शोधत होतो पुन्हा स्वत:ला
उपसत होतो पुन्हा पुन्हा मी
पुरातनाची प्रचंड पडझड
परंपरांची अपार अडगळ
शोधत होतो अथक स्वत:ला
ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी
वर्तमान हतबल करणाऱ्या
भवितव्याचे भीषण पडघम
ऐकत होतो अधीरपणाने
माझीच अनोळखीशी चाहूल
कळून चुकला पुन्हा, स्वतःचा
शोध विफल ठरण्याचा संभव
प्रतिक्रिया
18 Jun 2019 - 1:38 pm | खिलजि
हि रचना काही पटली नाही , अशीच पूर्वीची छान झाली आहे ...
19 Jun 2019 - 9:54 am | ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या या आधिच्या कवितांमधून तुम्हाला जे सांगायचे आहे ते स्पष्ट पणे समजते.
पण इकडे वाचताना माझा थोडा गोंधळ झाला.
कदाचित थोड्या वेळाने परत वाचले की समजेल.
पैजारबुवा,