Skip to main content

रसरशीत बालुशाही ...

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 12/12/2019 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकर्स , खूप दिवसांनी पाककृती विभागात लुडबुड करण्याचा योग आला ,थोडं भीत- भीतच ही रेसिपी बनवण्याचं धाडस केलं होत. खाणेबल बनेल कि नाही याचीच शाश्वती नव्हती म्हणून स्टेप बाय स्टेप फोटो काढायचे राहूनच गेलं ,पण यकींन मानो इतका मस्त आउटपुट मिळेल असं स्वप्नात पण नव्हतं वाटलेले, मी बनवली म्हणजे कुणीही बनवेल सहज , तर मग घ्या करायला रसरशीत बालुशाही ती पण हलवाईला मागेल टाकेल इतकी खुसखशीत न स्वादिष्ट ! साहित्याचं परफ़ेक्ट प्रमाण , तेलाचं योग्य टेम्परेचर , पिठाचं टेक्श्चर आणि पाक ह्या गोष्टी वरच सगळा कारभार अवलंबून आहे ये जम्या तो सब जम्या :) माझ्या प्रमाणानुसार २५ छोट्या आकाराच्या बालुशाही तयार होतात .तुम्ही आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता . लक्षात घ्या परफेक्ट प्रमाण हेच ह्या लाजवाब बालुशाही चे सिक्रेट आहे बाकी मेहनत जास्त नाही पण पेशन्स हवे . साहित्य :- १) २ वाट्या मैदा २)१ टीस्पून बेकिंग पावडर ३) १ चुटकी मीठ ४) अर्धी वाटी तुप ( मैद्याला जी वाटी वापरली तीच वाटी बर का ) ५) अर्धी वाटी पाणी ( मैद्याला जी वाटी वापरली तीच वाटी बर का ) पाक बनवण्याचे साहित्य : १) २ वाट्या साखर २) १ वाटी पाणी ३) वेलची पूड चिमूटभर किन्वा साबुत वेलची (ऑप्शनल ) ४)खाण्याचा रंग किंवा केसर (ऑप्शनल ) कृती : मैदा , मीठ ,बेकिंग पावडर ,तूप आणि पाणी घालून मैदा मळून घेणे , मळून घेणे म्हणजे कनिक जशी भिजवतो तशी अजिबात नाही इथं मळून घेणे म्हनजे सर्व साहित्य फक्त एकत्र मिसळून एक गोळा तयार करून घेणे जो थोडक्यात बाईंड करून घेणे इथे पोळ्याची कणिक जशी मऊसूत असते तस हे पीठ अजिबात भिजवायचं नाही ओबड धोबडच असत जरासं हे पीठ ! आता १०-१५ मिनिट पीठ रेस्ट करायला ठेवून द्या . आता तोवर पाक बनवून घेऊ , शक्यतो पाक आधीच बनवून घ्या कारण पाक निम गरम असायला हवा जेव्हा आपण गरम बालुशाही त्यात घालू शकतो २ वाटी साखर घेऊन त्यात १ वाटी पाणी घालून थोडी वेलची पावडर , आणी थोडा कलर घालून उकळायला ठेवा , पाकात ४.-५ थेम्ब लिंबू पिळल्याने साखरेचे क्रिस्टलायजेशन होत नाही . त्यामुळे बालुशाहीवर पांढऱया रंगाचा पाकाचा थर दिसत नाही , लक्षात घ्या इथे पाक एकतारी किंवा दोनतारी करायचा नाही फक्त थोडा घट्ट हवा आहे जेणेकरून बालुशाहीच्या आतपर्यन्त व्यवस्थित शोषला जाईल .याची खूण म्हणजे जेव्हा पाक तुम्ही चमच्यावरून खाली सोडाल तेव्हा शेवटचा थेम्ब फार संथ गतीने पडतो. पाक झाला , चला आता बालुशाही बनवून घेऊया. भिजवलेले पीठ हातात घेऊन आपण कापूस कसा पिंजतो तस लिटरली ७-८ वेळा पिंजून घ्या म्हणजे तुकडे करायचे परत गोळा करायचा परत सेम कृती. असं ७-८ वेळा केल्याने त्यात हवा भरून पीठ मस्त खुसखुशीत होत आणि बालूशाही आतून कच्ची राहत नाही ..पीठ पिंजून झालं कि आता गोळे करूया पिठाचे छोटे छोटे गोळे करून थोडं तळ हातावर मळून साधारण मोठ्या पेढ्या इतका गोळा मळून त्याला थोडं चपटा आकार देऊन मधोमध बोटाने आरपार छिद्र पाडून घेऊया आता बालुशाही तळण्याकरिता शकयतो मोठा पसरट फाईंगपॅन किंवा कढई घ्या कारण इथे तेलाचं टेम्परेचर फार महत्वाच आहे जर तुम्ही दोन बॅच करणार असाल तर दुसरी बॅच तळेपर्यंत तेल खूप गरम झालेले असेल आणि मग ती बालूशाही व्यवस्थित होणार नाही .मग पुन्हा तेल थंड करा ,दुसरं बॅच परत तळा हा डबल कुटाणा होईल आता तेल खूप मंद आचेवर गरम करायचं आहे गॅस फ्लेम लो म्हणजे लो च हवि , तेल तापत आल कि एक छोटासा गोळा तेलात सोडून पाहणे हा गोळा तळाला जाऊन वर येई पर्यंत मला १५-२०सेकंद लागले आता सर्व बालुशाही तेलात हळुवार सोडून द्या त्या तेलाच्या तळाशी जाऊन बसतील, त्यांना अजिबात हलवायचा नाही ५-७ मिनिटं झाली कि त्या आपोआप फुलून वर येतात . आता या स्टेज ला गॅस ची फ्लेम मिडीयम करा खालून थोडा गोल्डन कलर यायला लागला कि त्या पलटू न दुसया साईड्ने छान तळून घ्या ह्या सर्व प्रोसेसला १०-१२मिनिट लागतात ( तुम्ही ज्या ठिकाणी, ज्या प्रदेशात आहात त्या तापमानानुसार वेळेत फरक पडू शकतो ) चला आता पाक ही कोमट झालाय आता तळलेल्या बालुशाही पाकात अलगद सोडूया , एका बाजूने ३ मिनिट दुसऱ्या बाजूने तीन मिनिट पाकात भिजत राहू द्या याने बालुशाहीला परफेक्ट असा गोडसर पणा येतो जास्त गोड हवं असल्यास ५ मिनीट भिजू द्या पाकात भिजवलेली बालुशाही काढून १५-२० मिनिट छान सेट झाली कि एअर टाईट कंटेनर मध्ये भरून ठेवून द्या जास्त दिवस ठेवायची असेल तर फ्रीझर मध्ये महिनाभर आरामात राहील पण यकींन मानो हि महिनाभर दूर तुम्ही २ दिवसात गट्टम कराल, खात्री हे आपुन को :) ही पाकक्रुती कशी होइल देव जाणे म्हणुन म्या फकस्त २-४ फोटु काढ्लेत तेच गोड मानुण घ्या बर का मंडळी !!!! ह्यो पैला a ह्यो दुसरा b आन ह्ये फायनल प्रोड्क्ट d e

