जन्माष्टमी२.*

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जे न देखे रवी...
25 Aug 2019 - 3:28 pm

कृष्णाच्या नांवे जो होतो आजकाल दहीहंडीचा खेळ
तो खेळण्या, पाहण्या सगळ्यांनाच असतो अमाप वेळ
पुन्हा पुन्हा जे कष्टतात, गोविंदांचे थर रचण्या
अनेक पाठीराखे, सम्राट असतात हजर त्यांचे प्रयत्न पाहण्या

खेळकऱ्याना वाटते, अरे वा, आज आपल्याला बराच मिळाला भत्ता
सम्राटांना वाटते, चला, आणखी काही काळ राहायला हवी सत्ता
जिथे कुठे मारता आला डल्ला, त्यातलाच थोडा लुटवा आज खेळावर
खेळाडूंना होऊ दे खूष, दिसू दे जोरदार जोश, होऊ दे जोरदार कल्ला

हे खेळाडू, त्यांचा खेळ, त्यांचे पाठीराखे पाहताना.
वाटते आहोत रोमन काळांत
खेळाडू असतात झगडत, आदळत
सम्राट आणि मोठे मोठे पाठीराखे, त्यांच्या वेगळ्याच व्यासपीठावर असतात,
त्यांच्याच विश्वांत, वेगळ्याच उद्योगांत

रोमन सम्राटांना, पाहायला जसे हवे असत,
गुलाम योध्ये मैदानांत एकमेकांशी झुंझत
उडायला हवी असे वारंवार रक्ताची चिळकांडी,
दिसायला हवी असे वेळोवेळी एखादी तरी चिरलेली मांडी

तसेच आताचे सम्राट, खेळवतात गोविंदांना
दाखवून बक्षिसाचे आमिष, दहीहंडी फोडतांना
एखादा थर कोसळो किंवा कोणी होवो जायबंदी
सम्राटांना करमणूक हवी म्हणूनच तर असते दहीहंडी

या सगळ्या उत्तेजित खेळकऱ्याना, असो नसो नोकरी चाकरी
पोटापुरती सुद्धा जर नसेल त्यांना मिळवता येत भाकरी
दही हंडी होऊन गेल्यावर सम्राट त्यांना फक्त शिकवतात करणे राडा
जरी त्यामुळे कुणाचाही न होता फायदा, थांबून जातो गांवगाडा

एकेकाळी कृष्णानें जरूर दिले होते वचन
देशाच्या, धर्माच्या संकटकाळांत मी पुन्हा अवतरेन
कृष्णाच्याच नांवाने होणाऱ्या या उत्सवांत
त्यालाच, शाबूत ठेवण्याकरता, वाटेल घट्ट झांकावे कान

खऱ्याच संकटात, जरी करून दिली त्याला वचनाची आठवण
वाटेल तरी का त्याला, पाळायलाच हवे आपले वचन ?

मांडणी