#आई

sanket gawas's picture
sanket gawas in जे न देखे रवी...
22 Apr 2019 - 1:29 pm

#आई

आई आज तुझ्या आठवणी मध्ये रमून रहावस वाटतं
तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावासा वाटतं .....

किती मस्त झाले असते जर गेलेला वेळ परत आला असता
तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण पुन्हा जगायला भेटला असता....

लहानपणापासून माझे अडखळणारे पाऊल सांभाळले
वाट चुकलो तेव्हा बोटाला पकडून सरळ चालायला शिकवले....

आमच्या भोवती असताना कधीच स्वतःचा विचार तु केला नाही
कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर कधीच दाखविले नाही ...

कधी कधी वाटतं फक्त स्वतःच्या सुखासाठी घर सोडले
म्हातारपणात आधार न देता तुला मी एकट टाकले ...

सतत वाट बघत उभी असतेस डोळे लावूनी दारी..
माझही चुकत कारण येतो फक्त पाहुणा बनुनी घरी ....

थकल्या शरीराने करतेस माझ्या साठी गोड खिर...
आजही तशीच बावरतेस जर घरी यायला झाला मला उशिर....

आज सगळं असुन माझ्या कडे वेळ मात्र नाही तुझ्या साठी
तु मात्र वेदना विसरून धडपडत असतेस फक्त माझ्या साठी....

मनातून मीही खचतो जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
हरवलेल्या नात्यांची आणि जबाबदारीची जाणीव करुन देते..

निरोप घ्यायची वेळ येते तेव्हा डोळे तुझे पाणावतात
येशील परत कधी हाच प्रश्न सारखा विचारतात ...

थकल्या पावलांनी अलगद परत मागे तु फिरतेस
लपवत जरी असली तरी आतून मात्र रडतेस....

पुन्हा एकदा एकटीच चाललीस स्वताला सावरत
जड झालेलं मन आणि भावनांना आवरत...

कविता

प्रतिक्रिया

sanket gawas's picture

22 Apr 2019 - 1:33 pm | sanket gawas

आपली भेट ,Coffee आणि बरच काही
आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही...

ओळख असुनही अनोळखीच वाटत होतो
एकमेकांची नजर चुकवून हळूच बघत होतो ...

चेहऱ्यावर शांतता पण मनातून भलतेच खुश होतो
पहिले कोण बोलेल ह्याचीच वाट बघत होतो....

तक्रारी तर एकमेकांच्या खूपच होत्या
पण मनातल्या भावना ओठांवरच थांबल्या होत्या ...

लाजुन का होइना,शेवटी सुरूवात तुच केली
काॕफी सोबत गप्पांना मजा काही औरच आली...

बोलताना कधी म्हणायची तु ,तर कधी म्हणायची तुम्ही
खरंतर काय बोलावं यातच फसलो होतो आम्ही ....

वाटलही असेल की तुझ्या समोर मी थोडा घाबरत होतो
पण काय सांगणार ,बावरलेल्या मनाला मी सावरत होतो ....

तुझी मात्र बिनधास्त बडबड आणि मस्ती चालूच होती
काय माहीती आज कुठल्या वेगळ्याच विश्वात रमली होती...

आतल्या आतच मी खुप काही बोलत होतो
तुझ्या त्या निरागस चेहऱ्याला एकटक बघत होतो ....

खुप दिवसांनी स्वताला कुणात तरी हरवले होते
काॕफी आणि गप्पां मधे मन कुठेतरी भरकटले होते ...

माझी नजर सारखी घड्याळा कडे वळत होती
कारण काॕफी सोबत वेळही संपत आली होती ....

निघताना वाटत होतं कि खरंच मागे राहिलय आपल काही
होईल का पुन्हा अशी आपली भेट ,काॕफी आणि बरच काही? ....

sanket gawas's picture

22 Apr 2019 - 1:35 pm | sanket gawas

आपली भेट ,Coffee आणि बरच काही
आज समोर बसूनही काही आपण बोललोच नाही...

कारण आज नव्हतीस तू समोर फक्त भास होता मनाचा
सोबत बसलोय तुझ्या हाच प्रयन्त होता स्वतःला समजवण्याचा...

स्वतःला तुझ्यात हरवून खूप काही आज बोलायचं होत
डोळे बंद करून तुझ्या गप्पांमध्ये स्वतःला गुंतवायच होत....

खरतर आज खूप तक्रारी करणार होतो तुझ्याकडे
मागणार होतो स्वतःसाठी हक्काची अशी वेळ तुझ्याकडे...

पण समोर होती रिकामी खुर्ची तीहि वाट बघत होती तुझी
कदाचीत आज तिलाही परीक्षा घेऊन बघायची होती माझी...

हातातला कॉफी चा कप मागत होता काही प्रशांची उत्तरे
पुन्हा पुन्हा तुला आठवून मन मात्र आतून रडत होत बिचारे...

म्हटल तू नाही तर तुझ्याआठवणीत तरी रमून जाऊया
साक्षात नाही तरी एकदा स्वप्नांत तरी तुला भेटून येऊया...

खरतर माहिती होत कि तू नाही येणार आज भेटायला
पण काय करणार कस समजवनार ह्या वेड्या जीवाला...

शब्द दिला होता कि तू नसतानाही कधी नाही रडणार
तुझ्या आठवणी मनात साठवून कायमचा हसणार....

थांबणार होतो तसाच तुझी वाट बघत त्या रिकाम्या खुर्ची सोबत
परत सगळं काही आठवून राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत....

हातातील कॉफी सांगत होती कि वेळही शिल्लक राहिली नाही
पुन्हा आज अर्धवट राहिली आपली भेट ,Coffee आणि बरच काही....