विहीर

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
28 Apr 2019 - 11:36 am

*विहीर: एक नितांतसुंदर अनुभव*

ओशो म्हणतात.. First Principle (Truth) cannot be told. If at all it is told, it becomes second principle. Words cannot contain the Truth. All it can do, is to give a pointer towards it. विहीर सिनेमा पाहताना नेमका हाच अनुभव येतो आणि उदमेखून काही न सांगता फार महत्वाच काही सांगून जातो.

माणूस कायम अनेक पातळ्यांवर जगतो.. एकाच वेळी. आयुष्य शोभादर्शीतून पहात असल्याप्रमाणे समोर उलगडत जातं. अमूर्त माणूसपण अनामिक ओढ लावत असत, त्याच वेळी त्याच प्राणीपण सुटत नाही. नात्यांतून मिळणारं बंधन उबदारपणा हवाही असतो, आणि त्याच वेळी ते रेशमी दोर काचत ही असतात प्राणांना. व्यवहाराच्या स्थिर पाषाणावर पाय रोवलेले असताना मन तरल अमूर्त जगात वावरतं. जगणं सुरु राहतं, आसपासच्या घटनांचा अर्थ लावत, अर्थ निर्माण करत, माझिया जातीचा भेटो कुणी म्हणत पण आपलं बेट असणं स्विकारत.

हा विषय सिनेमातून मांडणं हेच मुळात एक आव्हान. घटनांना स्वतःला काही खास महत्व नाही. त्यांना अर्थ आपण देतो. अगदी आपल्या जगण्यासारखंच. अशावेळी कॅमेरा हे माध्यम हाती असेल आणि उमेश कुलकर्णी सारखा दिग्दर्शक असेल तर काय कमाल घडते, ती म्हणजे विहीर हा सिनेमा!

आपला सिनेमा नाटकातून उत्क्रान्त झाला. त्यामुळे संवादांना अतोनात महत्व. पण सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम आहे. इथे कॅमेरा मुख्य सूत्रधार आहे आणि संवाद दुय्यम. कॅमेरा बोलतो, बोलला पाहिजे ही जाण असणारा आणि ती जबाबदारी समर्थपणे पेलणारा सिनेमा.

चांगल्या काव्याचं म्हणा शिल्पाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बांधीव नेमकेपणा. गरजेचे सर्व आहे पण तेवढेच आहे, जे नसून चालेल ते नाही, असा घडीवपणा. रचनेचं कौशल्य अस की यात बदल, बारकासाही म्हणजे कलाकृतीला न भरून येणारी जखम! हा सिनेमा तसा बनलाय. एकही फ्रेम उगाच नाही. एकही संवाद उगाच नाही. शेवटची जवळपास 10 मिनिट तर काही संवादच नाहीत मागे पखवाज आणि सरोद सुरु राहतं फक्त तरी ती दृश्य बोलत राहतात आपल्याशी!

सिनेमा सम्पला तरी विहिरीत घुमणाऱ्या आवाजाप्रमाणे मनात घुमत राहतो, ही त्याच्या खास असण्याची पावती. आणि जगणं या गोष्टीचा आणखी एक खास पैलू दिसल्याचा आनन्द..

--अनुप

चित्रपट

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

28 Apr 2019 - 12:53 pm | प्रमोद देर्देकर

तुम्ही एखादा सिनेमा पाहताना एव्हढा चिकित्सक बुध्दिने कसा हो पाहता.
आयाला आम्ही नुसतं बघतो आणि सोडून देतो .
तुम्ही त्यावर अगदी जडशीळ शब्दात वर्णन करून आम्हला पहायला भाग पाडता. मागे तो ट्रक चा सिनेमा ची तुम्ही ओळख करून दिल्यावर मी पाहिला पण तरीसुध्दा डोक्यावरून गेला.
मुळात अमेरिकेसारख्या देशात मदतीची हजार मार्ग उपलब्ध असताना एका ट्रक ड्राइवरला हिरो थांबवू शकत नाही हे अचंबित करणारं आहे.
असो आता हा सिनेमा बघतो.

अन्या बुद्धे's picture

28 Apr 2019 - 6:33 pm | अन्या बुद्धे

सिनेमा बघताना नुसता बघितला जातो. पण काही सिनेमे नन्तरही डोक्यात सुरू राहतात.

सिनेमा पुस्तक वगैरेबद्दल लिहिताना त्यातलं मला काय भावलं ते सिनेमा/ पुस्तकाच्या कथानकाबद्दल न सांगता सांगायचा प्रयत्न असतो. नन्तर जे पाहतील वाचतील त्यांनी त्यांची निरीक्षणं नोंदवावीत. जे माझ्या कडून निसटलं असेल ते लक्षात यावं अशी इच्छा असते..

