राम राम मिपाकर्स ,
खूप दिवसांनी पाककृती विभागात लुडबुड करण्याचा योग आला ,थोडं भीत- भीतच ही रेसिपी बनवण्याचं धाडस केलं होत. खाणेबल बनेल कि नाही याचीच शाश्वती नव्हती म्हणून स्टेप बाय स्टेप फोटो काढायचे राहूनच गेलं ,पण यकींन मानो इतका मस्त आउटपुट मिळेल असं स्वप्नात पण नव्हतं वाटलेले, मी बनवली म्हणजे कुणीही बनवेल सहज , तर मग घ्या करायला रसरशीत बालुशाही ती पण हलवाईला मागेल टाकेल इतकी खुसखशीत न स्वादिष्ट !
साहित्याचं परफ़ेक्ट प्रमाण , तेलाचं योग्य टेम्परेचर , पिठाचं टेक्श्चर आणि पाक ह्या गोष्टी वरच सगळा कारभार अवलंबून आहे ये जम्या तो सब जम्या :)
माझ्या प्रमाणानुसार २५ छोट्या आकाराच्या बालुशाही तयार होतात .तुम्ही आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता . लक्षात घ्या परफेक्ट प्रमाण हेच ह्या लाजवाब बालुशाही चे सिक्रेट आहे बाकी मेहनत जास्त नाही पण पेशन्स हवे .
साहित्य :-
१) २ वाट्या मैदा
२)१ टीस्पून बेकिंग पावडर
३) १ चुटकी मीठ
४) अर्धी वाटी तुप ( मैद्याला जी वाटी वापरली तीच वाटी बर का )
५) अर्धी वाटी पाणी ( मैद्याला जी वाटी वापरली तीच वाटी बर का )
पाक बनवण्याचे साहित्य :
१) २ वाट्या साखर
२) १ वाटी पाणी
३) वेलची पूड चिमूटभर किन्वा साबुत वेलची (ऑप्शनल )
४)खाण्याचा रंग किंवा केसर (ऑप्शनल )
कृती :
मैदा , मीठ ,बेकिंग पावडर ,तूप आणि पाणी घालून मैदा मळून घेणे , मळून घेणे म्हणजे कनिक जशी भिजवतो तशी अजिबात नाही
इथं मळून घेणे म्हनजे सर्व साहित्य फक्त एकत्र मिसळून एक गोळा तयार करून घेणे जो थोडक्यात बाईंड करून घेणे इथे पोळ्याची कणिक जशी मऊसूत असते तस हे पीठ अजिबात भिजवायचं नाही ओबड धोबडच असत जरासं हे पीठ !
आता १०-१५ मिनिट पीठ रेस्ट करायला ठेवून द्या .
आता तोवर पाक बनवून घेऊ , शक्यतो पाक आधीच बनवून घ्या कारण पाक निम गरम असायला हवा जेव्हा आपण गरम बालुशाही त्यात घालू शकतो
२ वाटी साखर घेऊन त्यात १ वाटी पाणी घालून थोडी वेलची पावडर , आणी थोडा कलर घालून उकळायला ठेवा , पाकात ४.-५ थेम्ब लिंबू पिळल्याने साखरेचे क्रिस्टलायजेशन होत नाही . त्यामुळे बालुशाहीवर पांढऱया रंगाचा पाकाचा थर दिसत नाही , लक्षात घ्या इथे पाक एकतारी किंवा दोनतारी करायचा नाही फक्त थोडा घट्ट हवा आहे जेणेकरून बालुशाहीच्या आतपर्यन्त व्यवस्थित शोषला जाईल .याची खूण म्हणजे जेव्हा पाक तुम्ही चमच्यावरून खाली सोडाल तेव्हा शेवटचा थेम्ब फार संथ गतीने पडतो.
पाक झाला , चला आता बालुशाही बनवून घेऊया.
