फटाके

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Nov 2019 - 6:46 pm

फटाक्याची मजा आमच्या पिढी ने बालपणी मनसोक्त अनुभवली..
साधारण नवरात्र सुरु झाले की फटाक्या ्चे स्टोल्स लागायला सुरवात व्हायची..

त्या काळी फटाके पण स्वस्त होते १० रु त टोपली भर दारु (फटाके) यायची..
त्या काळात "तडतडी" नावाचा प्रकार खुप पोप्युलर होता
तडतडी भिंतिवर घासली की इग्नाईत व्हायची अन तडतड आवाज करत जमीनीवर नर्तन करायची..
भुई चक्र... हातात धरायची चक्रे..लवंगी फटाके "लाल किल्ला तांबडे फटाक्याची लड...सुतळी बोम्ब..चंद्रज्रोत..नाग गोळी..भुईनळे.. टिकल्या..
चमन चिडी..आकाशात उडणारे बाण. लक्ष्मी फटाके...एक ना अनेक प्रकार असत..

सकाळी स्नान झाले की आवाजाचे फटाके वाड्यातली आम्ही मुले वाजवत असु...
रात्री शोभेची दारु..
वाडा सिस्टीम असल्याने मधल्या चौकात दारु काम ाचालत असे...
सकाळी कचरा गोळा झाला की त्यात न फुटलेले फटाके शोधणे त्याची सुरसुरी करणे ही वेगळीच मजा असे...
शाळेत दिलेल्या पर्यावरण रक्षण आदी च्या शपता..आदी मुळे हल्ली मुलाना पण फटाके उडवण्यात फारसा रस दिसत नाहि..
पण लहान पणी मनसोक्त फटाके उडवले....
दिवाळी प्यारी त्या साठीच वाटायची

..

मुक्तक

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2019 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुतळी बाँब लहानपणी खूप आवडायचा. व्हेलकोना कंपनी काय तरी नाव आठवतं.
बाकी भुंगा, रेल्वे, हे पण छान होते. असो, अजून आठवणी टाकायला पुन्हा येईन.
लक्ष्मी मोठे फटाके भारी होते.

-दिलीप बिरुटे