सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
9 Jul 2019 - 7:19 pm

सुखाच्या सीमेवर दुःखांची घरे वसतात

तुम्ही हसा प्रसन्नतेने ,मग बघा आजूबाजूला कश्या चीता पेटतात

तुमच्या हसण्याची किंमत , तुम्हालाच ठाऊक नाही

तुम्हाला हसताना बघून, त्यांचं स्वतःच कामच होत नाही

त्यांचं खिन्नपण जणू तुमच्याशीच निगडित असतं

वाया घालवत असतात वेळ , हळूहळू प्रारब्ध बदलत असतं

रोवूनीया झेंडे कैक , कैफ मिरविती एकमुखाने

एक हास्याची लकेर मात्र , सारं काही उधळत असतं

कोण कुणाच्या मनी वसला , तरीहि गवसत नाही कुणाला

फक्त एका हर्ष होता , सारे बैसती पुसत दुःखाला

षड्रिपूंच्या विळख्यात सारे ऎसेकाही गुरफटलेले

बघा इथे ओ पूर आला , जो तो संगे वाहत गेला

विचारले मी त्याला , हसण्याचे कारण ओ कैसे ?

तो उत्तरला उत्तर देउनी , वेड लागले मला जरासे

या वेडातच दुनिया सारी , दुःखीकष्टी झाली भारी

हासुनिया त्याने पेटवल्या , चीता सर्वदूर घरोघरी

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

जीवनमान

प्रतिक्रिया

मनातला दर्द कवितेत उतरला आहे.....

जॉनविक्क's picture

9 Jul 2019 - 11:52 pm | जॉनविक्क

चित्रगुप्त's picture

10 Jul 2019 - 2:40 am | चित्रगुप्त

तुम्ही हसा प्रसन्नतेने ,मग बघा आजूबाजूला कश्या चीता पेटतात....
... अगदी खरे.
.

या कल्पनेचे श्रेय नक्कीच आमचे गुरुदेव श्री श्री श्री अक्कुकाका , गड्डा झब्बू साहेब आणि गावी साहेब याना आहे .. काळ गड्डा शेट यांचा उत्तरार्ध वाचला आणि त्यावर जे अभिप्राय येत गेले , ते वाचून वाचून माझी बोबडीच वळली होती.. इतका हसलो इतका हसलो कि विचारून सोया नाही .. हे भगवान ,, ते गविसाहेबांचं मत प्रदर्शन करण्याची हातोटी तर लाजवाब आहे .. त्यांनी जेव्हा तो प्रतिसाद टाकला ,, कि काहीच स्कोप नव्हता का ? मी अक्षरशः त्या पात्रामंध्ये घुसलो होतो आणि वेड्यासारखा हसत होतो हसत होतो .. पण तुम्हाला सांगू , आमच्या इथे त्याचवेळेला एक कायरल मॉलेक्युलवर महत्वाची डेव्हलपमेंट चालू होती गेले दहाएक दिवस ..ते सर्व टेन्शन घेऊन काम करतायत आणि मी हसत हसत त्यांनी निर्माण केलेला डेटा बघत होतो .. त्यांची थोबाडं बघण्यासारखी होती .. काहींना तर राग येत होता .. काही हितशत्रू आहेत त्यांचे तर हाल बघण्यासारखे झाले होते .. पण साक्षात गुरुदेवांची कृपा , वाचून वाचून डोळ्यात पाणी आले होते आणि या पाण्यानेच माझे काम हलके करून टाकले .. मी सर्व मोबाईल फेज , १०० % बफर मध्ये लावली आणि उत्कृष्ट नमुना बाहेर आला . सर्वजण चाट पडले .. आहे कि नाही गुरुदेवांची कृपा .. आणि मग कल्पना प्रसवली त्या हितशत्रूंकडे बघून ... धन्यवाद गुरुदेव , असेच सामर्थ्य लाभो आणि गड्डा झब्बू साहेब आणि गावी साहेब तुम्हालाही धन्यवाद बरे का ..

धन्यवाद सर्व वाचक मंडळींना