राहुलमामाचं पत्र सापडलं

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
3 Jul 2019 - 7:39 pm
गाभा: 

मिपावर मी काढलेल्या "तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या" या चर्चा धाग्याची चार वर्षे जवळपास १९०० वाचने होऊनही एकही प्रतिसाद येत नाही पण भारतीय राजकारणाततर घराणेबाजीचा प्रभाव आजतागायत तरी टिकून आहे हे मला न सुटलेल्या गणितापैकी एक गणित असो.

निमीत्त आहे भारतीय राजकीय घराणेबाजीतील एका प्रसिद्ध घराणेबाज म्हणजे मिराया आणि रेहान वड्रांचे राहुलमामा म्हणजे राजकीय पक्षातील पदावरून रजा. आता ही रजा तात्पुरती की कायमची ठरेल हे येणारा काळ ठरवेल, पण या रजापत्राचे सध्याचे नाव तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून २०१९ मधील राजीनामा असे आहे.

आमचे व्यक्तिगत मत विचारात तरी जाहीर तमाशाचे स्वरुप काही असले तरी अद्यापतरी संसदीय पक्षाचे प्रमुखपद स्वतःकडे राखून तसेच मोर्तीलाल वोरा ते काँग्रेस वकींग कमिटीच्या इतर नेत्यांच्या माध्यमातून राहुलमामाच्या मातोश्रींचे रिमोट कंट्रोलवर नियंत्रण बरकरार राहील. राहुलमामा पेक्षा अधिक लोकप्रीयतेचा नेता मिळाला नाही पण त्याच्या हयातीत पुन्हा केंद्रात सत्ता मिळाली तर राहूलमामा प्रैयांताईई, रॉबर्टराव, रेहान लवकरच राव होईल ते मिराया यांचे क्रमांक लागण्यास वाव शिल्लक रहाणार आहे. ते असो.

कथित राजीनामा निमीत्ताने राहुलमामाचे न हरवलेले एक पत्र भारतीयांना पावले आहे. पत्राचा उद्देश २०१९च्या लोकसभा निवडणूकीतील अपयशाची जबाबदारी पदास चिटकून न रहाता घेणे आहे असा दावा आहे.

पद सोडताना याला त्याला दोष न देता इच्छा झाल्यास जबाबदारी घेत सोडावे यात एक ग्रेस असतो अशी किमान माझी व्यक्तिगत धारणा आहे. व्यवस्थेतील कमतरता दाखवू नयेत असे नाही त्या राजीनाम्या नंतर काळाच्ओघातूनत पण मांडता येतात, पण राजीनामापत्रातून दोष दिल्यास जबाबदारी मनापासून घेतली असे होत नसावे असे वाटते.

आम्ही प्रेमाचे राजकारण करतो म्हणायचे आणि त्यातच द्वेष प्रदर्शनही करायचे या विरोधाभासी वर्तनास सर्वसामान्य राजकारणी या नात्याने दुर्लक्षही करता येते पण भूमिकेत एकुणच कुठेतरी परिपक्वतेचा अभाव होता हे अधोरेखित होते असे वाटते, मी सर्वपक्षीय घराणेशाहीचा विरोधक असल्याच्या माझ्या पुर्वग्रहामुळे मला तसे वाटत असेल तर माहित नाही. पण हे संबंधित राजीनामापत्र नकारात्मक प्रचार तंत्राचा भाग असल्याचा अभास होतो आणि नकारात्मक स्वरुपाचा प्रचार हा राजकीय जोखीमीचा ठरू शकतो या बाबत मी पुर्वी धागा चर्चा काढलेली होती त्याची आठवण या निमीत्ताने झाली.

राहुल (राजीव-सोनीया) गांधींची आतापर्यंतची थोडक्यात कारकीर्द

जन्म १९ जून १९७० सध्याचे वय ४९ वर्षे

अधिकृत राजकारण प्रवेश मार्च २००४ वय ३४ लोकसभेत अमेठीहून घराणे-नियूक्त

काँग्रेसपक्षातील पहीले अधिकृत पद २००७ घराणे-नियूक्त

घराण्याचा रिमोट असल्यानंतर पदाच्या नावांना तसा अर्थ नाही डिटेल हवेच असतील तर २००७ जनरल सेक्रेटरी आणि युवा काँग्रेस प्रमुखपद, २०१३ उपाध्यक्षपद आई सोनीयाच्या पक्षाध्यक्षपदासोबत डिसेंबर २०१७ ते आज ३ जुलै २०१९ काँग्रेसचे घराणे-नियुक्त अध्यक्षपद

मामाचे पत्र सापडल म्हणून राहूलची भाचे मंडळी राजकारणात केव्हा पदार्पण करतील ते ठाऊक नाही, पत्राच्या काडीचा आधार घेऊन कोंग्रेस काही काळ तग धरेल गांधी घराण्याने खरेच हात काढला तर जनतापक्ष/दल प्रमाणे प्रादेशिकपक्षात विभाजनाची प्रक्रीया सुरु होईल. राहुल गांधींच्या पत्रातिल एक वाक्य काँग्रेस आता संपली पाहीजे म्हणणार्‍या राजकीय निरीक्षक योगेंद्रच्या अलिकडील वाक्याशी मिळते .

