अन रात झाली शाम्भवी

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
11 Dec 2019 - 6:05 pm

अलवार त्याचा अस्त झाला

अन रात झाली शाम्भवी

चांदवा घेऊन तारे

जणू सूर छेडे भैरवी

कोण या हृदयात आले ?

वाट शोधून ती नवी

प्रहर भासे वेगळा जणू

अंतःपुरा उगवे रवी

गुंजते सुमधुर कर्णी

नाद लावे भार्गवी

श्वास गेले लोपुनी

अन चित्त झाले पाशवी

भेट होता लोचनांची

आत फुटली पालवी

बहरला तो प्रेमवृक्ष

दृष्टी सृष्टी हिरवी

=======================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

11 Dec 2019 - 8:35 pm | श्वेता२४

कविता छान झालीय. पण तुमच्या नेहमीची मुक्तछंद टाईप नाही. आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

जॉनविक्क's picture

11 Dec 2019 - 9:51 pm | जॉनविक्क

_/\_

चित्रगुप्त's picture

12 Dec 2019 - 4:34 am | चित्रगुप्त

सिविपा, खूपच छान सुचलीय कविता.
आणि मलाही 'आश्चर्याचा सुखद धक्का' बसला आहे.

पाषाणभेद's picture

12 Dec 2019 - 9:38 am | पाषाणभेद

सुंदर. आवडली!

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Dec 2019 - 11:06 am | ज्ञानोबाचे पैजार

खरेच, तुमच्या कडून अशी कविता हा एक सुखद धक्का होता. मस्त मजा आली वाचतना...

श्वास गेले लोपुनी
अन चित्त झाले पाशवी

कवितेमधला भाव लक्षात घेतला तर वरील ओळीतला "पाशवी" हा शब्द खटकला. सहसा ह शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरला जातो

लिहित रहा

पैजारबुवा,

रम्य ते प्रतिसाद आले

लागली हळद अंगाला

ऐसेच प्रेम राहू दे आम्हावरी

प्रतिसाद आपुले, आम्हा अमृताचा प्याला

कैसे सुचले देव जाणे

लिहीत गेलो मनापासून

सांसारिक जीवनात ऐसी कल्पना

देई जगण्याचे बहाणे

दुर्गविहारी's picture

13 Dec 2019 - 5:47 pm | दुर्गविहारी

मस्त !! आणखी थोडे काम केले तर छान भावगीत होइल.

प्रचेतस's picture

14 Dec 2019 - 7:19 pm | प्रचेतस

सुरेख झालीय कविता.

अभिजीत अवलिया's picture

14 Dec 2019 - 8:24 pm | अभिजीत अवलिया

मस्त जमलीय कविता. खिलजी साहेबांनी सुखद धक्काच दिला मला अशी कविता करुन.

प्राची अश्विनी's picture

16 Dec 2019 - 11:40 am | प्राची अश्विनी

आवडली कविता.

खिलजि's picture

16 Dec 2019 - 12:22 pm | खिलजि

मनापासून धन्यवाद

राघव's picture

16 Dec 2019 - 12:59 pm | राघव

चांगलंय.
"..रात झाली शांभवी!" छान ओळ!

"शांभवी" म्हणजे काय असतं रे भाऊ ???

खिलजि's picture

16 Dec 2019 - 2:54 pm | खिलजि

मी महादेवाचा भक्त आहे ... तोच कारक प्रेमाचा , उत्पत्तीचा आणि प्रलयाचा .. त्याच्यापासून उत्पन्न झालेले ते म्हणजेच शाम्भवी.. अर्थात इथे अर्थ , पहिल्याच नजरेत होणाऱ्या प्रेमामुळे जी ब्रम्हानंदी टाळी लागते ती म्हणजे शाम्भवी असा घेण्यात आलेला आहे ... शाम्भवी या शब्दाचा दुसरा अर्थ " शंकराची पत्नी पार्वती " .. म्हंटल तर तो पण इथे लागू होऊ शकतो .. घ्याल तो अर्थ आणि कराल ती कल्पना .. तसाही मी एकदम रुक्ष आहे .. या स्त्रीजमातीपासून कोसो दूर आणि प्रेम तर कधी केलंच नाही त्यामुळे फक्त कल्पना सुचतात .. या अश्या प्रेमळ कल्पना तर फार विरळ आणि जास्त करून भयानकच सुचतात ..

जव्हेरगंज's picture

16 Dec 2019 - 8:22 pm | जव्हेरगंज

जबरदस्त!!