शिवनेरी दारी तोफा कडाकल्या
सह्याद्रीच्या कुशीत विजा चमकल्या....
जिजावुंच्या पोटी रत्न जन्मलं
स्वराज्याच्या स्वप्नात राजे बाळ रंगल....
हाती घेऊन तलवार करी अन्यायाचा प्रतीकार
प्रत्येकी जाहला देवाचा साक्षात्कार......
केली स्वराज्याची स्वारी घेऊनी आर्शिवाद भवानी मातेचा
शत्रूंवर बरसला मस्तकी लावूनी टीळा भगव्या रक्ताचा .....
स्वधैर्याने गाजवले द्दिल्लीचेही तख्त
कोणत्याही परिस्थितीत झुकले नाही मराठ्यांच रक्त ....
जन्मभर फक्त आणि फक्त रयतेसाठी झिजला
स्वराज्याच स्वप्न उरी बांधूनी तो एकटाच लढला....
शिव छत्रपती राजा प्रत्येकी मनी बसला
असा एक शिवसुर्य रायगडी कुशीत निजला......
प्रतिक्रिया
23 Apr 2019 - 3:32 pm | खिलजि
जसा इंद्र जम्भासुरावर
वादळ आकाशावर
राम माझलेल्या रावणावर
जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर,
शंभू रतीच्या पतीवर
परशुराम सहस्त्र क्षत्रियांवर
जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर,
चीता हरणाच्या कळपावर ,
सिंह भल्या मोठ्या हत्तीवर हल्ला करतो
जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराच नाश करतो,
कृष्ण कंसाचा नाश करतो,
तसा हे शिवाजी राजा या म्ल्लेंछ वंशाचे कपटी
यांचा नाश करणारा वाघ आहेस.