भिजवलेले पीठ हातात घेऊन आपण कापूस कसा पिंजतो तस लिटरली ७-८ वेळा पिंजून घ्या म्हणजे तुकडे करायचे परत गोळा करायचा परत सेम कृती. असं ७-८ वेळा केल्याने त्यात हवा भरून पीठ मस्त खुसखुशीत होत आणि बालूशाही आतून कच्ची राहत नाही ..पीठ पिंजून झालं कि आता गोळे करूया
पिठाचे छोटे छोटे गोळे करून थोडं तळ हातावर मळून साधारण मोठ्या पेढ्या इतका गोळा मळून त्याला थोडं चपटा आकार देऊन मधोमध बोटाने आरपार छिद्र पाडून घेऊया
आता बालुशाही तळण्याकरिता शकयतो मोठा पसरट फाईंगपॅन किंवा कढई घ्या कारण इथे तेलाचं टेम्परेचर फार महत्वाच आहे जर तुम्ही दोन बॅच करणार असाल तर दुसरी बॅच तळेपर्यंत तेल खूप गरम झालेले असेल आणि मग ती बालूशाही व्यवस्थित होणार नाही .मग पुन्हा तेल थंड करा ,दुसरं बॅच परत तळा हा डबल कुटाणा होईल
आता तेल खूप मंद आचेवर गरम करायचं आहे गॅस फ्लेम लो म्हणजे लो च हवि , तेल तापत आल कि एक छोटासा गोळा तेलात सोडून पाहणे हा गोळा तळाला जाऊन वर येई पर्यंत मला १५-२०सेकंद लागले
आता सर्व बालुशाही तेलात हळुवार सोडून द्या त्या तेलाच्या तळाशी जाऊन बसतील, त्यांना अजिबात हलवायचा नाही ५-७ मिनिटं झाली कि त्या आपोआप फुलून वर येतात . आता या स्टेज ला गॅस ची फ्लेम मिडीयम करा खालून थोडा गोल्डन कलर यायला लागला कि त्या पलटू न दुसया साईड्ने छान तळून घ्या ह्या सर्व प्रोसेसला १०-१२मिनिट लागतात ( तुम्ही ज्या ठिकाणी, ज्या प्रदेशात आहात त्या तापमानानुसार वेळेत फरक पडू शकतो )
चला आता पाक ही कोमट झालाय आता तळलेल्या बालुशाही पाकात अलगद सोडूया , एका बाजूने ३ मिनिट दुसऱ्या बाजूने तीन मिनिट पाकात भिजत राहू द्या याने बालुशाहीला परफेक्ट असा गोडसर पणा येतो जास्त गोड हवं असल्यास ५ मिनीट भिजू द्या
पाकात भिजवलेली बालुशाही काढून १५-२० मिनिट छान सेट झाली कि एअर टाईट कंटेनर मध्ये भरून ठेवून द्या जास्त दिवस ठेवायची असेल तर फ्रीझर मध्ये महिनाभर आरामात राहील पण यकींन मानो हि महिनाभर दूर तुम्ही २ दिवसात गट्टम कराल, खात्री हे आपुन को :)
ही पाकक्रुती कशी होइल देव जाणे म्हणुन म्या फकस्त २-४ फोटु काढ्लेत तेच गोड मानुण घ्या बर का मंडळी !!!!
ह्यो पैला
ह्यो दुसरा
आन ह्ये फायनल प्रोड्क्ट
प्रतिक्रिया
12 Dec 2019 - 2:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
शेवटचे दोन फोटो फार म्हणजे फारच कातिल आले आहेत.
पैजारबुवा,
12 Dec 2019 - 7:45 pm | सुबोध खरे
तों पा सु
23 Dec 2019 - 12:55 am | अत्रुप्त आत्मा
पैजारबाबांशी शमत हाय!
...............
12 Dec 2019 - 2:26 pm | कंजूस
या खटाटोपासाठी कौतुक. असलं कोण काही करत नाही घरी. यशस्वी.
12 Dec 2019 - 2:49 pm | पियुशा
अहो कन्जुस दादा , इतकी कठीण अजिबात नाहिये माझा हा पहिलाच प्रय्त्न होता :)
12 Dec 2019 - 5:05 pm | जॉनविक्क
वा, कठीण नाही मग काम फत्ते. एकदा केल्या होत्या घरी चावताना दात तुटले पण बालूशा तशीच राहिली होती
12 Dec 2019 - 5:46 pm | पद्मावति
आहा मस्तंच.
