" कशी आहेस ? "

Primary tabs

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
20 May 2019 - 5:43 am

" कशी आहेस ? "

वेशीमधून बाहेर पडताना
उरले सुरले बळ एकवटून
त्याने शेवटी विचारलेच

" कशी आहेस ? "

निर्विकार डोळ्यांनी
निर्विचार मनाने मग
मीही फक्त मान हलवली .

शब्द खूप जड असतात ........
परत कोण ..... ...
ते ओझं वाहणार........
नाहीतर सांगितलं असतं त्याला
"जशी सोडून गेलास ....... तशीच आहे !"

-----------------फिझा !

कविता

प्रतिक्रिया

सोन्या बागलाणकर's picture

20 May 2019 - 8:51 am | सोन्या बागलाणकर

वा मस्त!

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 May 2019 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार

जे घडाघडा बोलायला ते न बोलता समोरच्याने समजावून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते.
त्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:ख आयुष्यभर वागवत बसावे लागते,
पैजारबुवा,

सोन्या बागलाणकर's picture

20 May 2019 - 12:01 pm | सोन्या बागलाणकर

आणि पुरुषांचा हा प्रॉब्लेम आहे की तिच्या मनात आपल्याबद्दल काही भावना आहेत की नाही ते कळायला मार्ग नाही. त्यामुळे उगाच सॅंडलचा टॅटू कशाला गालावर गोंदवून घ्या म्हणून ते पण दुसऱ्या मुली शोधायला लागतात. =)))

महासंग्राम's picture

20 May 2019 - 1:48 pm | महासंग्राम

abc

प्राची अश्विनी's picture

20 May 2019 - 11:09 am | प्राची अश्विनी

क्या बात!

नाखु's picture

20 May 2019 - 3:58 pm | नाखु

याला म्हणतात खरी कविता.
किमान शब्द कमाल आशय.
छंदफंद याच्या चरकातून काढला आणि उपमा चंद्र यांच आलं लिंबू मारून केलेल्या ऊसाच्या रसाच्या कविता महीनाभर धुमाकूळ घालत होत्या...

दिवस सार्थकी लागला.

चुकार आडवाटेचा पांथस्थ वाचकांची पत्रेवाला नाखु

दोन चारोळीच्या तुकड्यानी

जीवन घट्ट पेलून धरलं

तू निघून गेलास जिथून

तिथेच मनाला पुरून टाकलं

तेच तेच बघून बघून

मी पुन्हा पुन्हा तिथेच जाते

त्याच प्रहरांशी , झाडावेलींशी खेळत

तुझी वाट बघत असते

माझी स्वाक्षरी ( प्रेरणा मदनबाण साहेब )

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 May 2019 - 3:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

जमलीये...

जालिम लोशन's picture

22 May 2019 - 3:55 pm | जालिम लोशन

+१

अन्या बुद्धे's picture

23 May 2019 - 6:07 pm | अन्या बुद्धे

आवडली.. नेमकी तरीही सूचक

चाणक्य's picture

25 May 2019 - 6:35 pm | चाणक्य

प्रभावी झाली आहे.

वरुण मोहिते's picture

25 May 2019 - 7:14 pm | वरुण मोहिते

लिहा अजून

वरुण मोहिते's picture

25 May 2019 - 7:14 pm | वरुण मोहिते

लिहा अजून