( उन्हाळ्यात लग्न, हनिमूनचा अनुभव सुखदायक असतो का? )

Primary tabs

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in काथ्याकूट
13 May 2019 - 12:59 pm
गाभा: 

एप्रिल व मे महिन्यात लग्नाचा सिझन असल्याने आणि बऱ्यापैकी सुट्टी असल्याने विविध ठिकाणी लग्नाचे आयोजन केले जाते. प्रत्येक कुटुंब आपली आर्थिक परिस्थिती प्रमाणे लग्नाचा बेत आखतात. पण लग्नात आनंद लुटण्या ऐवजी सिझनची बरीच धगधग होते. उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असतो व आंगाची लाहीलाही होत असताना नको ते लग्न आणि नंतर हनिमून असे वाटते. प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही जण स्वताची चार चाकी घेऊन जातात, काही भाड्याने, काही गाडीने काही वातानुकूलन बस तर विमान. हनिमून सुखदायक असतो असे नाही. आपले अनुभव काय आहे?

प्रतिक्रिया

चेतन सुभाष गुगळे's picture

13 May 2019 - 1:19 pm | चेतन सुभाष गुगळे

तसेही दर वर्षी इथे उन्हाळ्यात लोडशेडींग असल्याने पंखे / एसी करिता इन्व्हर्टर / डीजी सेट चा खर्च करावा लागतो किंवा थंड हवेच्या ठिकाणी जावेच लागते. पहिल्या वर्षी हनिमुन आणि त्याच्या पुढील वर्षी लग्नाचा वाढदिवस साजरा करायला तुम्ही एप्रिल मे महिन्यात हिल स्टेशन ला जाऊ शकता. जर तुम्ही उन्हाळ्या ऐवजी इतर ऋतूत लग्न केले तर हा आऊटिंगचा खर्च दोनदा करावा लागेल. ह्याच मोसमात लग्न केल्यास लग्न आणि पुढे लग्नाचा वाढदिवस (आणि त्याही पुढे मुलांच्या शाळेच्या सुट्यांचा मोसम) हे सगळे सोबतच घडत असल्याने वर्षात एकदाच आऊटिंगचा खर्च होईल.

बाकी सुखदायक वगैरे ह्या सापेक्ष गोष्टी आहेत. इथे हनिमून, लग्न हे प्रकार इतर लोक करतात म्हणून आपण करावे अशी परिस्थिती आणि विचारसरणी असणारेच बहुसंख्य आहेत.

एन्जॉय करणारे दोन साक्षीदारांसमोर रजिस्टर्ड मॅरेज आणि वन रुम किचनमध्येही हनिमून एन्जॉय करतात. बाकी स्वित्झर्लंडला जाऊनही धुसफूसत परतणारेही दिसतातच की.

चौथा कोनाडा's picture

14 May 2019 - 5:15 pm | चौथा कोनाडा

छान. अगदी व्यावहारिक दृष्टिकोन.

आपण आपल्यातल्या / जोडीदारच्या रोमँटिसिझमला पायबंद घालता आला तर !

इथं बघा, या माणसानं सेम तुमच्या सारखीच मतं मांडलेली आहेत
लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च / मोडीत काढण्याजोगी परंपरा

महासंग्राम's picture

13 May 2019 - 1:50 pm | महासंग्राम

आमच्या ह्यांना विचारून सांगते

इती - माईसाहेब

चौथा कोनाडा's picture

19 May 2019 - 11:52 am | चौथा कोनाडा

सांगितलं का तुमच्या त्या "ह्यांनी" ?
:-)

अशी आयुष्यात कितीशी लग्ने करता येतात ?

महासंग्राम's picture

13 May 2019 - 2:01 pm | महासंग्राम

कंकाका ते तुम्ही कोण आहात यावर अवलंबून असतं. चार्ल्स शोभराज वगैरे प्रभूती काहीही करू शकतात खिक्क

चौ को, तुमचं वय माहीत नाही, पण लोकांचे अनुभव वाचून तुम्ही प्लॅनिंग करणार आहात का ?
किंवा तुमचं सगळं आधीच झालं असल्यास आधी तुमच्या हनिमूनचे अनुभव सांगा. :-)

जालिम लोशन's picture

13 May 2019 - 3:07 pm | जालिम लोशन

छान विडंबन. मला वाटले मराठी माणसासाठी अजुन एक जलेबी पडली काय.