श्वेता२४'s picture

28 Apr 2019 - 9:20 pm | श्वेता२४

कळला नव्हता. त्यावेळी रिव्यू वाचून पहायला गेले पण कधी एकदा संपतोय असं झालं होतं आणि सर्वजण अस्वस्थ झाले होते. कंटाळले होते. शेवटीशेवटी कमेंट सुरु झाल्या. सिनेमा संपल्यावर अक्षरशः टाळ्या वाजवल्या लोकांनी संपला एकदाचा म्हणून. मधेच निघून जाणार होते, पण मला आपलं शेवटपर्यंत वाटत राहिलं आता कळेल मग कळेल काय चाललंय ते पण शेवटपर्यंत कळलं नाही. असो. आपण लिहीलंय छान. पण सिनेमा समजुन घेण्यासाठी तेवढं पुरेसे नाही. कदाचित मला तेवढी प्रगल्भ दुष्टी नाही अशी मी समजुत करुन घेतली आहे

अन्या बुद्धे's picture

28 Apr 2019 - 10:01 pm | अन्या बुद्धे

मला हे का आणि कसं वाटलं सांगायचं तर सिनेमातले प्रसंग सांगावे लागतील.. जे मला नकोय. ज्यांनी सिनेमा पाहिला नाहीए त्यांना माझ्याकडून कथानक कळू नये..

मराठी कथालेखक's picture

28 Apr 2019 - 11:00 pm | मराठी कथालेखक

मी ही हा सिनेमा बघण्याचा उपद्व्याप केला होता (पण घरी चॅनेलवरच) फारच कंटाळवाणा सिनेमा आहे हो हा..
उगाच सोपं काहीतरी अतिअवघड करुन सांगण्यालाच कलात्मकता म्हणतात की काय कुणास ठावूक..
'गमन' वगैरे सारखे सामान्य माणसाचे सुखदःख मांडणारे कलात्मक चित्रपट (म्हणजे व्यावसायिक नसल्याने कलात्मक इतकंच..) मी पहातो आणि मला ते आवडतातही पण हे म्हणजे भलतंच प्रकरण आहे. असो...

भरपूर जड़ आशयघन , किंवा शाळकरी वयातील प्रेम प्रकरणे , किंवा केविलवाने विनोद !! हे मुख्य तीन प्रकार मराठी सिनेमाचें !!!!
या विषयावर 20 / 25 वर्ष मराठी चित्रनगरी अक्षरशः दिवस काढत आहे .

यावरून एक आठवला, लिंक खफवर टाकली. आता फक्त ट्रेलर दिसतोय पण मागे फुल मुवी होता युट्युबवर. पाहिला. टकाने सुचवलेला.

मराठी कथालेखक's picture

28 Apr 2019 - 11:03 pm | मराठी कथालेखक

हा सिनेमा तसा बनलाय. एकही फ्रेम उगाच नाही. एकही संवाद उगाच नाही

मला तर अख्खा सिनेमाच उगाच वाटला :)

nanaba's picture

29 Apr 2019 - 9:36 am | nanaba

Ha picture faar avadalela.
Baghunahi anek varshe zali.
Punha pahun kasa vaTato pahayala have. :)

अन्या बुद्धे's picture

29 Apr 2019 - 11:47 am | अन्या बुद्धे

:):)

उगा काहितरीच's picture

29 Apr 2019 - 1:53 pm | उगा काहितरीच

मला Off-beat चित्रपट आवडतात. (वास्तुपुरूष वगैरे) पण हा आवडला नव्हता. कदाचित TV वर पहात होतो ते जाहिरातींमुळे वगैरे लिंक तुटते म्हणुन असावे. आता परत एकदा बघेल जमलं तर.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

29 Apr 2019 - 5:17 pm | हणमंतअण्णा शंकर...

हे

https://www.misalpav.com/node/11754

सापडलं.

अन्या बुद्धे's picture

30 Apr 2019 - 11:11 am | अन्या बुद्धे

केवळ दर्जा!
काही लक्षात आलेल्या गोष्टी अधिक स्पष्ट झाल्या तर काही नव्याने समजल्या..
धन्यवाद!__/\__

अन्या बुद्धे's picture

30 Apr 2019 - 11:11 am | अन्या बुद्धे

केवळ दर्जा!
काही लक्षात आलेल्या गोष्टी अधिक स्पष्ट झाल्या तर काही नव्याने समजल्या..
धन्यवाद!__/\__