मौनाइतके कुणीच नाही

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
8 Nov 2019 - 11:07 am

अथांग, उत्कट, उधाणले तरि
किनार ओढुन जसा समिंदर..
स्थितप्रज्ञ कधि सळसळणारे
जळाकाठचे वा औदुंबर..
प्रेमळ, नाजुक, पोक्त, समंजस
प्राजक्तासम हळवे लोभस..
काजळ रेखुन कधि भिडणारे
खट्याळ हट्टी अवखळ ओजस..
कितीहि काही आत उकळले
संतापाला घट्ट आवरे.‌
शालिन कधि तर भळभळणारे
मिटल्या ओठी दु:ख गोजिरे..
.......
असे देखणे, असे बोलके
मौनाइतके कुणीच नाही.... कुणीच नाही.

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Nov 2019 - 3:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अतिशय सुरेख रचना..

श्वेता२४'s picture

8 Nov 2019 - 5:37 pm | श्वेता२४

सुंदर कविता .आवडली

तुमच्या कविता खूपच छान असतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Nov 2019 - 8:26 am | ज्ञानोबाचे पैजार

असे देखणे, असे बोलके
मौनाइतके कुणीच नाही

हे विषेश आवडले आणि पटले सुध्दा

पैजारबुवा,

यशोधरा's picture

10 Nov 2019 - 9:37 am | यशोधरा

सुरेख.

नाखु's picture

10 Nov 2019 - 9:41 am | नाखु

आहे,
ना बोले तुम या गाण्याच्या जातकुळीतले.

मौन राखण्यात सतत अपयशी मिपाकर नाखु

सोत्रि's picture

10 Nov 2019 - 10:04 am | सोत्रि

पद्यात मला गती नाही पण ह्या रचनेमागचा भाव एकदम भावला!

- (मौनात राहायला आवडणारा) सोकाजी

अनन्त्_यात्री's picture

13 Nov 2019 - 3:13 pm | अनन्त्_यात्री

ही कल्पना अन् कविता दोन्ही आवडली.

प्राची अश्विनी's picture

13 Nov 2019 - 7:12 pm | प्राची अश्विनी

आजूबाजूला इतकं happening राजकारण चालू असताना देखील , ही कविता वाचणा-या आणि मौनाच्या कवितेवर प्रतिसाद देणा-या सगळ्यांना धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2019 - 8:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मौनाची कविता आवडली.
छान. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे
(अजिबात मौनात न राहणारा समिंदर )

शेवटच्या २ ओळी वाचल्यावर वरील ओळींचा अर्थ समजला...

[मौनी मदनबाबा बाणवाले ] :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons – Believer (8D AUDIO) [ Use Headphones To Feel The Experience ]