चेहरा हसराच आहे

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जे न देखे रवी...
10 May 2019 - 11:12 am

केले जोहार जखमांनी, चेहरा हसराच आहे
आहेत आसवे नयनी, चेहरा हसराच आहे

नको वृथा यत्न नयनबाणास परत फिरवण्याचे
काढता येणार नाही, तो असा रुतलाच आहे

नको ना राहूस उभी सखे फारवेळ आरशापुढे
काच अन पारा सांगती, तो जरा तसलाच आहे

झाले नाही दु:ख आकाश देवाघरी जाण्याचे
नव्हती सोयरीक देवाशी, देह हा आपलाच आहे

- आकाश

कविता