भीती.. सर्वव्यापी, सार्वकालिक, रूप बदलत व्यापून टाकणारी भावना. भीतीची भावना ही चांगली गोष्ट नाही असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात तसं नाही. काही प्रकारच्या भीती चांगल्या असतात. या भूतलावर आपलं अस्तित्व टिकण्यासाठी ज्या गोष्टी उपयोगी ठरल्या त्यापैकी भीती ही महत्वाची गोष्ट आहे. ती जर नसती तर fight, flight or freeze या प्रतिक्रिया देऊच शकलो नसतो आणि आपलं अस्तित्व कधीच सम्पलं असतं.
आदिमानवाच्या आणि आपल्या जीवनमानात झालेल्या बदलामुळे आज भयाची कारणं बदलली आहेत. पण प्रतिक्रिया, मनोकायिक पातळीवरच्या तशाच आहेत. भीतीचा ट्रिगर दाबणाऱ्या घटना आणि त्यांची संख्या मात्र कायच्याकाय वाढली आहे आणि भीतीचं व्यामिश्र स्वरूप देखील. आजकाल भीती रूप बदलून समोर आल्यासारखी वाटते. आणि फ्रीझ च्या प्रतिक्रियांची संख्या वाढत जातेय.
ही किंकर्तव्यमूढ अवस्था ही भयाचा सर्वात फसवा परिणाम. अनेकदा त्याग, धैर्य वगैरे सद्गुणांचे मुखवटे लावून समोर येतात. आणि परिस्थिती आणखीच अवघड होत जाते.
आणखी एक लक्षात घेऊ. भीती जरी वर्तमानात अनुभवत असलो तरी ती वर्तमानात जगत नाही. ती कायम जगते भविष्यात. असं झालं तर? हा तो भविष्य काळ. आणि जेंव्हा वाहत्या, पुढे ही एकच गती असलेल्या आयुष्यात आपण भविष्यातल्या गोष्टींच्या भयाने एका जागी अडकून पडतो तेंव्हा वर्तमानाचा नकळत भूतकाळ होतो, काळाचा वर्तमानाचा सांधा निखळतो आणि आयुष्य दुभंगते.
Hitting it home hard म्हणतात तसा हा विषय अप्रतिम पणे पोचवणारा सिनेमा म्हणजे Mine. नेमके सूत्ररूप संवाद, अप्रतिम अभिनय, तंत्रज्ञानाचा अप्रतिम नेमका वापर. एकूण मांडणी जीए च्या कथेसारखी. प्रसंग साधे रोजच्या आयुष्यातले पण मूलभूत, पूर्ण आयुष्य वेढून राहणाऱ्या विषयावर भाष्य करणारे. पहायला हवाच असा सिनेमा.
-अनुप
प्रतिक्रिया
30 Apr 2019 - 5:10 pm | महासंग्राम
मस्त लिहिलंय, पण गुर्जी जरा अजून डिट्टेल मध्ये येऊ द्या
30 Apr 2019 - 5:16 pm | सस्नेह
हा चित्रपट परिचय आहे का ?
काहीच कळलं नाही ! जरा इस्कटून लिवा हो !
30 Apr 2019 - 5:45 pm | अन्या बुद्धे
:)
माझी सिनेमा पुस्तक बद्दल लिहायची पद्धत बदलावी लागणार असं दिसतंय..
स्नायपर आणि स्पॉटर.. दोघेही अमेरिकन. इराक युद्धात.. वाळवंटात चालत असताना त्यांचा पाय लँड माईन वर पडतो आणि कित्येक तास तो एक पाय पुढे आणि एक माईनवर असा उभा राहतो. सगळा सिनेमा बहुतांश त्याच ठिकाणी तशाच अवस्थेत..
30 Apr 2019 - 5:47 pm | मराठी कथालेखक
प्लॉट रंजक दिसतोय..
30 Apr 2019 - 5:51 pm | मराठी कथालेखक
होय.. थोडं कथासूत्र येवू द्यायला हरकत नाही, तसाही प्लॉट विकीवरही मिळतो त्यामुळे तुम्ही तो सांगितलात तर ते पाप ठरणार नाही.. त्या बरोबरीने तुम्हाला चित्रपटाची बलस्थाने कोणती वाटलीत हे पण लिहू शकता.
30 Apr 2019 - 10:04 pm | अन्या बुद्धे
खरंय:)