विरह X शब्दकथा

पुनप्पा's picture
पुनप्पा in जनातलं, मनातलं
10 Dec 2019 - 7:13 am

रात्रीचे तीन वाजले होते, तिच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती.
नवऱ्याची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला, अजून का बरे फोन नाही आला. नक्कीच फ्लाईट डिले असणार कारण आपला नवरा आपल्यावर किती जास्त प्रेम करतो हे तिला माहीत होते.
किती काळजी करतो आपण, काही नाही येईल नक्की फोन.तिने स्वतःलाच समजावले.
विचार करत करत किती वेळ गेला तिलाही कळले नाही.
अचानक 4 वाजता अलार्म वाजू लागला.
बेडवरून उजव्या साईडला ती वळली तेवढ्यात तो कपडे घालत घालत म्हणाला-
बाईसाहेब निघतो आता मी, दूध घालायला जायचा वखत झाला. आज रातच्याला फोन करा परत मूड असला तर.

संस्कृती

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

10 Dec 2019 - 8:21 pm | पाषाणभेद

याहू गृप बंद झालेत. त्याचा फायदा घ्यायचा का?

ह्यो धोबी हाय का गवळी हाय का नाईट वाचमन हाय? लय रहस्य हाय व्बॉ.

आन मी पयला.

म्हणजे दूधवाला असावा

पाषाणभेद's picture

11 Dec 2019 - 6:57 pm | पाषाणभेद

आता प्लंबर, मिस्त्री, कपडे धुणारा अशा अंगमेहनतींचे वर्शन येवू द्या.

दूधवाल्याच्या पत्नीचे स्वप्न, की तिचा कर्तबगार पती भविष्यात दुग्धव्यवसायाची भरभराट करुन परदेशातही व्यवसायानिमित्त भराऱ्या घेतो आहे.. चार वाजता गजर झाल्याने मोडलं. अरेरे.

पती अजून झोपेतच दिसतो. त्याने स्वप्नातल्या मॅडमला उद्देशून बडबड केली.