मनापासून बोलतो
मनापासून ऐका
वागावे कसे माझ्याशी
फिटतील सर्व शंका
चाललो पुढती तरी
त्यात ना अर्थ काही
नका येऊ मागुती
मी कुणी नेता नाही
तुम्ही पुढे मी मागे
चित्र असे दिसले जरी
मी नव्हे अनुयायी
गोष्ट ही आहे खरी
रहा आसपास माझ्या
मार्ग चालू सोबतीने
परस्परांचे मित्र होऊ
जोडुनी आपली मने
-अनुप