टक्केवारीने कोंग्रेसकडे आजही मतदारवर्ग आहे राज्यसभेत जागा आहेत. पण काँग्रेसचा मतदार वर्ग आणि आयडीयॉलॉजी यात एक तफावत आली होती गांधी नेहरूंपासून ती केव्हाच दूर गेली होती. काँग्रेसला एक ठेऊन खालपासून बांधणी करू शकणारा कुणी कुटंबेतर नेत पुढे येईल का की भारतात काँग्रेसची जागा एखादा वेगळा राजकीय पक्ष घेईल हे येणारा काळ सांगेल.

माझे राजकीय विषयावरील मिपालेख धागे

* भाच्यांसाठी आणि भाजपा टिकाकारांसाठी राहुलमामाचे पत्र

* राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा

* निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

* राज्यसभेच जटील गणित
.

* नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

* माझ्या मामाचं पत्र हरवले

प्रतिक्रिया

सोडून बघाच पक्षाचं भलंबुरं काय होतं ते.
१५२ सभा घेतल्या, ११९ ठिकाणी पक्ष निवडून आला नाही. (चानेल चर्चेतून).

आपल्या व मुलाबाळांच्या आयुष्यावर परिणाम करणार्‍या विषयावर विचारमंथन होतांना दिसत नाही!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jul 2019 - 11:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

मग, तुम्हीच एक प्रगल्भ धागा काढून मिपाकरांच्या डोळ्यात (?डोक्यात) झणझणीत अंजन घाला. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी असे म्हणतात. :)

वटवृक्षाच्या सावली मुळे त्या झाडाखाली कधीच दुसरे मोठे झाड फोफावत नाही .
त्या प्रमाणे विशाल कर्तृत्व असलेल्या घरात तसेच विशाल कर्तृत्व असलेला वारस तयार होत नाही .
सर्व राजकारणी घराणी आणि राजेरजवाडे चा इतिहास साक्षी आहे .

तमाम काँग्रेसजन देव पाण्यात बुडवून बसले होते !!! त्यांना मुलांच्या राजकीय भविष्याने चिंताग्रस्त केले होते . आणि शेवटी रागाने स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट टिकविण्यासाठी राजीनामा मागे घेतला नाही .
त्यांच्या राजीनाम्या मुळे भाजप ने एक स्टार प्रचारक गमविला आहे व भाजप चे कधीच भरून न येणारे नुकसान झाले आहे .
मामा ने राजीनामा घोषीत केल्या पासून काँग्रेस मध्ये चांगले बदल होत आहेत . त्या जायरा वासिम ला अभिषेक सिंघवीनीं " हलाला जायज और ऐक्टिंग हराम ? " असे विचारुन आता काँग्रेस शांतधर्मिया च्या डोळ्यांत अंजन घालू शकते हे संघाच्या विघ्नसंतोषी लोकांना दाखविले . खरं म्हणजे ' शांतीदूताचीं दाढ़ी कुरवाळत बसणारी काँग्रेस ' अस सतत पाहण्याची सवय असणाऱ्या भारतीयांना हे जरा नवीनच होते पण मिपाकरासह तमाम मीडिया ने त्याकडे सोइस्कररित्या दुर्लक्ष केले .

तमाम भारतीयांना सतत हसत ठेवण्याचे पवित्र काम रागा करत राहतील अशी माझी देवाचरणी प्राथर्ना आहे !!!!!!!!!

धर्माच्या राजकारणातील उपयोगाने बांधील भाजपाच्या दृष्टीकोणावर राजीनामा पत्रातून टिका करणार्‍या राहुलबाबूंनी आदल्या दोन-तीन दिवसात चर्चेत आलेल्या कथित अल्पसंख्य समुदायाच्या एका कळपाकडून झालेल्या चुकीच्या कृत्याचा निषेध सोडा साधा खेद दुख्ख व्यक्त करण्याची इच्छा झाली नाही की सुचले नाही. जे असेल ते असो त्यांच्या सेक्युलॅरीझमवर जनतेने नेमका कसा विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित होतो. संबंधित घटनेवरच्या राहुलबाबूंच्या खेदजनक दुटप्पी मौनाबद्दल मी संबंधीत धाग्यावर हा प्रतिसाद देऊन टिका केली आहे.