वाचने 19220
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

शेवटचे दोन फोटो फार म्हणजे फारच कातिल आले आहेत. पैजारबुवा,

In reply to by पियुशा

वा, कठीण नाही मग काम फत्ते. एकदा केल्या होत्या घरी चावताना दात तुटले पण बालूशा तशीच राहिली होती

करुन बघावी म्हणतेय. फोटो बघुन तोंपासु

वा वा मस्तच. आणि पियुशा, किती वर्षांनी, तुझा धागा वाचला म्हणून पण छान वाटले..

In reply to by पियुशा

हा हा हा, गणेशा गणेशा होण्यापासून वाचला. धागा अन बालूशाही मस्तच आहे. अगदी तोंपासू. बालूशाही मला खूप आवडते पण घरच्यांना नाही आवडत त्यामुळे नाही खाता येत.

आकर्षक दिसत आहे बालुशाही. बराच निगुतीने करायचा पदार्थ दिसतोय. वर्णनशैली आवडली.

भन्नाट आणि चविष्ट फोटो.

मला प्रचंड आवडते. पण शेवट्च्या फोटोत रंगीत बुंदी आणि लवंगा टोचण्याचे (ते सुद्धा एकाच बालुशाहिला) प्रयोजन कळले नाहि?

दीपक जी , ती काही लवंग नाहिये पाकातली इलायची चिकटली आहे बालूशाहिला :) आणि माझ्याकडे बालूशाही गार्निशिंग साठी पिस्ते नव्हते म्हणून बूंदी दाने वापरले ;) हाय काय नाय काय :)

हे फोटो जीवघेणे.. पैकीच्या पैकी मार्क घेणारी पाककृती. मस्त. -दिलीप बिरुटे

बालुशाही मस्त.. शेवटचे दोन फोटो भारीच... बाकी बर्‍याच दिवसाने उगवलात मिपावर..

"भिजवलेले पीठ हातात घेऊन आपण कापूस कसा पिंजतो तस लिटरली ७-८ वेळा पिंजून घ्या म्हणजे तुकडे करायचे परत गोळा करायचा परत सेम कृती. असं ७-८ वेळा केल्याने त्यात हवा भरून पीठ मस्त खुसखुशीत होत आणि बालूशाही आतून कच्ची राहत नाही ..पीठ पिंजून झालं कि आता गोळे करूया" अगदी परफेक्ट सांगितले आहे, अशी कृृृृती सांगितली कि पदार्थाची काय बिशाद आहे , बिघडायची.