पाहीले असे खूप वार

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
24 Nov 2019 - 7:10 pm

अजित अजून गवार
पाहीले असे खूप वार
बोलले ते पवार
बोबडेसे ||

कोण स्वस्त ठरणं
शेतक-यांचे मरण
मुतक-याचे धरण
सांगा आता ||

शिवी-शेणाची होळी
गटा गटांची टोळी
145 जणांची मोळी
बांधवेना ||

कायद्याची बडबड
'मातोश्री'ची तडफड
लोक"शाई"ची फडफड
पाहवेना ||

माध्यमांची गरळ
त्या राउताची बरळ
मुख्य-स्वप्नाचे तरळ
गदारोळ ||

काढीली एकमेक मय्या
आता भूषवीती शय्या
नाचे जणू ता ता थय्या
ज्योकशाही ||

तुमचा तो काळाबाजार
आमचा हा गोराबाजार
खुळ्यांचा शेजार
मुलाखती ||

आकड्यांची वजावट
मग प्रेझ राजवट
सगळी ही सजावट
खुर्चीसाठी ||

सगळेच करा युती
वाटून घ्या खाती
सहकाराच्या खावा ताटी
भरपेट ||

कविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

24 Nov 2019 - 9:15 pm | यशोधरा

मस्त.

खिलजि's picture

25 Nov 2019 - 11:59 am | खिलजि

सुंदर आणि समयोचित

बबन ताम्बे's picture

25 Nov 2019 - 12:35 pm | बबन ताम्बे

सगळा बाजार मांडलाय या राजकारण्यांनी गेले महिनाभर. मी तर म्हणतो पुन्हा निवडणूका लादल्या तर जनतेने "नोटा " वापरावा. बसू द्या ह्यांना बोंबलत घरी. जमेल तेव्ह्ढा राष्ट्रपती राजवटीचा अनुभव घेऊ.

कविता आवडली. ...

श्वेता२४'s picture

2 Dec 2019 - 10:55 am | श्वेता२४

विषण्ण

गोंधळी's picture

2 Dec 2019 - 11:41 am | गोंधळी

कविता आवडली.
पण प्रत्यक्षात आपण आपल्यालाच शिव्या देत आहोत कारण लोकशाहीत लोकच अशा लोकांना निवडुन देतात. त्यामुळे जशी लोकशाही तसेच राजकारणी मिळणार.