काल धरण बांधिले
खेकड्यांनी हो तोडिले
येरू म्हणे बघा नीट
विठू चरणीची वीट
सृष्टीचा जो तोले भार
त्यासी विटेचा आधार
युगे अठ्ठावीस ठेला
विठू विटेवरी भला
वीट अजूनी अभंग
बघणारे होती दंग
मूळ माल जर नीट
(जशी विठ्ठलाची वीट)
तर फिजूल बोभाट
नको खेकडी खटपट
प्रतिक्रिया
12 Jul 2019 - 5:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
बरोबर आहे.
भारताच्या राजकारणाला लागलेला हा खेकडारोग (कर्करोग) नागरिकांच्या कराला आणि इतर संसाधनांना भगदाडे पाडत असतो. तो समूळ नष्ट झाला पाहिजे, तरच उज्वल भवितव्याची आशा ठेवता येईल !
12 Jul 2019 - 7:49 pm | जालिम लोशन
काय अवस्था आहे राजकीय नेत्यांची?
12 Jul 2019 - 7:57 pm | खिलजि
खेकड्याची औलाद म्हणता म्हणता
बापालाच आरोपी केलं
हर्रामी राहिले असेच मोकळे
गाव वाहून गेलं
कुणी बांधलं , कसं बांधलं
बसेल समिती आता
तोपर्यंत साले हादडून घेतील
मग निवांत खातील लाथा
12 Jul 2019 - 8:32 pm | यशोधरा
चपखल कविता.
15 Jul 2019 - 7:39 pm | अनन्त्_यात्री
देणार्या सर्वांना धन्यवाद!