...आणि या मार्गानेही खरंच जग जवळ आले

सचिन's picture
सचिन in जे न देखे रवी...
30 Sep 2019 - 9:29 am

व्हॉट्सअप च्या ग्रुपमधून नाव काढून टाकले
आणि सोशल मीडियाचे भूत मानगुटीवरून उतरले
मोबाईलच्या गुलामीतून जणू स्वातंत्र्य मिळाले
"मान वर करून" आता जगता यायला लागले

ह्याचा फॉरवर्ड त्याला, त्याचा फॉरवर्ड ह्याला
भलभलत्या विषयांवरचे वादविवाद संपले
दिवसाचे तास तर एवढे वाढलेत आता
की लॉंग पेंडिंग पुस्तकांचे वाचन करता आले

हॅप्पी गणेश चतुर्थी आणि हॅप्पी गुढी पाडवा
ईद,ख्रिसमस, पोंगल, ओणम सकट सगळे
सेल्फ्या काढण्या शिवाय सुद्धा
साजरे व्हायला लागले

बर्थ डे बिर्थ डे सारे मात्र लक्षात ठेवणे आले !
एच बी डी पोस्ट करण्यापेक्षा फोन सुरु केले
"कॉन्टॅक्टस"शी बोलून जरा सेंटी बिंटीही वाटले
आणि या मार्गानेही खरंच जग जवळ आले

कविता