आपली भेट ,Coffee आणि बरच काही
आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही...
ओळख असुनही अनोळखीच वाटत होतो
एकमेकांची नजर चुकवून हळूच बघत होतो ...
चेहऱ्यावर शांतता पण मनातून भलतेच खुश होतो
पहिले कोण बोलेल ह्याचीच वाट बघत होतो....
तक्रारी तर एकमेकांच्या खूपच होत्या
पण मनातल्या भावना ओठांवरच थांबल्या होत्या ...
लाजुन का होइना,शेवटी सुरूवात तुच केली
काॕफी सोबत गप्पांना मजा काही औरच आली...
बोलताना कधी म्हणायची तु ,तर कधी म्हणायची तुम्ही
खरंतर काय बोलावं यातच फसलो होतो आम्ही ....
वाटलही असेल की तुझ्या समोर मी थोडा घाबरत होतो
पण काय सांगणार ,बावरलेल्या मनाला मी सावरत होतो ....
तुझी मात्र बिनधास्त बडबड आणि मस्ती चालूच होती
काय माहीती आज कुठल्या वेगळ्याच विश्वात रमली होती...
आतल्या आतच मी खुप काही बोलत होतो
तुझ्या त्या निरागस चेहऱ्याला एकटक बघत होतो ....
खुप दिवसांनी स्वताला कुणात तरी हरवले होते
काॕफी आणि गप्पां मधे मन कुठेतरी भरकटले होते ...
माझी नजर सारखी घड्याळा कडे वळत होती
कारण काॕफी सोबत वेळही संपत आली होती ....
निघताना वाटत होतं कि खरंच मागे राहिलय आपल काही
होईल का पुन्हा अशी आपली भेट ,काॕफी आणि बरच काही? ....
प्रतिक्रिया
22 Apr 2019 - 10:22 pm | ज्योति अळवणी
मस्त