चौथा कोनाडा's picture

13 May 2019 - 10:28 pm | चौथा कोनाडा

हा... हा... हा... !

म्हटलं "मराठी माणसाला जलेबीचा तरी धंदा जमतोय काय हे पाहावं, निदान मिपावर तरी !

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 May 2019 - 3:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

गंभीर चर्चा करायची असल्यास
तुम्ही कुठे लग्न करणार आणि कुठे हनिमुनला जाणार यावर बर्‍याच गोष्टी अवलंबुन आहेत. जर थंड हवेच्या ठिकाणी दोन्ही होणार असेल तर उन्हाळ्यात केले तरी काय फरक पडतो? बाकी वर म्हटल्याप्र्माणे स्वित्झर्लंडला जाउनही धुसफुस करत परतणारे आहेतच. तेव्हा निर्णय तुमचा.

एक डाऊट : हनिमून करण्यासाठी आधी लग्न होणे आवश्यक /कंपलसरी आहे का ?

चौथा कोनाडा's picture

13 May 2019 - 5:12 pm | चौथा कोनाडा

हा .... हा ..... हा ..... !

मिकिलगायनाईस, लैच अ‍ॅडव्हान्सड बुवा तुम्ही !
अर्थात, लिव्ह इन च्या जमान्यात असल्या शंका येणारच !

गड्डा झब्बू's picture

13 May 2019 - 5:27 pm | गड्डा झब्बू

प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही जण स्वताच्या चार चौघी घेऊन जातात, काही भाड्याने, काही हातगाडीने. पण वातानुलीत बस किंवा विमानात केलेला हनिमून सुखदायक असतो असे नाही. आपले तर तिन्ही अनुभव लै वाईट आहेत राव. स्वामिकीरपा झाली नसावी अजून आपल्यावर.

आता करियर च्या नावाखाली लग्नाचे पुरुषांचे वय 35 वर येऊन पोचले आहे आणि स्त्री चे 30 वर
म्हणजे तारुण्य चा उतरता काळ तेव्हा सुरू होतो
तेव्हा हनिमून ला जाताना bp च्या गोळ्या, मधुमेहाची औषध,अलर्जीची औषध लक्ष पूर्वक घेऊन जावीत .
परत आपल्याला ऊन,वारा, थंडी सोसिल का त्याचा सुद्धा विचार करून प्लॅन करावा .
नाही तर थंड हवेच्या ठिकाणी जाल आणि आजारी पडून याल

तिशी पस्तिशीत आताशा, कोन बैताड वर्जिन राहते बे ?

शेखर's picture

13 May 2019 - 8:07 pm | शेखर

हनीमुनचा आणी वर्जिनीटीचा काय संबंध?

अभ्या..'s picture

13 May 2019 - 10:17 pm | अभ्या..

हनिमून म्हणजे काय?

mrcoolguynice's picture

13 May 2019 - 11:02 pm | mrcoolguynice

शास्त्र असत ते ...

जेम्स बॉन्ड ००७'s picture

13 May 2019 - 11:48 pm | जेम्स बॉन्ड ००७

AC नीट सुरू असला पाहिजे.

mrcoolguynice's picture

14 May 2019 - 12:26 am | mrcoolguynice

लोड शेडिंग असेल तर ?

भंकस बाबा's picture

14 May 2019 - 1:43 am | भंकस बाबा

हनिमून होत नाही का?

जेम्स बॉन्ड ००७'s picture

14 May 2019 - 8:49 am | जेम्स बॉन्ड ००७

विजेवर चालता का?

आनन्दा's picture

14 May 2019 - 9:13 am | आनन्दा

__/\__

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 May 2019 - 12:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

धागा विनोदी होत चालला आहे.