( २ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
23 Oct 2019 - 11:10 pm

( २ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांची भटकंती झाली त्याची माहिती अगोदरच्या ( १ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती या लेखात दिली आहे. फोटो बरेच असल्याने काही फोटो या लेखात देत आहे.
( शिल्प ओळख श्रेय - प्रचेतस. )
खजुराहो

फोटो १ लक्ष्मण मंदिर,(खजुराहो) समोरून असे दिसते. सर्वात अधिक गर्दी इथे असते.

फोटो २ खजुराहो गावात हे 'घंटाई मंदिर' आहे. याचा थोडाच खांबांचा भाग शिल्लक आहे किंवा अर्धवट सोडलेले वाटते. उंची पाहता खूप मोठे झाले असते. १

फोटो ३ खांबांवरच्या घंटा आणि साखळ्या शिल्पामुळे 'घंटाई' मंदिर नाव पडले. २

फोटो ४ दुल्हादेव मंदिराची मागची बाजू. छोटेसे आहे, काही शिल्पे तुटलेली आहेत.

फोटो ५ चतुर्भुजा मंदिर ( खजुराहो), विष्णूची मोठी मूर्ती.

खजुराहोतील मंदिरावर दिसणारी देवांची काही शिल्पे.

फोटो ६ शंकर

फोटो ७ ब्रम्हा आणि पद्मावति

फोटो ८ अर्धनारी नटेश्वर, (चतुर्भुजा, खजुराहो. )

खजुराहोतील हॉटेल गोतमा.

फोटो ९ रुम

फोटो १० रुममधून दिसणारे दृष्य.

______________

ओर्छा / ओरछा (झाशीपासून १८ किमि)

फोटो ११ हेरिटेज वॉक नकाशा.

फोटो १२ राजामहल, समोरच्या चतुर्भुजा मंदिरातून

फोटो १३ रामराजा मंदिर, बाजुच्या चतुर्भुजा मंदिरातून . इथे सर्वात अधिक गर्दी असते. भाविक अधिक पर्यटक.

फोटो १४ लक्ष्मी नारायण मंदिरातून दिसणारे ओरछा. १

फोटो १५ लक्ष्मी नारायण मंदिरातून दिसणारे ओरछा. २

फोटो १६ लक्ष्मी नारायण मंदिरातल्या चित्रांत दिसणारे इंग्रज .

_____________________

दतिया (झाशीच्या उत्तरेस २८ किमि) शहर बुंदेला राजांकडे होते.

फोटो १७ दतियाच्या महालातले वरचे ५,६,७ मजले.

फोटो १८ दतिया महालातील आतील भाग

___________________

झाशी शहरात राणी लक्ष्मीबाईचे नाव खूप आदराने घेतले जाते. किल्ला मोठा आणि सुस्थितीत आहे.
राणीचा महाल जवळच आहे. किल्ल्याबाहेर बाजारात. त्याचे म्युझिअम केलय.
फोटो १९ फलक, रानी महल

फोटो २० राणीमहल बाहेरून असा दिसतो.

फोटो २१ वरच्या मजल्यावरचा शयनकक्ष

फोटो २२ महालाच्या जिन्यातली छतचित्रे

फोटो २३ तळ मजल्यावर बरीच शिल्पे ठेवली आहेत. ही देवता कोण?

एक मोठी बाग रानी लक्ष्मीबाई पार्क आहे. भारताचा झेंडा किल्ल्यात आणि या बागेत सतत फडकत ठेवलेला असतो.

फोटो २४ मुख्य कारंजा

फोटो २५ आदरणीय राणी लक्ष्मीबाईचा पुतळा

भारतातल्या पर्यटनाची सुरुवात झाशी किंवा तंजावूर येथूनच करायला हवी असे वाटू लागते.

फोटो २६ गणपती, लक्ष्मण मंदिर, खजुराहो.

फोटो २७ भैरव, पार्श्वनिथ मंदिर, खजुराहो.

फोटो २८ कंदिरिया महादेव मंदिर, खजुराहो. प्रसिद्ध झालेला शिल्पपट

फोटो २९ चौसठ योगिनी मंदिर, शिवसागर तलावाच्या मागे, खजुराहो. इतर मंदिरांपेक्षा वेगळे कारण येथे तांत्रीक पूजा होत. एक झपाटलेला बुवा.

फोटो ३० मकर तोरण, जवारी मंदिर, खजुराहो गाव. प्रवेशद्वाराचे हे तोरण आणि मागच्या छतावरचे शिल्प 'जव' धान्याची आठवण करून देते. हे धान्य इथे पिकत असे. यावरून जवारी मंदिर नाव पडले, पण विष्णू मंदिर आहे.

फोटो ३१ गाइड फी, राजा महल, ओरछा.

फोटो ३२ Sound and light show, timings, राजा महल, ओरछा.

फोटो ३३ दतिया महालांत वेगवेगळ्या जाळ्या आहेत.

फोटो ३४ झाशीचा किल्ला, दक्षिण भाग. याचा पनोरमा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण तो इथे उमटत नाही. किल्ल्याची तटबंदी खूप रुंद आहे. आतमध्ये मध्ये दालनं, कोठारं, कारागृह आहे. महाल नाही. एप्रल २०१९ पासून प्रवेशशुल्क ५०रु केलं आहे. मागे एकदा किल्ला पाहिला होता.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Oct 2019 - 8:19 am | प्रचेतस

हा भागही अतिशय नेटका. छोटेखानी घंटाई मंदिर आवडले.

फोटो ६
शंकर

हा शंकर नसून हरिहर असावा. कमळ आणि चक्र आणि बहुधा छातीवर श्रीवत्स ही विष्णूची आणि एका हातात नाग, वाहन नंदी अशी शिवाची लक्षणे दिसत आहेत.

फोटो २३
तळ मजल्यावर बरीच शिल्पे ठेवली आहेत. ही देवता कोण?

बहुधा पार्वती. एका बाजूला गणेश आणि स्तनपान करणारा कार्तिकेय दिसतोय.

यशोधरा's picture

24 Oct 2019 - 8:34 am | यशोधरा

वा, सुरेख!

सुधीर कांदळकर's picture

24 Oct 2019 - 10:56 am | सुधीर कांदळकर

पहिला भाग पाहून्/वाचून आमच्या चार जणांच्या चमूतल्या दोघांनी नक्की केले आहे. आता फक्त सुप्रीम कोर्टाची पसंती आली कि झाले. दिवाळीची सुटी आणि नाताळची सुटी यामधे शनिरवि टाळून जायचे ठरत आहे. हे केवळ तुमच्या सुंदर लेखांंमुळेच बरे कां!

सहलप्रवर्तक सुंदर लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

अनिंद्य's picture

24 Oct 2019 - 11:17 am | अनिंद्य

सहलप्रवर्तक खरा लेख.

दतियाबद्दल - तिथल्या जुन्या राजघराण्याच्या उदार आश्रयामुळे तांत्रिक/अघोरी संप्रदायाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध. ग्वाल्हेरचा सिंधिया / शिंदे परिवार तांत्रिक अनुष्ठानांसाठी नियमित भेट देत असे. सध्याच्या पिढीतील वसुंधरा राजे, यशोधरा राजे, जोतिरादित्य सिंधिया मंडळी आजही कुठल्याही महत्वाच्या प्रसंगाआधी दतियाला जरूर जातात.

तसेच कामेच्छा वाढवणाऱ्या अनेक आयुर्वेदिक औषधांची 'शेती' या भागात करतात.

सुमो's picture

24 Oct 2019 - 11:58 am | सुमो

छायाचित्रे.