पाय बुडवून
बसले असेन स्तब्ध

बहरली असेल बाग
एखाद्या झाडापाशी बघ
फुलांशी हितगूज करत
पाहत असेन पाखरे स्वच्छंद

हिरवाळलेला डोंगर
त्याच्या माथ्यावर बघ
घोंघावता वारा अंगावर घेत
असेन स्वतःच्याच विचारात गर्क

जर कुठेच नसेन मी
होत नसेल माझ्या
अस्तित्वाचा बोध
तू मला माझ्याच
कवितांमध्ये शोध

- सौ. रोहिणी विक्रम मनसुख

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

15 Jan 2020 - 8:01 am | चांदणे संदीप

अनुवादित केल्यासारखी वाटतेय.
नसेल तर चांगला प्रयत्न. पुलेशु!

सं - दी - प

Rohini Mansukh's picture

15 Jan 2020 - 1:34 pm | Rohini Mansukh

अनुवादित नाहीये.