<मंजूर नाही>

उत्खनक's picture
उत्खनक in जे न देखे रवी...
24 Dec 2019 - 11:37 am

क्रान्तितैच्या कविता म्हणजे मेजवानी असते. कितीदा तरी वाचून झाल्या असतील. तरीही पुन्हा वाचतांना फ्रेशच वाटत असतं!
तिची कविता नुसती वर काढूनही समाधान होत नाही. त्यासाठी हा एक विडंबनाचा प्रयत्न! यासाठीची प्रेरणा म्हणजे क्रान्तितैची एक अप्रतीम गझल.. मंजूर नाही

नको बंधने, जाच मंजूर नाही
जिभेलाच उपवास मंजूर नाही !

कसा मान द्यावा तुझ्या वर्तनाला?
सात्विक खाणेच मंजूर नाही !

तुपा शिंपडावे हलक्या पळींनी,
तुपाच्या गडूलाच मंजूर नाही

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
पण, ताटास ही लाच मंजूर नाही !

तुझे सांगणे का सदा सत्य व्हावे?
(पोटासही जाच मंजूर नाही!)

कळेना कशी सुंठ खाण्यात येते..
नाकास तो वास(!) मंजूर नाही !

निपटून घ्यावी, "मिसळ" मांडलेली..
उरावा कधी घास.. मंजूर नाही !

चिंतेस 'उद्या'च्या अजून एक सांगा
तुझा जन्म मज 'आज' मंजूर नाही !

विडंबन

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

24 Dec 2019 - 11:44 am | श्वेता२४

चिंतेस 'उद्या'च्या अजून एक सांगा
तुझा जन्म मज 'आज' मंजूर नाही !