Skip to main content

खाण्यासाठी जन्म आपुला १ : साई दावणगिरी डोसा

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 17/05/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे जसं जसं वाढत चाललं आहे तसं तसं खाण्याच्या बाबतीत हि ग्लोबल होत जाते आहे. आधी इडली डोसा सारखे दाक्षिणात्य पदार्थ म्हंटल की लोकांच्या तोंडी रुपाली-वैशाली-वाडेश्वर हि नाव यायची, आता अपसाऊथ, सांबार, अण्णाज इडली वगैरे साऊथ इंडियन पदार्थ खाऊ घालण्याच्या नावाखाली चकचकीत रेस्टॉरंट आली. पण या सर्वात एक कमी होती ती म्हणजे या पैकी एकही जण धड चवीचा 'लोणी स्पंज डोसा' देऊ शकत नव्हतं. फक्त या ठिकाणीच नाही तर पुण्यात इतरही ठिकाणी हातगाडीवर सुद्धा लोणी स्पंज च्या नावाने कोरडे ठक्क छोटे छोटे डोसे देतात, ज्यात ना धड लोणी लावलं असतं ना भाजीत मिठ. त्यामुळे खरा लोणी स्पंज डोसा खायला आता कोल्हापूरात नाहीतर दावणगिरी ला जावं लागतं की काय अशी परिस्थिती होती. पण सुदैवाने बालगंधर्व च्या बाजूला असणाऱ्या जोशी वडेवाल्यांच्या गल्लीत 'साई दावणगिरी डोसा' सेंटर ने तशी वेळ येवू दिली नाही. लोणी स्पंज डोसा कसा असावा हे जर खरचं टेस्ट करायचं असेल तर इथे भेट द्यायलाच हवी. आपल्या डोळ्यांसमोर तयार होणारा लुसलुशीत डोसा, त्यावर हयगय न करता टाकलेलं लोणी, सोबतीला चविष्ट अशी बटाटा भाजी, ओल्या नारळाची आणि लाल चटणी. आहाहा ! तिन डोस्यात हमखास पोट भरणार म्हणजे भरणारच. यातले तीन डोसे जर पिळले तर 50 ग्रॅम तरी लोणी सहज निघेल. दावणगिरी चा डोसा तर इथली खासियत आहेच पण पुण्यात सहसा न मिळणारी गरमागरम वाफवलेली 'तट्टे इडली' पण एकदम खतरनाक भारी आहे. किंमत म्हणाल तर अगदी खिशाला परवडणारी अशी आहे. ;- खादाडखाऊ मंदार abc

वाचने 17791
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

ओके ! नक्की जाऊन ट्राय करेल. रच्याकने एक गोष्ट सुचवाविशी वाटेल , अश्या कोणत्या जागेबद्दल लिहीत असाल तर झोमाटोची लिंक पण देत जा. मेनू, किंमत, अचूक जागा हे सगळं कळून जाईल.

In reply to by उगा काहितरीच

झोमॅटो नाही सापडली. गुगल मॅपची आहे. फोटोमध्ये मेनूचा फोटो आहे.

In reply to by कंजूस

काका फक्त डोसा कसा लागेल खायला, चटण्यांमुळे वेगळी टेस्ट येते हे नक्की.

थँक्स मला आवडणारी एक लोणी डोसा गाडी रविवारपेठेत मिर्झा गालिब रस्त्यावर आहे.

फक्त संध्याकाळीच नाही ना लागत.? ानागनाथ पाराच्या अलिकडल्य चौकात कुमठेकर रोडवर नाना फडणविसांच्या देवळाशेजारी सकाळ 10.30 पर्यंत आणी संध्यांकाळी ५.३० ते ६.३० पर्यंत दडपे पोहे, दहिवडे, मिसळ, एक नंबर . किमंत जास्तीत जास्त ४० रु. हातगाडी आहे.

In reply to by अभ्या..

नानांचे नाही रे नानांनी बांधलेले मंदिर आहे ते पण सध्या फुल रंगरंगोटी करून नूर बिघडवून टाकलाय मंदिराचा, बाजूला त्यांचा वाडा पण होता बहुतेक

In reply to by जालिम लोशन

अरेरे, मंदिर नाहीये व्हय नानाचे, राजकारण्यांना नवस बोलायला हक्काचे ठिकाण झाले असते. असो, वल्ल्यासोबत दडपे पोहे दडपायला एकदा जावेच

In reply to by यशोधरा

अर्रर्रर्र वल्ल्यासोबत म्हणजे मला ओले दडपे पोहे वाटले. जल्ला -वल्ला टाईप

In reply to by महासंग्राम

अरे एकटा वल्ल्या म्हनजे कालकेयाची फौज आहे आक्खी. एकटा कुठे असणारे वल्ल्यासोबत? बाकी तुझा युक्तीवाद पटला कारण आमच्या गावात वली भेळ असा बोर्ड पाह्यलाय. मौलाना, इमाम भेळ नाही का असे विचारावे वाटले पण उगी भौना कशाला दुकवाव्यात मनून गप सुखी भेळ घेतली.

त्यांचे वशंज, अजुन शेजारी plants nursery आणी दुकान चालवतात ःमेणवली प्राॅडक्टस म्हणुन. अजुन एक ज्ञानप्रबोधनीच्या perpendicular समोर सृजन फुडस दुकान आहे. तिथे आलु पराठा, मेथीृ पराठा, थालीपिठ सुदंर मिळते. किमंत ४० ते ६० रु. भुकेच्यावेळी वेटिंग असते.

करवीरातल्या दोन लोणी डोश्यांविषयी अजून कोणीच कसं बोललं नाही? अर्ध्या शिवाजी पुतळ्याजवळचा लोणी डोश्याला लतादीदीप्रमाणे आवर्जून नावडून घेणारे काहीजण नक्कीच असतील. तरीही ज्या प्रमाणात तिथे डोश्यात (म्हशींचं) लोणी रिचवले जाते तितकं त्यानंतर इतरत्र मी कुठंही पाहिलं नाही. (सध्याचं ठाऊक नाही) आशाप्रमाणे राजारामपुरीतल्या जसवंतच्या बाजूचा लोणीडोसा मात्र पोटभरू, चवीला उत्तम आणि खिशाला खूपच परवडणारा होता. आठव्या गल्लीतही एक चांगला डोसेवाला होता. या साईला भेट द्यायलाच हवी.