12 Dec 2019 - 9:51 pm | श्वेता२४
करुन बघावी म्हणतेय. फोटो बघुन तोंपासु
12 Dec 2019 - 11:03 pm | पलाश
सुरेख बालूशाही आणि कृतीसुद्धा छानच लिहिली आहे. मस्त!
12 Dec 2019 - 11:15 pm | गणेशा
वा वा मस्तच.
आणि पियुशा, किती वर्षांनी, तुझा धागा वाचला म्हणून पण छान वाटले..
12 Dec 2019 - 11:31 pm | पियुशा
बब्बो , गणेश दादूस ला फ़ोटो दिसले चक्क !!! बर वाटल :)
13 Dec 2019 - 8:07 am | प्रचेतस
=))
पाकृ मस्तच. बालुशाही मात्र आवडत नाही :)
13 Dec 2019 - 2:25 pm | गणेशा
आता इंटरनेट फास्ट आणि स्मार्ट झालय ना तायडे...
13 Dec 2019 - 3:58 pm | पाषाणभेद
हा हा हा, गणेशा गणेशा होण्यापासून वाचला.
धागा अन बालूशाही मस्तच आहे. अगदी तोंपासू.
बालूशाही मला खूप आवडते पण घरच्यांना नाही आवडत त्यामुळे नाही खाता येत.
13 Dec 2019 - 2:27 am | रुपी
वा! मस्तच गं. शेवटचा फोटो खरंच अगदी रसरशीत :)
13 Dec 2019 - 10:01 am | श्रीरंग_जोशी
आकर्षक दिसत आहे बालुशाही. बराच निगुतीने करायचा पदार्थ दिसतोय. वर्णनशैली आवडली.
13 Dec 2019 - 2:58 pm | मुक्त विहारि
तोंपासु
13 Dec 2019 - 9:41 pm | रमेश आठवले
भन्नाट आणि चविष्ट फोटो.
16 Dec 2019 - 11:08 am | शेखर
विकेंड ला करुन बघितली.... खुपच छान आणी खुसखुशीत झाली.. धन्यवाद..
16 Dec 2019 - 3:13 pm | पियुशा
वा वा शेखर जी , फोटो असेल तर टाका की :)
17 Dec 2019 - 12:12 am | पिंगू
तातडीने पार्सल पाठवून देणे..
19 Dec 2019 - 3:36 pm | दिपक.कुवेत
मला प्रचंड आवडते. पण शेवट्च्या फोटोत रंगीत बुंदी आणि लवंगा टोचण्याचे (ते सुद्धा एकाच बालुशाहिला) प्रयोजन कळले नाहि?
19 Dec 2019 - 4:49 pm | पियुशा
दीपक जी , ती काही लवंग नाहिये पाकातली इलायची चिकटली आहे बालूशाहिला :) आणि माझ्याकडे बालूशाही गार्निशिंग साठी पिस्ते नव्हते म्हणून बूंदी दाने वापरले ;) हाय काय नाय काय :)
19 Dec 2019 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे फोटो जीवघेणे..
पैकीच्या पैकी मार्क घेणारी पाककृती. मस्त.
-दिलीप बिरुटे
22 Dec 2019 - 11:28 am | मदनबाण
जिल्बुशा, मस्त बालुशाही बनवली आहेस... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4
23 Dec 2019 - 9:01 am | नन्दादीप
बालुशाही मस्त.. शेवटचे दोन फोटो भारीच...
बाकी बर्याच दिवसाने उगवलात मिपावर..
26 Dec 2019 - 6:13 pm | palambar
"भिजवलेले पीठ हातात घेऊन आपण कापूस कसा पिंजतो तस लिटरली ७-८ वेळा पिंजून घ्या म्हणजे तुकडे करायचे परत गोळा करायचा परत सेम कृती. असं ७-८ वेळा केल्याने त्यात हवा भरून पीठ मस्त खुसखुशीत होत आणि बालूशाही आतून कच्ची राहत नाही ..पीठ पिंजून झालं कि आता गोळे करूया"
अगदी परफेक्ट सांगितले आहे, अशी कृृृृती सांगितली कि पदार्थाची काय
बिशाद आहे , बिघडायची.
27 Dec 2019 - 12:59 am | एस
लैच म्हंजे लैच!